मेष रास- ऑगस्ट महिन्यात या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मेष राशी- ज्योतिशस्त्रानुसार ग्रहांची हालचाल बदलत राहते त्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे बदल दिसून येतात.एका ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ग्रह अनुकूल असतील तर त्या व्यक्तीला त्याचे परिणाम मिळतात.परंतु नसेल तर खूप समस्या त्यांच्या जीवनात येतात.बदलाव हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत चालू राहतो.याला थांबवणे शक्य नाही.मेष राशीबद्दल आज सम्पूर्ण महिन्याचे राशिभविष्य आज आपण बघणार आहोत.

मेष राशीसाठी कामाच्या आणि करियरच्या दृष्टीने ऑगस्ट महिना उत्तम राहील अशी अपेक्षा आहे.कठोर मेहनत घेतली तर यश नक्की मिळेल.शनी आणि बुधाची दृष्टी तुमच्यावर राहील.शनी दशमभावात स्थित आहे.त्यामुळे उत्साह कायम राहील पण त्यासोबतच काही अपयशाची ही शक्यता आहे.मित्रांनो आपल्यासाठी ऑगस्ट चा महिना खूप खास राहील. तुमचा उत्साह ही दमदार असेल पन छोटे मोठे अपयश मिळण्याची शक्यता आहे.

अपयशाला घाबरून तुम्ही मागे सरू नका, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. असे म्हटले जाते म्हणून कोणत्याही अपयशाला घाबरू नका. कौटुंबिक जीवन- ऑगस्ट चा महिना मेष राशींच्या लोकांसाठी आनंदी आणि समाधानी राहणार आहे. जीवनात काही चढउतार असतील मात्र उत्साहदेखील पूर्ण राहील.

राहुमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात. काही कारणांमुळे आपल्या परिवारातील सदस्यांमध्ये गैरसमज होऊ शकतो. तर हा गैरसमज दूर कसा करावा याकडे लक्ष द्या. गैरसमज झाल्यास लगेच भांडण व वादविवाद चालू करू नका. नाहीतर तुमच्या कुटुंबात गैरसमज होऊन मोठ्या प्रमाणात भांडण होऊ शकतात.

प्रेम आणि वैवाहिक जीवन- ज्या व्यक्तींचे प्रेम सबंध आहे त्यांच्या साठी हा महिना अनुकूल व आनंददायी आहे. मंगळ शुक्र पाश्वघरात आहे. प्रेम प्रकरणासाठी ही एक योग्य वेळ आहे. प्रियजनांच्या दृष्टीने तुमच्यासाठी प्रेम आणि आदर वाढेल. विवाहित व्यक्तींसाठी सुद्धा हा काळ अनुकूल आहे. जोडीदाराची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल आणि त्याच्या मदतीने अनेक महत्वाची कामे पूर्ण केली जातील.

मन प्रसन्न राहील तसेच एकमेकांसोबतचे प्रेम सुद्धा वाढेल. मित्रांनो या महिन्यात तुम्हाला आपल्या जोडीदाराची खूप मदत मिळू शकते आणि याच मदतीने आपली महत्वाची कामे देखिल पूर्ण होतील. तसेच तुमचे मन सुद्धा प्रसन्न राहील.

आर्थिक दृष्टी- आर्थिक दृष्टीने ऑगस्ट महिना मेष राशीसाठी अत्यन्त अनुकूल ठरणार आहे. अकराव्या घरात भस्पती ची उपस्थिती आहे आणि त्यात मंगल व शुक्र यांचा दृष्टिकोन आहे. अचानक पैशांचा फायदा होऊ शकतो आणि व्यवसायात पैसे मिळू शकतात. मित्रांनो या महिन्यात पैशांची कमतरता तुम्हाला भासणार नाही. पैसा तुमच्याकडे येत राहील, आणि तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर त्यात पैशाचा प्रभाव वाढत राहील.

आरोग्य दृष्टिकोन- आरोग्याच्या दृष्टीने ऑगस्ट महिना जरी तुमच्यासाठी चांगला असला तरी तुमच्या खण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शिळे अन्न खाऊ नका. पोटाच्या आजारामुळे महिन्याच्या सुरुवातीला काही समस्या उदभवू शकतात. पोटाच्या आरोग्यासाठी काय योग्य आहे व पिण्यासाठी कोणते पाणी योग्य आहे.

याबाबत थोडी सावधगिरी बाळगून तुम्ही या समस्यांपासून वाचू शकता. मित्रांनो शिळे अन्न खाऊ नका. हा ऑगस्ट महिना आहे त्यात शिळे अन्न खाल्याने तो समस्या निर्माण करेल. आणि आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आणि पिण्याच्या पाणी योग्य वापरा.

महत्वपूर्ण गोष्टी- नव्या महिन्यात कोणतेही महत्वपूर्ण काम करण्यासाठी नीट विचार करा. तब्येतीची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या मदतीशिवाय यश मिळणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. देवाची आराधना करा यामुळे आपले चित्त शुद्ध राहील आणि येणाऱ्या संकटापासून त्रास होणार नाही. तुमच्या आरोग्याची तपासणी करावी, अन्यथा काही गंभीर स्वरूपाचे आजार देखील उद्भवू शकतात. तुमच्या प्रेम संबंधांना गृहीत धरू नका.

आता कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे याबद्दल जाणून घेऊया- मित्रांनो शरीराला चांगले ठेवण्यासाठी आपल्याला योगा करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये दहा मिनिटे ओम नमः शिवाय दहा मिनिटे अनुलोम भारती आणि दहा मिनिटे कपालभारती करत राहा. मित्रांनो अनुलोम-विलोम म्हणजे श्वास आत घेणे श्वास बाहेर सोडणे याला म्हणतात. हे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे व्यवस्थित ठेवेल.

मित्रांनो शारीरिक व्यायाम किंवा योग केल्याने आपणास तो पूर्ण दिवस असतो तो ताजातवाना राहतो. रात्री झोपायच्या आधी शांत जागेमध्ये ध्यान करा याचे दोन फायदे आहे एक तर झोप चांगली लागते आणि दुसरा जो की दिवस आपल्यासाठी ताजेतवाना राहतो. ध्यान करताना आपण संयमित आवाजात शांत संगीत देखील ऐकू शकता. मित्रांनो दर मंगळवारी आपण हनुमान चालीसा चे पाठ करावे किंवा मंदिरात जावे हे आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर आलेले कोणतेही संकट दूर करेल आणि आपल्याला नेहमी शांत ठेवेल.

मित्रांनो रोज गाय आणि कुत्र्यांना घराबाहेर काहीतरी खायला द्या तसेच शेतावर पक्षांसाठी धान्य आणि पाणी ठेवा. ही पृथ्वी जितकी माणसांची आहे तितकी त्या पक्षांचीही आहे त्यामुळे त्यांना धान्य आणि पाणी दिल्यामुळे आपली ग्रहांची दोष कमी होतात आणि आपल्याला पुण्य भेटते. वेळोवेळी आपल्या जवळच्या भुकेल्यांना अन्न द्या आणि गरिबांना मदत करा.
फायदेशीर उपाय- तांब्याच्या भांड्यात रोज सूर्यदेवाला पाणी अर्पण करा आणि सूर्याचा मंत्र उच्चार करा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *