श्रावण महिना संपण्या आधी घरात आणा या ५ पैकी कोणतेही एक झाड पैसाच पैसा येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

श्रावण महिना हा एक पवित्र महिना आहे या महिन्यापासून आपण एखाद्या पूजेची किंवा व्रताची सुरुवात करू शकतो. कोणतेही कार्य करण्यासाठी श्रावण महिना हा खूप शुभ मानला जातो. त्यामुळे श्रावण महिना संपण्याआधी आपल्या घरात या पाच वस्तू आणा यामुळे आपल्याला खूप लाभ होईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीचे खूप महत्त्व आहे प्रत्येक हिंदूच्या दारापुढे तुळस ही असतेच जर तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर खूपच चांगले परंतु नसेल तर या महिन्यामध्ये दारात तुळस लावणे हे खूपच चांगले असते.

याला सायंटिफिक कारण सुद्धा आहे कारण या महिन्यांमध्ये रिमझिम पाऊस चालू असतो. तर तुळसच नाही तर दुसरे कोणते ही झाडे या महिन्यामध्ये लवकर वाढतात. त्यांची मुळे जमिनीमध्ये घट्ट होतात व ती वेगाने वाढतात. म्हणून तुमच्या दारात तुळस नसेल तर या महिन्यात लावा आणि आधीपासूनच असेल तर तिचे पूजन करा.

रोज तुळशीसमोर दिवा लावा. दारासमोर तुळस लावण्याचे योग्य स्थान म्हणजे ईशान्य दिशा किंवा इकडे तुळस लावणे शक्य नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला सुद्धा तुळस लावू शकतात. असे म्हणतात की, ज्यांच्या द्वारा मध्ये तुळस असते त्यांना कधीच अन्नधान्याची व कशाचीही कमतरता जाणवत नाही. कारण तुळशीला साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. तुळस सुखसमृद्धीचे प्रतीक आहे.

जर तुम्हाला देवघरामध्ये एखादी मूर्ती स्थापन करायची असेल किंवा तुम्हाला देवघरामध्ये एखादी फोटो स्थापन करायचा असेल. नाहीतर तुमच्या देवघरा मधील मूर्ति खंडित झालेली असेल तर ती नवीन मूर्ती आणण्यासाठी हा श्रावण महिना खूप शुभ महिना आहे. कारण कोणतेही कार्य शुभमुहूर्तावर झाले तर त्याचे फळही आपल्याला शुभ मिळतात. म्हणून देवी-देवतांना आपल्या घरांमध्ये आणायचे असेल तर श्रावण महिना सारखा पवित्र महिना कोणताही नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एखाद्या व्रताची सुरुवात करायची असेल म्हणजेच प्रदोष व्रत किंवा साप्ताहिक व्रत म्हणजेच सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार तर हे व्रत सुरू करण्यासाठी सुद्धा ही अतिशय शुभ वेळ आहे. आपल्या हिंदु धर्मानुसार जर तुम्ही या महिन्यात या व्रताची सुरुवात केली तर याचे कितीतरी पटीने जास्त फळ आपल्याला प्राप्त होते. जर तुम्हाला एखादा व्रत सुरू करण्याची तुमची इच्छा असेल तर या महिन्यात सुरु करा. हे तुम्हाला खूप शुभ फळ देणारे असेल.

महादेवाला श्रावण महिन्यात शमीची पाने आणि फुले अर्पण केले जातात. हे झाड घरी असणे खुपच लाभदायक असते. यामुळे घरात बरकत असते. म्हणून श्रावण महिन्यात घरात किंवा बाल्कनीन किंवा टेरेस वर जेथे शक्य असेल तिकडे शमीची झाड जरूर लावावे.

शनिवारी पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्यास आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते व आपले घर धनसंपट्टीने भरून जाते. पण प्रत्येक शनिवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाचे पूजन करणे शक्य नसेल तर आपण शमीच्या झाडाचे पूजन करावे. त्यालाही पाणी फुले तूप अर्पण करावे त्यामुळे आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या पूजनाचे फळ प्राप्त होते. व तसेच घरामध्ये अन्यधान्यामध्ये आणि संपत्तीमध्ये बरकत येते. म्हणून श्रावण महिन्यामध्ये शमीचे झाड आणा व दारात लावा आणि त्याचे पूजन करून महादेवांना प्रसन्न करा व सोबतच देवी लक्ष्मीलाही प्रसन्न करा.

पुढील वस्तू म्हणजे जर आपल्याला घरामध्ये एखादी यंत्र आणायचे असेल म्हणजे श्री यंत्र, व्यापार वृद्धि यंत्र किंवा इतर कोणतेही यंत्र तर असे यंत्र आणण्यासाठी हा महिना खूप शुभ आहे. तसे तर ही यंत्रे दिवाळीला घरात आणली जातात. परंतु दिवाळीला अजून खूप वेळ आहे म्हणून तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये हे यंत्र घरात आणू शकतात. यंत्र घरी आल्यानंतर त्याला गंगेच्या पाण्याने शुद्ध करावे.

त्यानंतर त्याचे पूजन करावे त्यासाठी हळद कुंकू व अक्षदांचा वापर करावा. उपलब्ध फुले अर्पण करावी श्रीसुक्ताचा जप करावा कमीत-कमी ११ वेळा श्रीसुक्ताचा जप करावा. त्यामुळे हे यंत्र सिद्ध होते व त्यानंतर घरात योग्य ठिकाणी या यंत्राची स्थापना करावी. व रोज धूप लावून त्याचे पूजन करावे. श्रावणाच्या या पवित्र महिन्यात तुम्हाला या उपायांपैकी जो उपाय करणे शक्य असेल तो उपाय करा आणि आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी आणि धनाचे आगमन करा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *