१४ वर्षी लग्न आणि ८० व्या वर्षी घ-ट-स्फो-ट पहा अस काय घडल की ८० व्या वर्षी घ-ट-स्फो-ट घ्यावा लागला.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

अकराचे टोल पडले आणि कोर्टाचे कामकाज चालू झाले. न्यायाधीश व्यक्तीने आपली जागा घेतली आणि समोर पडलेले पेपर पाहून आजी बाईला म्हणाले आजी बाई या वयामध्ये आता तुमची घटस्फोट घेण्याची इच्छा नक्की आहे ना? तुम्ही या आजोबांसोबत राहतच नाही म्हणून विचारले आजीने होकारार्थी मान हलवली. न्यायाधीशाने परत विचारले पण आजी हा अट्टहास कशासाठी? साहेब त्याच्यासाठी आधी तुम्हाला माझ आयुष्य समजून घ्याव लागेल अस आजी कणखर आवाजात म्हणाल्या आणि सांगू लागल्या.

साहेब मी भावंड आम्ही तिघी आणि वडील पट्टीचे दारूबाज. संसार चालायचा तो आईच्या जीवावर. आई आम्हा सर्वांना सांभाळून वडिलांच्या व्यसनासाठी पैसे द्यायची. पैसे नाही दिले तर मारामारी आणि शिवीगाळ होत होती. अशा वातावरणामध्ये आम्ही वाढत होतो. सुट्टीच्या दिवशी आम्ही आईसोबत कामाला जाऊन तिच्या त्या संसाराला आमचा थोडा हातभार लावत होतो.

अशा परिस्थितीतही आईने आम्हाला मुलांना शाळेत घातले होते. मी हुशार होते, पहिला नंबर नाही तर निदान पहिल्या पाच मध्ये तरी मी नक्की असायचे. माझ्या शिक्षकांना माझ्या कडून अपेक्षा होत्या. पण गरिबी आणि वडिलांचे व्यसन घात करेल अशी भीतीही होती. तरीही तसेच झाले माझ्या वडिलांनी माझ्याच गावातील एका माझ्या वयाने मोठ्या असलेल्या बेवड्या शी लग्न लावायचे ठरवले. त्याची पहिली बायको पहिल्या बाळंतपणामध्ये वारली होती.

बापाने दहावी होऊ दिली नाही. दहावीच्या सुट्टीतच माझे लग्न झाले. आईचे बापा पुढे तर काही चालत नव्हते. पण तिने एका गोष्टीमध्ये समाधान मानून घेतले होते की, मुलगी आपल्या गावातच आपल्या डोळ्यांसमोर राहील. कष्ट करण्याची सवय तिला तशीच होतीच. आता ती फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या संसारासाठी करू लागली. बाकी काही फरक न होता लेकरा बाळांसाठी मला केलेल.

पाच वर्ष झाली पण मला काही लेकरू होत नव्हत. रोजची मारहाण आणि छळ चालू होता. शेवटी वैतागून नवऱ्याने तिसरी बायको घरी आणली. मी काय करू शकणार होते मुलींचे बाप जोपर्यंत मुलीला गळ्यातील चैन समजतात तोपर्यंत हे असेच चालू राहणार. मोठ्या मनाने मी सवतीला माझ्यासोबत जुळवून घेतले आणि थोड्या दिवसाने तिला दिवसही गेले. मलाही खूप आनंद झाला मोठ्या बहिणीप्रमाणे मी तिची नऊ महिने काळजी घेतली.

तिला तिकडची काडीही इकडे करू दिली नाही. मी तिच्या लेकरा मध्येच मी माझ्या वात्सल्याचे समाधान मानत होते. तिला मुलगा झाला आणि मग ते जेव्हा घरी आले तेव्हा तिचं वागण खूप बदललेलं दिसल. तिच्या लेकराला मला हातही लावू दिला नाही. रात्री तिने आपल्या नवऱ्याचे खूप कान भरले माझ्या लेकरावर या वांझोटी ची सावली नको तरच मी इकडे राहील. नवसाने झालेल्या मुलाच्या समोर नवऱ्याला काहीच सुचले नाही.

माझा कसलाही विचार न करता त्याने तश्या रात्री मला घराबाहेर काढले. मी खूप विनवण्या केल्या पण त्याचा काहीही परिणाम त्याच्यावर झाला नाही. मी त्या अंधारामध्ये आईकडे गेले आईला मी सर्व परिस्थिति सांगितली. आईने मला रात्रभर तिच्याकडे ठेवून घेतले आणि सकाळी ती मला समजुतीच्या गोष्टी सांगू लागली. बाई तू इथे कशी आली तर भाऊ भावजाय कोणाचे असतात. आपले घर ते आपले असते.

तिकडे दारातील कुत्री म्हणून जगावे लागले तरीही तिकडेच राहा. पण इकडे अशी आमच्याकडे येऊ नको. आणखी किती दिवस आमचा तुला आधार पुरेल आईचे म्हणणे तसे बरेही असेल. पण माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि माझे डोळेही भारावून गेले. नवऱ्याच्या घरी जायची माझी अजिबात इच्छा नव्हती. म्हणून मी तशीच आईच्या घरून निघाली आणि वाट फुटेल तिकडे चालू लागली. कुठे जात होते हे मला माझेच कळत नव्हते.

तेव्हा अचानक एक कार माझ्या पुढे जाऊन परत मागे आली आणि त्या कारमध्ये आमच्या शाळेत असणारी माझ्यावर पाच वर्षे मोठी असणारी मुलगी होती. ती आता डॉक्टर होती. शाळेमध्ये असताना माझा आदर्श म्हणून मी डोळ्यासमोर ठेवली होती तिला. गाडीतून खाली उतरून ती मला म्हणाली अग तू इकडे कुठे चाललिय माझ्या आयुष्याबद्दल गावातून तिला थोडीफार माहिती मिळालेली होती तशी. सहानुभूतीची भुकेली असावी तशी मी फटाफट तिला माझी पूर्ण कथा सांगितली.

आता जगून काय करायचे अशा विचारांमध्ये मी आहे. तेव्हा तिने मला सांगितले हे बघ जवळ एक हॉस्पिटल सुरू केले आहे. माझ्या मित्रांसोबत आणि या कारणामुळे आमचे माझ्या घराकडे लक्ष देणे होतच नाही. घरी माझ्या सासूबाई म्हणतात. तू जर माझ्या घरी आली तर घरच्या सारखी घर सांभाळू शकशील. मग तुला जमेल का मी पटकन हो म्हणाली, कारण डोक्यावरचे छप्पर ही माझी प्रमुख गरज होती.

सरला माहेरची माहितीची होती. म्हणून मी हा प्रस्ताव लगेच मान्य करून तिच्या घरी आली. सुरुवातीला मला त्या सुशिक्षित लोकांमध्ये खूप अडाण्यासारखे वाटायचे आणि माझा आत्मविशास ही खूप कमी झाला होता. पण सरलाच्या सासूने मला खूप समजून घेतले आणि बऱ्याच गोष्टी शिकवल्या. हळूहळू मि सरला चे पूर्ण घर सांभाळू लागले. सासूबाईंची औषध पाणी आणि संपूर्ण घर सोडून सरला आणि भाऊजी हॉस्पिटल मध्ये जाऊ लागले.

थोड्याच दिवसांमध्ये सरला ला दोन जुळी मुलेही झाली. सरला आणि तिच्या सासूला माझ्या वांझोटी पण आता काहीही त्रास झाला नाही. सरला ची मुले माझ्या खांद्यावरती खेळली जात होती. सरला ची मुले मोठी होत गेली ती गुणी डॉक्टर झाली. सरला ला कधी घराकडे लक्ष द्यायची गरजच पडली नाही. पैशांचा विचार मी कधीही केला नाही पण सरला ने स्वतः माझे अकाऊंट उघडून त्यामध्ये ती थोडेफार पैसे जमा करत असायची. मी लौकिक अंकाने जरी नववी शिकले होते तरी व्यवहाराच्या शाळेत मी खूप काही शिकले होते.

आता मी लहानपणची राहिलेली नव्हती मी आता आत्मविश्वासाने पूर्णपणे भरलेली होती. सरला च्या मुलीचे लग्न होऊन ती तिच्या सासरी सुखात आहे. सरला ची सासुबाई चार-पाच वर्षांपूर्वीच वारली. मुले आणि सून सरला चे हॉस्पिटल संभाळत आहे. छोटे ते हॉस्पिटलचे रोप आता मोठे वृक्ष झालेली आहे. आता लवकरच सरला आणि मी आजी होणार आहोत.

आता काही दिवसांपूर्वी चीच गोष्ट एक फाईल अर्जंट हवी होती म्हणून सरला ने घरी फोन केला आणि मी ती फाईल घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. मी जेव्हा पोहोचली तेव्हा सरला पेशंट तपासत होती त्या पेशंट कडे माझे लक्ष नव्हते. तेथेच सरला ने मला पन्नास हजार रुपये दिले आणि हे बँकेत भरायचे आहे असे सांगितले मी तिथून निघून गेली. पण बेड वरचा पेशंट म्हणाला मॅडम ही माझी बायको आहे. घरी आल्यावर सरला ने मला समोर बसवून हे सर्व काही सांगितले.

माझे पासबुक दाखवले आणि ती मला म्हणाली तुला जर तुझ्या नवऱ्याकडे जायचे असेल तर तु जाऊ शकते. कारण त्याची दुसरी बायको आता वारलेली आहे आणि नवसाने झालेला तो मुलगा आणि सून त्याला नीट वागवत नाही. तू मला असह्य झालेली आहे किंवा आवडत नाही. असा विचार चुकूनही मनात आणू नको. कारण तुझ्याविना इथे सर्व अडलेले राहील.

पण बघ तुला काही वाटायला नको तुला जर तुझा नवरा आणि संसारात परत जायचे वाटत असेल तर तू जाऊ शकते. मी तुमच्या मध्ये पडणार नाही. मी शॉक झाले. विसरलेला सर्व भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर येत गेला. मी पूर्णपणे अडचणीत असताना मला सरला शिवाय कोणीही मदत केली नाही आणि मी आता सर्व बाजूने तृप्त असतांना मी कोणाला माझ्या आयुष्यात काय म्हणून येऊ देऊ?

असा विचार करताना या निर्णयावर आले की, आता मला या जगामध्ये माझ स्वतःचं अस्तित्व निर्माण करूनच माझ जग सोडायच आहे. कोणाची बायको कोणाची मुलगी आणि बहीण म्हणून नाही तर मला या माणसाकडून घ-ट-स्पोट हवाय. ही सर्व गोष्ट ऐकून न्यायाधीश ने लगेच पेन उचलला आणि साइन करून तो जगावेगळा घ-ट-स्फो-ट मान्य केला. तिच्या अस्तित्वाची लढाई मात्र ती जिंकली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *