कोणीही घ्या २ मिनिटांत ताप, थकवा, शारीरिक उष्णता, गायब. रक्त भरपूर प्रमाणात वाढेल.

Health and Fitness

नमस्कार मित्रांनो.

आज मी तुम्हाला अशी एक हेल्थ टिप्स सांगणार आहे त्याचा वापर घरामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत कोणीही करू शकतो. म्हणजेच जर घरामध्ये कोणाला ताप आलेला असेल त्या व्यक्तीला शारीरिक उष्णता असेल किंवा हात पाय दुखत असतील आणि या उपायाने रक्तही वाढेल. बऱ्याच वेळा शारीरिक उष्णता आणि ताप आल्यामुळे आपल्या तोंडाची चव जाते.

तर अशा काही समस्या असतील तर आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला अगदी साधा आणि सरळ उपाय सांगणार आहे. तर बघा मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या घरातील व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्त कमी असत. त्यामुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवतो आणि त्यांच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते त्यांच अंग कायमस्वरूपी गरम असत किंवा त्यांना शारीरिक थकवा येतो.

हाता पायाला मुंग्या येतात किंवा एखाद्या व्यक्तीला ताप आलेला असेल, ताप येण्याची कारणे वेगवेगळी असतात. परंतु हा ताप जर आपल्याला कमी करायचा असेल तर यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. यासाठी आपल्याला आपल्या घरातील पदार्थ लागतात तर पहिली गोष्ट म्हणजे खजूर तर आपल्याला या खजूर मध्ये ओली खजूर चा उपयोग करायचा आहे. कारण ओल्या खजूर मध्ये विटामिन बी सी ए असतात.

त्यासोबतच खजूर मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते म्हणजे ज्या व्यक्तीच्या शरीरात रक्त कमी आहे आणि त्याला शारीरिक थकवा जाणवतो त्याच्यासाठी खजूर खूप फायदेमंद असते. तर आपल्याला या उपायासाठी आधी ३ ते ४ खजूर घ्यायचे आहे. ते खजूर जास्त घेतले तरी चालेल याचा कोणताही साईड ईफेक्ट नाही. आपण आपल्या उपायासाठी तीन ते चारच घ्यायचे आहे.

त्या खजूर मधील बी आपण काढून टाकायची आहे आणि राहिलेले खजूर त्याचा वाटीमध्ये थोडेसे पाणी घेऊन त्याचा भुगा करायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला लागेल ते म्हणजे जिरा पावडर तुमच्या घरामध्ये जिरा पावडर जर नसली तर तुम्ही जिऱ्याची पावडर करून त्याचा वापर करू शकतात. तर जिरे हे आपल्या शरीरातील शारीरिक उष्णता कमी करण्यासाठी खूप चांगले असतात.

तुम्ही बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये जीरा पावडरचा उपयोग केल्याचे बघितले असेल. शारीरिक उष्णता अधिक थकवा व तोंडाची गेलेली चव कमी करण्यासाठी जिरेचा उपयोग केला जातो. तर तुम्हाला खजुरच्या भुग्यात जिऱ्याची पावडर टाकायची आहे. आणि तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे खडीसाखर तर मित्रांनो खडीसाखरेची पावडर सुद्धा उपलब्ध असते तर पावडर उपलब्ध नसली तर तुम्हाला खडीसाखर घ्यायची आहे.

त्याला त्या मिश्रणामध्ये वीरघळायची आहे आणि या तिन्ही पदार्थांचे मिश्रण एकत्रित करायचे आहे. तर हे मिश्रण ज्या व्यक्तीला खूप ताप आलेला आहे त्या व्यक्तीने सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा घेतले तरी चालते आणि ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये खूप शारीरिक उष्णता आहे. ताप आलेला आहे किंवा ज्या व्यक्तीला चक्कर येतात अशा व्यक्तीने घेतले तरी चालेल आणि या उपायाचा फायदाच होतो.

नुकसान कोणत्याही प्रकारचे होत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला शारीरिक थकवा कमी करायचा असेल, ताप कमी करायचा असेल, हाता पायाला मुंग्या येत असतील किंवा ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे. अशा व्यक्तीने हा उपाय नक्की करून बघा. फक्त ज्यांना मधुमेह आहे त्या व्यक्तींनी यात गोड पदार्थ असल्याने हा उपाय करू नका.

किंवा कमी प्रमाणात घ्या किंवा घेऊच नका. फक्त मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना या उपायाचे रिस्ट्रीक्शन आहे बाकी लहानपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत कोणीही हा उपाय करू शकतात. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही अगदी घरगुती पदार्थ आहे तुम्ही याद्वारे आपले आरोग्य चांगले ठेवू शकतात.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *