दिवसभरात घ्या या तीन बिया. हाडे होतील मजबूत.. कोणताही आजार पाठी लागणार नाही..

Health and Fitness

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो हल्लीच्या काळात जेवणाकडे अनेकांचे दुर्लक्ष होत असते, फक्त भूक लागली की बाहेरून काही ऑर्डर करून आपण खात असतो पण त्यातून आपल्या शरीराला कितपत पोषण मिळते याचा पण अजिबात विचार करत नाही. फक्त पोट भरले की विषय संपला असा आपण विचार करतो. पण पोषण नाही मिळाले तर आपल्या शरीरातील जी हाडे आहेत ती कमजोर होतात.

त्यांचा कठीणपणा हळूहळू गायब व्हायला लागतो आणि मग निराळे आजार उद्भवतात. हे सर्व कमी करण्यासाठी आपण पुन्हा दवाखान्याला मोठ्या प्रमाणात पैसे घालतो. पण मित्रहो आजचा उपाय आपल्याला या सर्वांपासून नक्कीच वाचवणारा ठरेल. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये तसेच बदलते, वातावरण आपल्या शरीराची आवश्यक तेवढी काळजी घेत नाही.

त्यामुळे आपणास वारंवार थकवा कमजोरी जाणवते, बऱ्याच माता-भगिनींच्या हाता पायाची आग होणे, नेहमी पिंढऱ्यास गोळे किंवा पिटक्या जाणवतात. वारंवार कमरेमध्ये जीव नसल्यासारखे जाणवते, नेहमीच झोपून राहावे असे वाटत असते सोबतच वारंवार शरीरात अशक्तपणा जाणवतो उत्साह जोश नाहीसा झाल्यासारखे वाटते, तसेच नेहमी सांधेदुखी हाडे दुखीचा त्रास होत असेल.

बऱ्याच व्यक्तींना हिमोग्लोबिन कमी असणे कॅल्शियमची कमी भासणे या व इतर सर्व समस्येवरती आजचा हा उपाय रामबाण ठरणार आहे. मित्रहो आजचा उपाय करण्यासाठी आपणाला दोन बिया लागणार आहेत. या बिया आपणा सर्वांनाच माहित आहेत. त्यांच्याबद्दल खूपशी माहिती इंटरनेटवरून देखील आपण मिळवू शकतो.

या बिया आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत, या बिया आहेत खजूर, मार्केटमध्ये खजूर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. मार्केट मध्ये कच्चे खजूर देखील मिळतात ते देखील तुम्ही वापरू शकता, यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात. जे आपल्या हृदय आणि डोळ्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. ज्यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

यामध्ये असणारे भरपूर फायबर पोट साफ होण्यास मदत करते. खजूर मध्ये हाडांच्या आरोग्यास फायदेशीर असणारे फॉस्फरस, लोह असते सोबतच मॅग्नेशियम कॅल्शियम देखील असते, ज्यामुळे ठिसूळ बनलेली हाडे अगदी मजबूत बनतात तसेच रक्त वाढते रक्त शुद्ध होते. ॲनिमिया सारखे आजार कमी होतात म्हणून तर डॉक्टर देखील सध्या गरोदर महिलांना खजूर खाण्याचा सल्ला देत असतात.

असा उपाय करण्यासाठी आपणाला लागणार आहे दोन खजूर, खजूर मधील बिया आपणास काढून घ्यायचे आहेत. यानंतर आपणाला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बदाम. बदाम हे प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच आपली बुद्धी वाढवण्याचे काम देखील करते म्हणून यामध्ये आपल्याला चार बदाम लागणार आहेत.

त्यानंतर आपणाला लागणार आहेत काजू, काजूमध्ये बायो ऍक्टिव्ह मायक्रोन्यूट्रिएंट्स नावाचा घटक असतो. ज्यामुळे आपले हृदय तंदुरुस्त बनते यासोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम घटक असतात म्हणून काजू आपणाला चार-पाच लागणार आहेत. त्यानंतर आपणाला यामध्ये शेवटचा घटक लागणार आहे.

तो म्हणजे दूध, दुधाचे पौष्टिकता शरीर सुंदर आणि मजबूत बनवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. हे सर्व पदार्थ आपणाला मिक्सरच्या मदतीने बारीक करून घ्यायचे आहेत, हा उपाय आपणाला सलग सात दिवस करायचा आहे नक्कीच तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल तुमची सर्व हाडे मजबूत होतील, आरोग्य उत्तम राहील.

मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला अतिशय उपयुक्त असेल अशी आम्हाला आशा आहे. जर हा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

विशेष सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *