काळजाला भिडणारी कथा, लिव्ह इन रिलेशनशिप.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

डॉक्टरांच्या राउंड नंतर बाधितांच्या अतिदक्षता विभागामध्ये शांतता होती. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर अशा अनेक उपकरणांवर मृ-त्यू-शी झुंज देत मी निवांत पडली होती. त्यात पुन्हा एसीने गारठलेल्या अतिदक्षता वार्डात ड्युटीवर असलेल्या परिचारिका रात्रीच्या वेळी केस पेपरवर कुठलीतरी नोंद घेण्यात व्यस्त होत्या. त्यानंतर त्या वार्डात असलेल्या एका बेडवर मोबाईलवरून आवाज करणाऱ्या आवाजाने त्यांचे लक्ष विचलित केले.

ती परिचारिका बेड जवळ गेली. रुग्णाला आपल्या घरी बोलता याव किंवा घरच्यांशी सम्पर्क राहावा म्हणून डॉक्टरांनी मोबाईल ठेवायची मुभा दिलेली होती. त्या बेडजवळ पोहचल्या तेव्हा ३२ वर्षाचा रुग्ण ऑक्सिजन लावून श्वास घेताना त्रास होत असलेला तो तरुण बेडवर पडलेला होता. त्याची तब्येत कमालीची खालावली असल्याने त्याला दोन तीन दिवसांपूर्वी इथे हलवण्यात आले होते. आला तेव्हा बऱ्यापैकी भानावर असला तरी आता दिवस जात होते तशी त्याची प्रकृती ढासळत होती.

दरम्यान मोबाईल अजूनही वाजत होता तेव्हा सिस्टरांनी मोबाईल कानाला लावला व म्हणाल्या हॅलो सिस्टर बोलतेय मी तुम्ही कोण तुमच्या पेशंटला बोलायची परवानगी नाही आहे. त्याने ऑक्सिजन लावलेला आहे तुम्ही नंतर फोन करा हॅलो हॅलो सिस्टर कृपया फोन बंद करू नका. मला आता या क्षणी बोलायच आहे. त्याच्याशी अहो मॅडम एक वेळा सांगितल ना पेशंट बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे. उगाच अवेळी फोन करून डिस्टर्ब् करू नका. अहो सिस्टर फक्त ५ मिनिट बोलू द्या ना मला उद्या कदाचित खूप उशीर होईल हवतर मोबाईल स्पीकरवर ठेवा.

कृपया मला समजून घ्या, सिस्टर नाही तर स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही मी. अहो तुम्ही अस रडू नका मी प्रयत्न करते पण तुमचा आवाज पोहोचेल का त्यांच्यापर्यंत? ठीक आहे. मोबाईल स्पीकर वर ठेवते बोला तुम्ही. मंदार ये मंदार कसा आहे, अरे काहीच कस वाटल नाही तुला अखेरचा निरोप द्यायला तरी येशील ना? मान्य करते की, तुझ्या कसल्याही फोनचा आणि मेसेज चा रिप्लाय देणे मी बंद केले आणि अगदी वूमन्स डे ला किती छान पोस्ट पाठवली होती तू पण मी त्यालाही इग्नोर केल.

आज मात्र असल्या दोन ओळी चा मेसेज बघून हादरलीच मी. अरे घट्ट मैत्रीतुन कधी एकमेकांवर प्रेम करायला लागलो होतो. कळल सुद्धा नव्हत आपल्याला मात्र जसजसा आपण मनाने जवळ येत गेलो. तस माझ्या मनातील भावना नाही समजता आल्या तुला. अरे माझ्यासाठी खूप अवघड होत तुझ्यापासून दूर होण. पण नाईलाजाने दुरावा स्वीकारला मी एका छोट्या शहरातून आलेली मी जॉबच्या पहिल्याच दिवशी आपल्या कंपनीचे ते मॉडन कल्चर बघून मी घाबरली होती.

एखाद्या सोमवार किंवा शुक्रवार या दिवशी एकादशी आहे की, नाही अस बघून नॉनव्हेज करायच की नाही अस ठरवणारे आमचे मिडल क्लास घर. मात्र पहिल्या दिवसापासून तू मला सांभाळून घेतल होत. तु मला तिकडचे अटी व मॅनर्स शिकवले. पण मी त्या दिखाऊ वातावरणामध्ये कधीच रंगले नाही. मला तिथे गुदमरल्यासारख व्हायच माझ्यासाठी जॉब इम्पॉर्टंट होता. म्हणून मी तो करत राहीली आणि दुसरीकडे तुझ्या प्रेमामध्ये चिंब ओली होत गेली आणि त्या दिवशी तू माझ्याकडे सरळ लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा आग्रह केला माझ्यासाठी हे सर्व खूप नवीन होत.

अरे घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांना सर्वकाही पटवून देऊन तुझ्याशी लग्न करायच होत. मला पाहुण्यांची गर्दी, हळद, रिसेप्शन, मैत्रिणींचा कल्ला अस सर्व काही अनुभवायच होत मला. आणि तुझ काय वेगळ चालू होत दोन वर्ष एकत्र राहायच. पटल तर कोर्ट मॅरेज करायच नाहीतर जाऊ द्यायच. अरे मंदार हे सगळं तुझ्याकडन कस बोलल गेल. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे या जाहिरातीतल्या स्लोगन सारख एखाद्या प्रॉडक्टची टॅगलाईन शोभावी एवढ सोप वाटल तुला?

अरे कसल हे लिव्ह-इन-रिलेशनशिप लग्न न करता एकमेकांसोबत राहायच अरे कुठ आल हे आणि नाही पटल तर सोडून द्यायच. अरे जीकडून मध्यमवर्गीय सोसायटी मधून मी आलेली आहे तेथे असल काही होत नाही आणि हे सर्व माझ्यासाठी खूप नवीन आहे. तुला नाही वाटत का आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपली जनरेशन जास्तच गैरफायदा घेत आहे ते. विवाह व संस्कार एवढे मोठे मोठे शब्द वापरून तुला लेक्चर द्यायच नाही आहे मला आणि माझी तेवढी पात्रता सुद्धा नाही आहे. पण तुला याची आठवण करून द्यायची होती की दुसऱ्यांनी केल म्हणून आपण नाही करायच.

अरे प्रेम विवाह ठीक आहे रे अलीकडे तर ते स्वीकारले सुद्धा जाऊ लागत आहे. परंतु लग्न न करता एकत्र राहण माझ्या मनाला तर नाही पटल हे. हव तर माझ्यावर झालेले संस्कार समजतो हे आणि ज्यांना हे सर्व पटत त्यांनी हमखास राहाव. तू खूप निराश केले आहे माझ्या मनाला. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे हा कॉल मी तुला अखेरचा निरोप द्यायला नाही केलेला आहे. तर तुझ्यापर्यंत अखेरपर्यंत साथ द्यायला केलेला आहे. तुझ्यासोबत अखेरपर्यंत राहायचा आहे मला. आजही मी अग्नीसाक्षीने तुझ्या सोबत सात फेरे घ्यायला तयार आहे आणि मी जे काही बोलत आहे ते तुझ्या पर्यंत पोहोचत आहे हे मला चांगलच माहिती आहे.

मी तुझी अजूनही वाट बघत आहे. तुला काही होणार नाही तू या सर्वातून बाहेर येशील आणि तुला यावच लागेल तिने बोलण थांबवल असल तरी तिचा आवाज शेवटी रडण्या सारखा झालेला होता. तेव्हा मोबाईल स्पीकर वर होता आणि सिस्टर मंदार कडे बघत होत्या त्याच्या शरीराची काहीही हालचाल होत नसली तरी त्याच्या डोळ्याच्या पापणी मधून अश्रू वाहत होते. तिच्या एक एक शब्दाला ते अश्रू जणू दुजोरा देत होते. त्याच्या मंद श्वासाची गती वाढली होती. नंतर बराच वेळ मोबाईल हातात घेऊन उभ्या असलेल्या सिस्टर आणि मोबाईल जागेवर ठेवल्या आणि स्वतःशीच बोलू लागल्या भरभर बोलत होती ती असा जोडीदार मिळायला भाग्य लागते.

सर्व लोकांच्या साक्षीने डोक्यावर पडलेल्या अक्षदा नात्याला अधिक घट्ट धरून ठेवतात. तू लवकर बरा हो आणि कर तिच्या मनासारख तू जास्त सुखी होशील. आज मंदारला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता ती रिसेप्शन काउंटर जवळ उभी होती आणि त्याची आतुरतेने वाट बघत होती. तू हॉस्पिटल मधून बाहेर आला आणि त्याच्या पाठोपाठ सिस्टर सुद्धा त्याच्या सोबत आल्या आणि त्या स्त्रीकडे मिश्किल नजरेने बघत होती आणि म्हणाली हे बघ बाई संभाळ आता याला एका व्हायरसचा आम्ही नायनाट केला आहे आणि दुसऱ्या व्हायरसचा तू नायनाट केलेला आहे. एक पेशंट म्हणून हा निगेटिव्ह आहे आणि सप्तपदी घ्यायला हा पॉझिटिव आहे काळजी घे याची. ऑल द बेस्ट.

कशी वाटली स्टोरी. कमेंट मध्ये नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *