परदेशात राहणारी मुलगी 2 वर्षानंतर आईला भेटायला आली आणि तिला जे दिसले ते पाहून ती हादरून गेली.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

कॅलिफोर्निया मध्ये राहणाऱ्या आपल्या लेकीला बाबांनी कॉल करून सांगितला पिऊ बेटा आईची तब्येत मधून मधून बरी नसते. तू तशी तिच्याशी रोजच फोनवर बोलते पण चार-पाच दिवसांपूर्वी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते पण आता सर्व काही ठीक आहे तिला डिस्चार्ज मिळाला आहे. आता तशी ती बरी आहे पण तुझी खूप आठवण काढते. पिउला दोन दिवसांपूर्वी आलेला बाबांचा फोन बेचैनी आणि चिंतेत टाकून गेला.

कधी एकदा इंडिया मध्ये जाऊन आईला बिलगते असे तिला झाले. पियु प्रशांत सोबत कॅलिफोर्निया मध्ये राहत होती. प्रशांतला कॅलिफोर्निया मधून चांगली ऑफर मिळाली त्यामुळे त्याने लगेच होकार दर्शवला आणि पिऊ लगेच आपला एका महिन्यात पासपोर्ट आणि व्हिसा तयार करून कॅलिफोर्निया साठी रवाना झाली. तिकडे जाऊन तिने सुद्धा कॅलिफोर्नियामध्ये छोटा-मोठा जॉब मिळवला दोघेही हळूहळू कॅलिफोर्नियामध्ये सेट होते. आईने तर आमच्या लग्नाच्या वेळी आम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्या होत्या.

आणि म्हणाली होती पिऊ बेटा मुले मोठे झाल्यावर त्यांना पंख फुटतात आणि त्यांना उंच आकाशामध्ये भरारी घ्यायची असते आणि आई-वडिलांचेही हेच काम असते की त्यांना या भरारीसाठी प्रोत्साहित करायचे. तू कुठेही गेली तरी माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. असे म्हणून तिने आम्हाला निरोप दिला होता. प्रशांत तर तिच्या अगदी मनासारखा होता. आमचे लव मॅरेज होते, प्रशांत ला चांगला जॉब होता सुंदर शिक्षण आणि चांगला स्वभाव त्याच्यामध्ये होता. म्हणून तो माझ्या आई-वडिलांना लगेच आवडला होता.

लग्नानंतर लगेच दोन महिन्यांमध्ये प्रशांतला US ची ऑफर आली. त्यानंतर आम्ही कॅलिफोर्नियामध्ये आलो इकडे येऊन दिवस किती पटापट गेले कळलेच नाही. भारतात जाणे शक्यही झाले नाही. बर इकडे भारतातील वेळेचा आणि अमेरिकेतील वेळेचा ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे आम्ही जेव्हा इंडियात फोन करायचो तेव्हा रात्र असायची म्हणून त्यानंतर फक्त रविवारी आमच बोलण होऊ लागल. बाबांचा अचानक पणे आलेला फोन मला बेचैन करून गेला.

मी रात्री लगेच प्रशांतला सांगितल की, मला आईची खूप आठवण येत आहे मला तिच्याशी भेटायच आहे. म्हणून मी इंडियात जायचा विचार करत आहे. त्यावर प्रशांत म्हणाला हे बघ मी आता जरा एक महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. त्यामुळे माझ्यासाठी इंडिया मध्ये येण शक्य नाही. तू एक काम कर तू आधी जाऊन ये मी तुझ्या मागे पंधरा ते वीस दिवसांमध्ये येतो. असे बोलून प्रशांतने लगेच दोन दिवसानंतर चे फ्लाईटचे तिकीट बुक करून दिले.

त्यानंतर मला आईला भेटण्याचा योग आणि आनंद दिसून आला. मी प्रशांत ला म्हणाले हे बघ प्रशांत मला आईला सरप्राईज द्यायचे आहे. त्यामुळे माझी येण्याची बातमी आईला सांगू नका. आणि तुम्ही माझी काळजी करू नका कारण मी मुंबईतली आहे आणि माझा जन्मही मुंबईमध्ये झालेला आहे. त्यामुळे मुंबई मला तोंडपाठ आहे. असे बोलून ती इंडिया ला रवाना झाली. तसं विमानाने टेक ऑफ केल तस माझ्या आठवणीने ही टेक ऑफ केल. मला अचानक आलेली बघून आई कशी दचकेल याचा मी विचार करू लागली.

लहानपणी कस शाळेतून आल्यावर मी आई किचनमध्ये असताना चोरपावलांनी किचनमध्ये जायची आणि हळूच आईचे डोळे दाबायची आणि म्हणायची ओळख बघू त्यावर आई म्हणायची अगं वेडे बोलतेस कशाला मी तर तुला तुझ्या आवाजानेच ओळखून घेईल. अस म्हणून आई आणि मी खूप हसायचे. अशा अनेक प्रकारच्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. त्यानंतर तिने फोन स्विच ऑफ केला आणि त्यानंतर कधी डोळा लागला हे समजलेच नाही. जेव्हा डोळा उघडला त्यानंतर मी इंडिया मध्ये होती.

माझी फ्लाईट लँड करणारच होती मी माझा सामान आवराआवर करू लागली आणि फ्लाईट लँड झाली. मी विमानतळाबाहेर आली आणि विचार केला आता टॅक्सीतून डोंबिवली मध्ये जायचे आणि घरी जाऊन आईचे डोळे दाबायचे आणि तिला घट्ट मिठी मारायची. असा विचार करत असतानाच प्रियाला तिची आई घ्यायला आलेली दिसली. तेवढ्यात प्रिया तिच्याजवळ गेली आणि म्हणाली आई तू इकडे कशी काय मला घ्यायला आली मला काय मुंबई नाही माहित का?

आई मी तुला सरप्राईज देणार होते, पण मी येणार आहे तुला कसे कळले. तेव्हा आई म्हणाली अग वेडे आईला सर्व कळते तू आई होशील ना तेव्हा तुला सर्व समजणार. आई म्हणाली चल आता इथेच गप्पा मारत बसणार का तेवढ्या टॅक्सी आली आणि ते घरी जाऊ लागल्या. टॅक्सीमध्ये ते दोघे खूप गप्पा मारत होत्या. तेवढ्यात पिऊ म्हणाली आई तुला US मधली एक गंमत सांगू का? यूएस मध्ये हॅलो वि नावाचा एक सण झाला. सन म्हणजे आपण जस मेलेल्या व्यक्तीचे श्राद्ध करतो त्या प्रकारे तो सण असतो. पण ते लोक हा सण उत्साहाने करतात.

आपले पूर्वज घरी जेवणासाठी येणार म्हणून सर्वांना खूप आनंद होतो. दारावर त्यांच्या स्वागतासाठी भुताचे मुखवटे लावले जातात. मुलेसुध्दा भूतांचे मुखवटे घालून वावरतात. एकंदरीत पूर्वजांचे जंगी स्वागत करतात. आई अस खरच येत असतील का ग मेलेला व्यक्ती परत भेटायला. आई म्हणाली हे बघ एखाद्या व्यक्तीच्या कोणावर निस्वार्थ आणि निरपेक्ष प्रेम असेल आणि जिवंतपणी त्यांची भेट झालेली नसेल तर असे खरच होते.

जसे एक आई आपल्या आपण त्याला न भेटून अचानक गेली आणि तिचा जीव जर आपल्या अपत्यात अटकलेला असेल तर ती नक्की भेटायला येते. असे बोलता बोलता डोंबिवली कधी आले हे कळले सुद्धा नाही. प्रवासात तर अनेक वेळा आईने तिला मिठ्या मारून म्हणायची खरच प्रिया तुझी खुप आठवण येत होती. तेव्हा प्रिया म्हणायची मग आई घरी तर येऊ दे का इथेच मिठ्या मारून मन भरून घेशील. पियू आता मला असे वाटत आहे की, तुला माझ्या मिठीत असेच धरून ठेवायचे जसे मी तुला लहानपणी धरून ठेवायची.

टॅक्सी आता डोंबिवलीत शिरली होती. कधी एकदा घरी येते असे प्रियाला वाटत होते. आई मात्र आता शांत बसली होती. तेवढ्यात टॅक्सी सोसायटी समोर येऊन उभी राहिली आई म्हणाली प्रिया तू तुझी बँक घेऊन जा आणि बाबांना सरप्राईज दे. अमेरिकन डॉलर टॅक्सी वाला काही घेणार नाही त्यामुळे तु जा मी पैसे देऊन येते. प्रिया अगदी उत्साहाने आईला लवकर ये असं सांगून लिफ्टकडे पण आली कधी एकदा सहावा मजला येतो आणि मी बाबांना सरप्राईज देते असे तिला झाले.

प्रिया सहाव्या मजल्यावर आली तिने दाराची बेल वाजवली आणि बाबाही आधीच प्रियाच्या येण्याची वाट बघत होते. बाबांनी दार उघडताच त्यांचा खिन्न चेहरा प्रियाला दिसला. प्रिया म्हणाली बाबा काय झाले तुम्हाला सर्व ठिक तर आहे ना आई टॅक्सी चे पैसे देऊन येत असेल वरती थांबा मी बघते. प्रिया आत आली आणि बघते तर काय आईच्या फोटोला मोठा हार घातला होता. मेणबत्ती आणि दिवा फोटोसमोर मंद जळत होता.

प्रिया ते पाहतात किंचाळली आणि म्हणाली नाही बाबा हे खर नाही. आईतर मला एअरपोर्टवर घ्यायला आली होती. आम्ही तर टॅक्सी मध्ये कितीतरी गप्पा मारत आलो. त्यावर बाबा म्हणाले नाही बेटा काल रात्री अचानक तिला हार्ट अटॅक आला आणि ती गेली. हॉस्पिटलमध्ये ही नेता आले नाही. शेवटी तुझी खुप आठवण काढत होती, तुला फोन नाही लावला पण तुझा फोन सारखा स्विच ऑफ येत होता. प्रिया तशी धावतच लिफ्टकडे गेली आणि खाली वाकून बघते तर काय ड्रायव्हर निघून गेलेला होता आणि तिची आई ही तिला दिसत नव्हती.

प्रिया त्या निघून गेलेल्या टॅक्सी कडे बघतच राहिली होती. पिया विचार करू लागली की, हा मला स्वतःचा झालेला भास होता की आई मला खरंच भेटायला आली होती. आई म्हणाली होती की एखाद्या आईचे तिच्या अपत्यावर प्रेम असेल तर ती तिला भेटायला येऊ शकते. असा विचार करून प्रिया मनातल्या मनात गुदमरू लागली.

तर मित्रांनो कशी वाटली कहाणी नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *