झोपतांना डोके कोणत्या दिशेला असणे शुभ असते व कोणत्या दिशेला अशुभ.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आज मी तुम्हाला डोके कोणत्या दिशेने ठेवून झोपावे आणि धन सफलता आरोग्य मिळते याबद्दल सांगणार आहे. जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपले डोके संपूर्ण शरीराला दुरुस्त करण्याचे काम करत असते. त्यातून आपल्याला दुसऱ्या दिवशी काम करण्याची ऊर्जा मिळत असते कधीही झोपताना आपले डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला करून झोपावे. विशेषता विद्यार्थ्यांनी आपले डोके पूर्व दिशेला ठेवून झोपावे यामुळे आपल्याला विद्येचा लाभ होतो.

आपले मन अभ्यासात एकाग्र होते व दक्षिण दिशेला डोके करून झोपल्यास आपल्याला धनलाभ होतो. प्रत्येक गोष्टीत सफलता प्राप्त होते व आपले शरीर निरोगी ही राहते. याउलट पश्‍चिम दिशेकडे डोके करून झोपल्यास आपल्याला चिंता तणाव व काळजी जाणवते तर उत्तर दिशेला डोक करून झोपल्यास आपले शरीर रोगट व आपण आजारी राहतो.

सकाळी उठल्यावर थकलेले वाटते झोपण्याच्या योग्य प्रकारची माहिती विष्णुपुराण मध्ये दिलेली आहे. कोणत्या दिशेला डोक करून झोपू नये हे तर झाले आता कस झोपू नये हे पाहूया. रात्री झोपताना कधीही निर्वस्त्र झोपू नये, त्याचबरोबर फक्त अंतर्वस्त्र घालूनही झोपू नये, तसेच तुटलेला पलंग असेल त्यावरही झोपू नये यामुळे आपले आयुष्य कमी होते.

या सोबतच बेडशीट न अंथरूण झोपू नये. आपले बेड नेहमी स्वच्छ असावे त्यावर धूळ घाण काही असू नये. त्याचबरोबर कपडे मोबाईल रुमाल यातील कोणतीही वस्तू आपल्या बेडवर असू नये. तसेच बांबूच्या पलंगावर ही झोपू नये कारण मृ-त झालेल्या व्यक्तीला बांबूच्या पलंगावरच झोपवतात. म्हणून बांबूच्या पलंगावर झोपणे ही अशुभ असते. तसेच आपण काही खाताखाता ही पलंगावर झोपू नये. आपण जे खात आहोत ते पूर्ण खाऊन पाण्याने गुळणी करून पलंगावर झोपावे.

त्याबरोबरच तोंडात पानाचा विडा असेल तर तो थुंकूनच पलंगावर झोपावे. झोपताना केसांमध्ये फूल किंवा गजरा असू नये. पुरूषांनी पगडी किंवा टोपी घालून झोपू नये. तुम्ही जर टीका लावत असाल तर तो टीका धुवूनच झोपावे. रात्री झोपताना पाय ओले करून झोपू नये असे केल्यास आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते.

तसेच पूर्ण अंधार करूनही झोपू नये झोपतांना मंद प्रकाशाचा लाईट असावा आपले डोके शरीराच्या लेव्हलच्या थोडेसे उंचावर असावे खूप उंचावर ही असू नये थोडेसे का होईना पण नुसती डोक्याखाली घेऊन झोपा कारण यामुळे आपल्या शरीराला चांगला रक्तपुरवठा होतो. सोबतच तुम्ही जागेचा जास्त वापर करत नाही त्या जागेवर रात्री झोपू नये. सोबतच ज्या मंदिरांमध्ये रात्री झोपायला मनाई केलेली असते त्या मंदिरांमध्येही रात्री झोपू नये.

सोबतच झाडे ही रात्रीच्या वेळी कार्बन-डाय-ऑक्‍साईड सोडतात आणि आपल्या शरीराला ऑक्सिजनची गरज असते म्हणून रात्रीच्या वेळी झाडाच्या खाली झोपू नये. आता आपण पाहूया कोणती वेळ झोपण्यासाठी योग्य व अयोग्य आहे ते ज्यावेळी दिवस व रात्र एकत्र येतात म्हणजे सूर्यास्त व सूर्योदयाची वेळ या वेळी कधीही झोपू नये. असे केल्यास आपले शरीर रोगी बनते.

आपला मेंदू कमी काम करतो व आपण चुकीचे निर्णय घ्यायला सुरुवात करतो. म्हणून सकाळी सूर्योदयाच्या वेळी व संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू नये. नाहीतर असे केल्यास आपण प्रत्येक गोष्टीत अयशस्वी ठरू लागतो. दिवसा झोपणे ही निषिद्ध मानले गेलेले आहे पण तुम्ही रात्रभर काम करत असाल किंवा तुम्ही आजारी असाल किंवा रात्रभर तुमची झोप झालेली नसेल तर तुम्ही दिवसा झोपू शकता.

दिवसा फक्त अठ्ठेचाळीस मिनिटे झोपू शकतात दिवसा सारखे झोपून राहिल्याने शरीर आळशी बनते. तुम्ही आजारी असल्यास झोपू शकतात. पण निरोगी माणसाने आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्त वेळ झोपू नये. गरुड पुराणात असेही लिहिलेले आहे की गाढ झोपेत असलेल्या व्यक्तीची झोप कधीही मोडायची नसते. झोपलेला व्यक्तीला जर कामावर जायच असेल किंवा भुकेला असेल तर तुम्ही त्याची झोप मोडू शकतात.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *