हृदयस्पर्शी कथा- नवसाने झालेली मुलगी बारावीत असताना असे काही वागते हे बघून डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

लग्नाला ७ वर्षे झाली तरी बायको ची कुशी भरली नव्हती. बाबा म्हणून ऐकायला कान हत्तीसारखे झाले होते. खूप इलाज करून सुद्धा हाती निराशा लागत होती. बाबा तसे नास्तिक होते. परंतु शेवटचा उपाय व आईची इच्छा होती म्हणून तुळजा भवानीला नवस केला. जर माझ्या घरात लक्ष्मी आली तर आई तुला भेटायला येईल असा नवस केला.

त्यानंतर काही दिवसातच तुम्ही बाप होणार असल्याची बातमी बायकोने दिली. बातमी ऐकून नास्तिक बाप आस्तिक झाला, रोज मनोभावे माता तुळजा भवानीची पूजा करू लागला. आईचे शेकडो पूजापाठ व नवस कामी आले होते. बरोबर श्रावणातल्या तिसऱ्या दिवशी पहाटे तिचा जन्म झाला. बाबाची लेकीसाठी जी आस होती ती आस संपायला सात वर्षाचा काळ लोटला होता.

श्रावण ज्या प्रकारे चैतन्याचे वातावरण निर्माण करतो तसाच आकार बापाच्या मनाने घेतला होता. मुलीच्या आनंदात नवस फेडण्यासाठी पायी देखील चालत गेला. चालत चालत पायाला फोड आले होते, खोलवर काटे रुतले होते पायातून रक्त वाहत होत. पण ते सर्व मुलगी झाल्याच्या आनंदापुढे फिके होते.

मुलगी झाल्याच्या आनंदपुढे वेदना तग धरत नव्हत्या. ताई तू दिदींच नाव श्रावणी ठेव अस आवर्जून मोठ्या दीदीला सांगितले. श्रावणाने वातावरणात चैतन्य आणले होते तर या श्रावणीने बापाच्या मनात. नाव जरी श्रावणी ठेवले तरी तो लाडाने दीदी च म्हणत असे. दिदीची चेहरे पट्टी आईवर गेली होती. पण नाव मात्र बापासारखे होते. दीदी हळूहळू घरात लक्ष्मीचे पाऊल टाकू लागली तिच्या सहवासाने घर प्रसन्न होत होते.

आई तर दिवसभर ताई ताई म्हणत पकडण्यात च दमून जायची. बाप लेकीला काही कमी पडू नये म्हणून बापाने दुसरे अपत्य होत असून देखील जन्म न देण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या श्रावणात दिदीला पाच वर्षे पूर्ण होणार होती दिदीचा वाढदिवस मोठा करायचा होता म्हणून वर्षभर पगारातून काही रक्कम बाजूला काढत होते.

आयुष्यात कधीही केक च तोंड न पाहिलेल्या बापाने लेकीसाठी ५ किलोचा केक आणला होता. दिदीच्या वाढदिवसाला मी तिला डॉक्टर करणार अस त्याने ठरवून टाकले. त्यासाठी तो पुढच्या महिन्यापासून पैसे सुद्धा बाजूला काढू लागला. दीदी आता शाळेत सुद्धा जायला लागली होती. स्वतः मात्र ठिगळ लावून सरकारी शाळेत गेला होता मुलीला मात्र इंग्लिश मिडीयम मध्ये घातल होत.

मुलगी थोडीच बापासारखे होणार आहे ती तर डॉक्टर होणार आहे ना. एकदा पाणी बदल झाल्यामुळे ताप आला म्हणून तो रात्रभर मिठाच्या पट्ट्या बदलत होता. रात्रभर त्याच्या दिदीच्या हातात हात घेऊन चोळत होता. त्यारात्री त्याला झोपही आली नव्हती. या श्रावणात दीदी ७ वर्षाची झाली होती. तिला पैंजण करायचे होते म्हणून बापाने हातातील अंगठी गहाण ठेवली पण मुलीला पैंजण केली.

बापाला थोडीच अंगठी शोभून दिसते शोभून दिसतात तर ते लेकीच्या पायातील पैंजन नाही का?? पैठण घालून गेली चालत होती मात्र त्याच्या आवाजाने बापाचे कान तृप्त होत होते. बापाचा पगार १०००० होता मात्र दिला तीन हजाराचा ड्रेस आवडला म्हणून दोन्ही घेतला. बाप मात्र दोन वर्षांपूर्वी घेतलेला शर्ट अजूनही घालत होता.

बापाला कशाला कपडे पाहिजे कपडे पाहिजे ते मुलीला. बापाला कोण पाहणार आहे मुलगी चारचौघांमध्ये उठून दिसली पाहिजे नाही का. लेकीचं तोडक मोडक इंग्लिश ऐकून त्याला अप्रूप वाटत होत. त्याला अजून जोराने मेहनत करण्याची ताकद मिळत होती व तो अजून जोमाने मेहनत करत होता.

लेकीच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता लेकही तशी हुशार होती. शाळेत नेहमी पहिल्या, दुसऱ्या नंबर वरच असायची लेखही मोठ्यापणी तू कोण होणार असे विचारल्यावर मी डॉक्टर होणार असे सांगत होती. नववीत असताना तिने पहिल्यांदा प्रथम क्रमांक पटकावला शाळेने ठरल्याप्रमाणे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार करायचे ठरवले.

आपल्या मुलीचा सत्कार होताना पाहून बापाच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. बाप्पाचे डोळे सभागृहाला ओरडून सांगत होते की, ही माझी लेक आहे. सत्कार समारोह झाल्यावर बापाने परत डॉक्टर होऊन अशीच माझी मान उंचाव असं बजावून सांगितल. ती होय बाबा असे म्हणत मान डोलवू लागली. दीदी दहावीला तृतीय क्रमांक पटकावून उत्तीर्ण झाली बापाने आनंदाच्या भरात पूर्ण कॉलनीला पेढे वाटले.

पेढे वाटताना माझी दिदी डॉक्टर होणार आहे असे सांगायला तो विसरला नाही. त्याने सर्वांना पेढे भरवले परंतु त्याला कोणीही पेढा भरवला नाही. त्यानंतर दीदीने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयांमध्ये जाऊन महिना झाला आणि दीदीने मोबाईलची मागणी केली तोही मोठा. बाप म्हणाला बेटा आपण घेऊ तुला उगाचच अभ्यासात खोळंबा नको व बापाने तिची ती मागणी मान्य केली.

तिने दुकानात गेल्यागेल्या डायरेक्ट दहा हजाराच्या फोनवर हात ठेवला. परंतु मुलीची इच्छा मोड नये म्हणून बापाने हळूच दुकानदाराचा कानात सांगितले की, आता मी पाच हजार देतो बाकीचे पुढच्या महिन्यामध्ये देतो. हे ऐकल्यावर दुकानदार तयार झाला नाही. शेवटी दुकानदाराने हप्त्यावर फोन घ्यायला सांगितले. मात्र बापाच्या बटनाच्या फोन वर दोन ठिकाणी रबर लावला होता आणि फोन च्या बॅटरी ला मागून कागद लावुन तो वापरत होता.

बापाला कशाला लागतोय नवीन फोन त्याचा कोण बघणार आहे. फोन तर लेकीला पाहिजे आणि तोही नवीन आणि मोठा. माझी लेक तर डॉक्टर होणार आहे ना. त्याची दीदी रात्रभर पर्यंत मोबाईल वर काहीतरी करत असायची माझी लेक अभ्यास करतेय असे म्हणताना बापाला वेगळाच अभिमान वाटत होता.

तिला अकरावीमध्ये पाहिजे तसे मनासारखे मार्क पडले नाही. परंतु बापाने आता पेपर अवघड झाले असतील म्हणून काहीही बोलला नाही. आणि लेकिनही काहीही सांगितले नाही. बारावी मध्ये चांगले गुण मिळवावे म्हणून क्लास लावला होता आणि क्लास करून आठ वाजेपर्यंत दीदी घरांमध्ये यायची. एकदा दहा वाजले होते तरीही दीदी घरी आली नाही बापाने क्लासमध्ये विचारले.

तेव्हा दीदी आज क्लासला आलीच नाही असे सांगण्यात आले. ते ऐकून काय करावे आणि काय नाही हे त्याला कळतच नव्हते. बायकोचे डोळे रडून रडून लाल झाले होते. माझ्या लेकीला काहीतरी झाले असेल म्हणून ती रडत होती. बापाचेही मन रडू रडू झाले होते, परंतु तो रडला नाही. कारण आपणच जर रडलो तर बायकोला कोण आधार देणार म्हणून तो रडला नाही.

काही वेळाने तो सहज चालत चालत टेबलकडे गेला व त्याला तेथे एक चिठ्ठी दिसली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं बाबा माझं एका मुलावर प्रेम आहे आणि तो खूप श्रीमंत आहे. तुम्ही तुमचा जीवन एका छोट्या खोली मध्ये काढल आणि माझ्या इच्छा पूर्ण करू शकले नाही. म्हणून मीच माझा जीवनाचा जीवनसाथी निवडला आहे. तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका आणि पोलिसातही जाऊ नका.

तुम्ही मला शोधून घरी परत आणल तर मी जीव देईल आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. तुमची लाडकी दीदी अस त्या चिठ्ठी मध्ये लिहिल होतं. बापाचे पाणावलेले डोळे पत्र वाचत होते तर पत्रातील शब्द बापाच्या हृदयावर घाव घालत होते. कालपर्यंत नवीन ड्रेस पाहिजे म्हणून हट्ट करणारी माझी दीदी अस कस करू शकते म्हणून त्याला नवल वाटत होत.

जे हात दीदीला डॉक्टर बनवण्यासाठी दिवसभर झीजत होते ते हात देवाकडे विनवणी करत होते. काट्या मधून चालणाऱ्या पायांमध्ये तर उभे राहण्याचे देखील बळ उरले नव्हते. बाबाला नेमके कळत नव्हते की, चुकल तर नेमक चुकले काय आपण स्वतः फाटक्या कपड्या मध्ये राहून लेकीला तीन हजाराचा महाग ड्रेस घेणे चुकल.

लेकीच्या आनंदात अनवाणी नवस फेडणे चुकले काय, की स्वतः तुटका फोन वापरून दिदीला मात्र महागडा स्क्रीन टच फोन घेऊन देण चुकल का? लेकीला डॉक्टर बनवण्याच स्वप्न चुकल का की लेकीला दिलेले संस्कार चुकले का. लेकीवर स्वतःपेक्षा जास्त जिव लावण चुकल का?

बापाला नेमके हेच समजत नव्हते की, चुकल तर नेमके चुकले काय? आमची काय म्हणून कसर राहिली होती की, आपली मुलगी एका काही महिन्यांपासून भेटलेल्या मुलासाठी आपल्या जन्मदात्यांना सोडून गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *