चैत्र नवरात्रीला जुळून येतोय पंच राजयोग या राशींच्या लोकांना लागणार लॉटरी..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी चैत्र महिना सुरू झाला आहे. यावर्षी पाच राजयोग तयार होत आहेत. जे सर्व राशींसाठी शुभसिद्ध होतील. चैत्र महिन्याच्या दुसऱ्या पंधरा वड्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला यावेळी पाच ग्रहांच्या युतीने सुरुवात होत आहे. यासह हिंदू नववर्षाची सुरुवात होईल. अशा विशेष संयोगात सूर्यदेव, चंद्र, गुरु,बुध नेपच्यून या ग्रहांचा राजा मीन राशीत एकत्र बसतो.

ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून हे ग्रहांचे संयोग खूप चांगले मानले जातात. ज्यांची प्रत्यक्षदृष्टी ही कन्या राशींवर असेल. चला तर मग जाणून घेऊयात पाच ग्रहांच्या संयोगाने कोणत्या राशींना विशेष लाभ मिळेल.

१) मिथुन रास- मिथुन राशींच्या लोकांना मीन राशीत तयार झालेल्या ग्रहांच्या संयोगाचा फायदा होईल. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात आणि आई दुर्गेचा विशेष आशीर्वाद व्यवसायात दिसून येईल. यादरम्यान तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण असेल. परस्पर संबंध मधुर राहतील. प्रिय व्यक्तीकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

२) कर्क रास- कर्क राशींच्या लोकांना ग्रहांच्या महापंचायतीचे शुभ परिणाम बघायला मिळतील. त्याच्या प्रभावाने तुम्हाला नोकरीत बढतीची बातमी मिळू शकते. त्याचवेळी तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जोडप्याने मिळून माता लक्ष्मीची पूजा करून नैवेद्य अर्पण केल्यास आर्थिक स्थिती चांगली राहील आणि नशीब तुमच्यावर अनुकूल राहील.

३) कन्या रास- कन्या राशीच्या लोकांना ग्रहांच्या महायुतीमुळे प्रभावामुळे आर्थिक बाबतीत विशेष लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. या नवरात्री तुम्ही घर किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. करियर आणि व्यवसायात प्रगती होईल. जे काम तुम्ही खूप दिवसांपासून करत होता. ते काम आता पूर्ण होऊ शकते. या काळात महिला सोने खरेदी करू शकतात आणि कन्या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो.

४) मीन रास- बृहस्पती राशींच्या मीन राशिवर माता दुर्गे चा विशेष आशीर्वाद असणार आहे आणि तुमच्या आनंदात वाढ सुद्धा होईल. पैसे गुंतवण्याची ही योग्य वेळ आहे आणि भविष्यात तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे.

यावेळी तुम्ही तुमच्या करियर बाबत मोठा निर्णय घेऊ शकता. हा निर्णय तुमच्यासाठी मोलाचा दगड ठरू शकतो. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *