नमस्कार मित्रांनो.
तुमच्या हातात पैसा टिकत नाहीत का? आणि त्यामुळे तुम्ही कुठली आर्थिक जबाबदारी स्वीकारायला घाबरता का? म्हणजे काय होत माहित नाही. पैसा टिकत नाही आणि तो उडून जातो किंवा पाय फुटल्यावर निघून जातो. अशी समस्या तुमची सुद्धा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
कारण या माहितीमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार असे तीन उपाय बघणार आहोत. ज्यामुळे तुमचा पैसा घरात टिकेल आणि वाढेल ही चला तर मग सुरुवात करूया.
मित्रांनो आजच्या या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये पैसा घरात येण्यासाठी अवघड आहे. बर तो घरात आल्यानंतर टिकण ते अवघड असते. कारण आरोग्याच्या तक्रारी असतात, घरातील छोट्या मोठ्या समस्या असतात, अनावश्यक खर्च त्यामुळे खर्च होत राहतो.
इन्कम कमी आणि खर्च जास्त अशी प्रत्येकाची समस्या आहे. म्हणूनच तुम्ही वास्तुशास्त्राने सांगितलेल्या तीन उपाय करून बघू शकता. ज्यामुळे आलेला पैसा टिकेलही आणि टिकला तर तो वाढणार ही आपोआपच आहे. चला तर मग बघूया उपाय.
१) पहिला उपाय म्हणजे पैसा ठेवण्याची जागा बदलून बघा. हा उपाय ऐकल्या क्षणी आपली आई किंवा आजी आठवले असेल. त्या कधीही एका जागी पैसे ठेवलेले नसत. कधी तांदुळाच्या डब्यात तर कधी पिठाच्या डब्या खाली तर कधी देवघरात आणि याच कारण की एकट्या तिजोरी ठेवलेला पैसा खर्च झाला की ऐनवेळी लोकांसमोर पैशांसाठी हात पसरण्याची वेळ येते.
म्हणूनच आपण बचत केलेला पैसा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावा. वेळेला तो उपयोगी पडतो. बचतीचा हाच मार्ग बँका सुद्धा अनुसरता एकाच बँकेच्या ठेवीत ग्राहकांचा पैसा सुरक्षित कसा राहील या दृष्टीने तसबीज करतात. वास्तुशास्त्र सुद्धा हेच सांगतय.
२) दुसरा उपाय म्हणजे घरात सुरक्षित पैसा कुठे ठेवायचा हा प्रश्न वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेच्या देवतांचा संबंध पैशाची आहे. त्यामुळे तिजोरी पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला ही तुम्ही तिजोरी ठेवू शकता. अस केल्याने संपत्तीत वाढ होते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहते.
३) घरातल्या काही दिशा आशा आहेत. तिथे पैसा चुकूनही साठवू नका. वास्तुशास्त्राच्या मध्ये घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नये. कारण यामुळे धनाची हानी होते. शिवाय संपत्तीची वाढ ही थांबते. बराचसा आरोग्याच्या समस्यांवर खर्च होतो. यासाठी तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये.
तसेच दक्षिण दिशेला जमा केलेला पैसा सुद्धा ठेवू नये. तो अनैतिक कामांसाठी खर्च होऊ शकतो. पैशांचा दुरुपयोग होण्याआधीच सावध व्हा आणि हा पैशांची खर्चिक वाचून सुद्धा पैशांची बचत कमी करू शकता हे लक्षात घ्या.
मित्रांनो हे तीन उपाय झाले वास्तुशास्त्रानुसार पण आणखीन एक उपाय असा आहे जो पैसा घरात टिकावा आणि वाढावा यासाठी तुम्ही करू शकता. तो म्हणजे घरात नेहमी दररोज महालक्ष्मी अष्टक म्हणणे. हे अष्टक अगदी सोपे आहे, म्हणायला सुद्धा सोपे आहे.
जर तुम्ही दररोज देवाजवळ दिवा लावून महालक्ष्मी अष्टक म्हटल तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर निश्चितच होईल आणि अनावश्यक खर्चांमध्ये तुमचा पैसा खर्च होणार नाही.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.