मुलीच्या आई बाबांनी एकदा वाचाच मुलीच्या जीवनात असा दुर्दैवी क्षण आलाच तर काय कराल किंवा काय करावे.

Uncategorized

निर्णय.

हल्ली ते तिघे सारखे एकत्र असायचे. आई बाबा आणि त्यांची एकुलती एक मुलगी पिऊ. लग्न आठवड्यावर आल होत उद्या पिऊची आत्या येणार होती आणि त्यानंतर बाहेर गावी राहणाऱ्या नातेवाईकांची भेट लागणार होती. कुटुंबातल पहिल वहील आणि ते देखील लाडक्या पिऊच लग्न.

उत्साहाला उधाण आल होत सगळी तयारी झाली होती. हॉल, ब्युटिशन, मेहंदी, खरेदी सगळ अगदी काटेकोरपणे जय्यत होत. तिच्या मनाला हुरहुर लागली होती, पिऊ कुठे दूर जाणार नव्हती. गावातल्या गावातच तिचे सासर होते. तरीही मन अस का चिंतेत होत तिला कळत नव्हत.

मुलगी लग्न करून जाणार म्हटल्यावर अशी अनामिक हुरहूर दाटून येत असतात. पण तिच्या चाणाक्ष नजरेला काहीतरी विपरीत जाणवत होत. मुलगा देखना कर्तबगार उच्चशिक्षित कुटुंब मर्यादशील, सौजन्यपूर्ण पिऊच्या पसंतीनेच लग्न ठरल होत. थाटा माटात साखरपुडा झाला होता.

तेव्हा मुलाकडचा सगळा परिवार पण सुसंस्कृत वाटला होता. पण हळूहळू पिऊ काजळी धरलेल्या वाती सारखी दिसायला लागली. आपल्याच विचारात असायची. कधीकधी बोलण्याकडे लक्षच नसायच. मैत्रीणी पासून तुटायला लागली होती.

हसण विसरली होती. तिच खळखळून हसण एखाद्याने निरझरा सारख होत आणि थंडावा देणारा प्रसन्न आई-बाबा या दोघांना याबद्दल विपरीत वाटत होत. किती खोदून खोदून विचारलं पण तुला रडू यायच. तुम्हाला सोडून जायच ना का अस मुलीला लग्न करून परक्या माणसात पाठवतात ग. ती हुंदके देऊन विचारायची.

बहुतेक लग्नाचा आई-बाबांना सोडून जाण्याचा ताण आला असेल. तिने मनाची समजूत घातली, उद्यापासून घरात गडबड सुरू होणार बोलायला पण वेळ मिळणार नाही. मग एकमेकांचा सहवास दूरच ती याही जुन्या हळव्या आठवणी काढत बसली होती.

इतक्यात पिऊ चा फोन वाजला वरचा नाव बघून बोलन टाकून ती गच्चीवर गेली. दोघांनाही हसू आलं त्यांनी एकमेकांकडे सूचकपणे पाहिले. इश्य १२:३० वाजले ही काय फोन करायची वेळ आहे का? आज संध्याकाळीच तर भेटले दोघे. झोप येत नसणार ग त्याला आतुर झाला असणार. तो मिश्किल पणे म्हणाला.

थोड्यावेळाने ती गच्चीत बघायला गेली. कानाला फोन होता ती नुसती ऐकत होती, बोलत काहीच नव्हती. काय हा वेडेपणा १ वाजला अशी जागरण केली तर तिच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ येतील. ऍसिडिटी होईल तुम्ही सांगा बघू बस कर म्हणाव उद्या बोल काय ते.

ती रूम मध्ये येऊन नवऱ्याला म्हणाली, पण तो कधीच गाढ झोपला होता. तिलाही झोप लागली मध्येच कधीतरी तिला जाग आली ४ वाजले होते. लगेच ती बाहेर आली गच्चीचे दार उघड होत. पिऊ झोपाळ्यावर गुडघ्यात डोके ठेवुन बसली होती. आणि रडत होती.

तिने तिच्या कडे धाव घेतली पिऊला कुशीत घेतल आईच्या कुशीत शिरल्यावर सगळा बांध कोसळून तिने धाव फोडला. आई त्याला माझ काहीच आवडत नाही ग, माझे केस माझे कपडे सगळ्या वरून नाव ठेवत असतो. म्हणतो मी खुप बडबडये जेव्हा जेव्हा मला भेटतो तेव्हा ओरडत असतो.

काल तर आधी माझ्यावर हात उगारला आणि नंतर सणसणीत चिमटा काढला. हे बघ कस काळ निळ झालय. तिने दंड दाखवला आईचे डोळे पण आता व्हायला लागले होते. आत्ता पण मला तासभर झापत होता. आज त्याच्या घरी गेली होती तेव्हा म्हणे मी मोठ्याने हसली चहा करायला त्याच्या आईच्या अगोदर किचन मध्ये पोहोचली नाही.

भीती वाटते ग आई खूप खूप भीती वाटते. एखाद्या दिवशी मला रागाच्या भरात जाळून तर. आईने गडबडून तिच्या तोंडावर हात ठेवला. तू त्याला फोन लाव दोघींनी दचकून पाहिल पिऊ चा बाबा तिथे उभा होता. त्यांनी सर्व काही ऐकले होते. फोन लाव अहो सकाळपर्यंत थांबूया विचार करुया त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलू या.

पिऊ त्याला फोन लाव सांग हे लग्न मोडल. तुला त्याच्याशी लग्न करायचं नाही, हे आत्ताच सांग त्याला. काय करत आहात पत्रिका वाटून झाल्यात उद्यापासून पाहूणे यायला सुरुवात होतील. लोक काय म्हणतील फोन लाव हे काम तुलाच करायचे आहे.

काय करायचे ते मी बघेल पण त्याला नाही म्हणण्याचा हक्क अधिकार तुझाच आहे. फोन कर पिऊने फोन करून थरथरत्या आवाजात त्याला लग्नासाठी नकार सांगितला. तो काहीतरी जोरदार ओरडत होता. आता फोन स्विच ऑफ कर पिऊ झोपूया आता.

आपल्याला विश्रांती हवी आहे. उद्या बरीच काम करायचे आहे सगळी बुकिंग कॅन्सल करायचे आहे. पाहुण्यांना न येण्याबद्दल कळवायचे आहे झोपायचा प्रयत्न करूया. तिला एका हाताने जवळ घेऊन आणि तिला थोपटत त्यांनी गच्चीचा दरवाजा बंद केला.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *