हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होताना मी माझ्याबरोबर स्वामी चरित्र घेऊन आले तसं मला स्वामींनी प्रचिती दिली…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

एक सत्य अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून मी एका स्वामी भक्ताला आलेला दिव्य स्वामी अनुभव आपल्या सर्वांसोबत त्यांच्या शब्दात इथे सांगत आहे.

श्री स्वामी समर्थ. माझी स्वामी आई सर्व स्वामी सेवेकरी आई-दादा तसेच प्रदीप दादांना माझा नमस्कार. माझा अनुभव असा आहे की माझ्या डाव्या बाजूच्या अंडाशयात गाठ आली होती.

डॉक्टर बोलले ती गाठ काढावी लागेल. आणि बाकीचं पण एक्झामिनेशन करता येईल एका सर्जरीने. प्रदीप दादांच्या मठातील एका ताईंना फोन केला होता. त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही घाबरू नका. तुमच्या सर्व व्यवस्थित होईल. आणि तसंच झालं.

अगदी सगळे व्यवस्थित झाले. माझी इंटरनल ऑर्गन पण व्यवस्थित आहेत. आणि गाठ पण काढून टाकली. खरंतर मी जेव्हा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले होते. तेव्हा स्वामी चरित्र घेऊन गेले होते. ती आज माझ्या सर्व व्यवस्थित असू दे. कारण मला बाळ व्हावं यासाठीच्या त्या टेस्ट होत्या.

आणि माझ्या स्वामी आईच्या आशीर्वादाने सगळे अगदी व्यवस्थित आहे. असं डॉक्टर बोलले. हे ऐकून मला समाधान वाटले. मी आणि माझे मिस्टर सर्जरीच्या अगोदर वसईमध्ये मठ आहे तिथे पण जाऊन आलो. त्या मताचा एड्रेस पण मला एका स्वामी सेवेकरी दादांकडून मिळाला.

त्या दादांना मनापासून थँक्यू. खरच माझी स्वामी आई आहे माझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. प्रदीप दादांना खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर भक्त होऊया ताईंचा अनुभव ऐकल्यानंतर हा अनुभव कसा वाटला. तुमची प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा.

तसेच माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *