चिमणी घरात येणे शुभ असते की अशुभ चिमणी घरात आल्यास काय घडते ते जाणून घ्‍या.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

चिमणी एक छोटासा पक्षी आहे. त्याला सर्वांनी पहिलेच असेल. आता शहरी भागांमध्ये चिमणी दृष्टीस पडत नाही. परंतु गावात अजूनही चिमण्यांच्या चिवचिवाटाने गावकरी अजूनही जागी होतात. चिमण्यांची प्रजात हे लुप्त होण्याच्या मार्गावर आहे असे म्हटले जात आहे. म्हणून आता बहुतेक ठिकाणी लोक त्याबद्दल जागरूक होत आहेत. बहुतेक ठिकाणी त्यांच्यासाठी पाणी व धान्य ठेवले जातेय. छोटी छोटी घरे बांधण्यासाठी चिमन्यांसाठी रेडिमेड घरे बाल्कनी किंवा गच्चीवर ठेवली जातात.

चला अश्याप्रकारे का होईना पण चिमण्यांचे संवर्धन झाले तर खूपच चांगले. आजच्या दिवशी आपण याच चिमण्यांबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. चिमण्यांचे आपल्या जीवनात फार महत्व आहे. चिमण्यांच्या वागणुकीवरून व विविध हालचालीवरून आपल्याला काही संदेश मिळत असतात. आज आपण या चिमन्यांकडून मिळणाऱ्या या संकेतांबद्दल च जाणून घेणार आहोत. मनुष्याच्या जीवनात चढ उतार सुख दुःख हे येतच असतात.

कधी काय होईल व कधी काय नाही होणार हे सांगता येत नाही. चांगली घटना असो की वाईट घटना आपल्या जीवनात सर्व अचानक घडत असते. अचानक वाईट दिवस येतात तर कधी अचानक काळ बदलतो आणि आपण मालामाल होतो. तो आपल्या जीवनाचा टर्निंग पॉईंट असतो मात्र आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नसते. परंतु काही प्राणी व पक्षांच्या हलचालीवरून आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या त्या घटनांविषयी आधीपासूनच जाणून घेऊ शकतो.

तर आज आपण तेच बघणार आहोत की आपल्या जीवनात कोणत्या घटना घडण्यापुर्वी आपण जाणून घेऊ शकतो ते.
चिमणीचे आपल्या घरात येणे खूप शुभ असते. आपल्या घरात, बाल्कनीत किंवा ओट्यावर चिमणी आली आणि आपल्या डोक्यावरून ती उडाली तर हे खूप शुभ असते. असे म्हटले जाते की, ज्या घरात चिमण्या बिनधास्त पणे येजा करतात त्या घरामध्ये साक्षात भगवान विष्णूचे वास्तव्य असते. तसेच चिमणीने आपल्या डोक्यावर बिट केले तर हेहि खूप शुभ असते.

तसेच चिमणी आपल्या घरात किंवा दारात येऊन चिवचिवाट करू लागली तर समजून जावे आता आपल्या घरात ऐश्वर्य आणि वैभवाचे आगमन होणार आहे. आपल्या घरात आता शुभकार्य होणार आहे. जीवनात पुढे जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संधी प्राप्त होणार आहे आणि आपण त्या संधीचे सोने करणार आहात. चिमणीने जर आपल्या घरामध्ये घरटे बनवले तर समजून जावे आपल्या घरांमध्ये आता आनंदाचे आगमन होणार आहे आणि आनंदाने आपले घर भरून जाणार आहे.

त्याशिवाय आपल्या घरावर काही संकट येणार असेल तर काही बाधा येणार असतील तर तेही पळून जाईल. असे म्हणतात की, ज्या घरामध्ये नेहमी चिमण्यांची येजा असते त्या घरांमध्ये साक्षात भगवंताचा वास असतो आणि ते घर आनंद समृद्धी आणि समाधानाने भरलेले असते. किंवा किंवा आपण बघतो की चिमण्या आपल्या घरामध्ये घरटे बनवतात आणि निघून जातात. पण थोड्या दिवसानंतर त्या परत आपल्या त्या घरट्यामध्ये राहायला येतात.

तर हे खूप शुभ असते त्यामुळे आपल्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. चिमणी घरात आल्यास आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. तर मित्रांनो चिमणी हा एक छोटासा पक्षी आहे पण तो आपल्याला एवढे मोठे संदेश आणि आनंद देत असतो.

टीप : वर दिलेली माहिती सामा जिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधा रावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसर वण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्या मुळे कोणीही तसा गै रसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *