नमस्कार मित्रांनो.
पुत्रदा एकादशीच्या दिवशी विवाहित महिला या दिवशी आपल्या मुलांसाठी व्रत करतात, पूजापाठ करतात. त्यासोबतच काही सेवा काही उपाय किंवा तोडगे सुद्धा करतात. तर असाच एक उपाय आम्ही आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला फक्त १८ ऑगस्ट पुत्रदा एकादशीच्या दिवशी घरी ही एक वस्तू आणायची आहे.
मित्रांनो ही वस्तू तुम्हाला कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये सहजपणे उपलब्ध होऊ शकते. तर ही वस्तू तुम्ही १८ ऑगस्टच्या दिवशी सुद्धा आणू शकतात किंवा त्या आधी सुद्धा आपल्या घरात आणून ठेवू शकतात. ती वस्तू आहे लाल रंगाचा दोरा होय मित्रांनो लाल रंगाचा दोरा किंवा रंगीबेरंगी दोरा जोकी आपण सत्यनारायण किंवा कोणत्याही पूजेमध्ये वापरतो आणि आपल्या हातामध्ये बांधतो.
पिवळा, लाल किंवा नारंगी रंगाचा दोरा तुम्हाला पूजा सामग्री च्या दुकानातून आणायचा आहे. तुम्हाला ५-१० रुपयांचा तो दोरा आणायचा आहे आणि पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून आपल्या देवघरामध्ये तो दोरा ठेवायचा आहे. दोरा देवघरामध्ये ठेवल्यानंतर त्याला हळद-कुंकू आणि अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहे.
त्यानंतर आपल्याला फक्त ११ वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र जप झाल्यानंतर तुम्ही तिथून उठू शकतात आणि आपण जेव्हा संध्याकाळच्या वेळी देवपूजा करतो. तेव्हा देवासमोर दिवा अगरबत्ती लावून तो दोरा तेथून उचलायचा आहे आणि आपल्या मुलांना हातावरती बांधायचा आहे. तुम्ही तो दोरा तुम्हाला जास्त मुल असतील तर त्या हिशोबाने तुम्ही तो दोरा देवघरामध्ये ठेवू शकतात.
म्हणजे जास्त दूर ठेवला तर सगळ्या मुलांना बांधू शकतात. आणि महत्वाचे म्हणजे तो दोरा बांधताना आपल्याला फक्त एक वेळेस तो दोरा आपल्या हातावर गुंढाळायचा आहे त्यापेक्षा जास्त नाही. हा दोरा कायमस्वरूपी तुमच्या मुलांच्या हातामध्ये असायला हवा म्हणजे पुढच्या पुत्रदा एकादशी पर्यंत हा दोरा तसाच तुमच्या मुलांच्या हातामध्ये असायला हवा.
आणि जी पुढची पुत्रदा एकादशी येईल. तेव्हा हाच उपाय तुम्ही परत करू शकतात. आणि जुना दोरा तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकतात. तर १८ ऑगस्ट मोठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करा.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.