शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने काय घडते.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाचे खूप महत्त्व आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर पिंपळाचे झाड हे मानवासाठी एक वरदान आहे. कारण इतर झाड दिवसा ऑक्सिजन सोडतात तर रात्री कार्बन-डाय-ऑक्‍साईड सोडतात. पण पिंपळाचे झाड हे दिवसा आणि रात्री दोन्ही टाईम ऑक्सीजन सोडते. श्रीकृष्णाने ही सांगितलेले आहे की सर्व वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे.

पिंपळाच्या झाडाच्या सावली खाली उभे राहिल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या कुंडलीतील दोषाची मुक्ती होते.शास्त्रानुसार पिंपळाचे झाड हे श्री विष्णू देवाचे दुसरे स्वरूप असल्यामुळे या झाडाला भगवान विष्णु ची पदवी मिळालेली आहे. म्हणून आपण याचे पूजन करतो. पिंपळाच्या झाडा मध्ये साक्षात श्रीहरी विष्णू यांचा वास असतो. तर पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची ही वास्तव्य पिंपळाच्या झाडांमध्ये असते.

पद्म पुराणानुसार पिंपळाच्या झाडाचे पूजन आणि फेऱ्या मारल्यास आपले आयुष्य वाढते. जे लोक पिंपळाला पाणी अर्पण करतात. त्यांची सर्व पापांपासून मुक्तता होऊन स्वर्गामध्ये त्यांना जागा मिळते. पिंपळा मध्ये पितरांचा वास असल्याचे मानले जाते. तसेच सर्व तीर्थ असल्याचेही मानले जाते. शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडा मध्ये शनिदेवाचा हि वास असतो. शनि देवाची साडेसाती किंवा प्रकोप इत्यादी साठी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास आपल्याला शनीच्या प्रकोपापासून मुक्तता मिळते.

पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा ही वास्तव्य असते. म्हणून या झाडाचे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पूजन करावे. रात्री या झाडाची पूजा केल्यास आपल्याला दारिद्र्य आणि गरीबी येते. शनी देवाने ज्या झाडाला असा आशीर्वाद दिलेला आहे की, जे लोक शनिवारी या झाडाची पूजा करतील त्यांना प्रकोपापासून मुत्ती मिळेल. व त्या लोकांवर देवी लक्ष्मीची ही कृपा होईल.

शनिदेवाच्या प्रकोपाने घरातील वैभव व सौंदर्य नष्ट होते. परंतु शनिवारी वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या लोकांवर देवी लक्ष्मी आणि शनिची कृपा सदैव राहते. तसे तर रविवार सोडून प्रत्येक दिवशी वडाच्या झाडाचे केलेले पूजन खूप लाभकारी असते. पण अमावश्या आणि शनिवारी केलेले पूजन अतिशय जास्त लाभदायी असते. जर तुम्हाला शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्ती पाहिजे असेल तर शनिवारी एक मातीचा किंवा पिठाचा दिवा घ्यावा. त्यामध्ये राईचे तेल टाकून कापसाची वात न लावता एका काळ्या दोऱ्याची वात लावावी.

आणि त्यामध्ये एक खिळा किंवा नाणे टाकून हा दिवा प्रज्वलित करून पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा. दिवा लावताना दिव्याची ज्योत पश्चिम दिशेकडे येईल अशी ठेवावी. कारण पश्चिम दिशेचे स्वामी हे शनिदेव आहेत. असे केल्याने आपल्यावर शनि देवाची कृपा होते व त्यांच्या प्रकोपापासून आपली सुटका होते. जर आपण पितृ दोषा पासून परेशान असाल आणि तुम्हाला तुमच्या पितरांना प्रसन्न करायचे असेल तर पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावायचा.

त्यामुळे आपल्यावर आपल्या पितरांची कृपा होते आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मी ची ही आपल्यावर कृपा होते. जर तुम्हाला सर्व देवी देवतांना प्रसन्न करायचे असेल किंवा काल सर्प दोष किंवा एखादा दोष नष्ट करायचा असेल तर मातीचा किंवा पिठाचा दिवा घेऊन त्यामध्ये राईचे तेल टाकावे आणि गोल बात घेऊन त्या वातीवर थोडेसे तीळ टाकावे आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा.

या दिव्याची ज्योत कोणत्याही दिशेला जाणारी नसावी. या दिव्याची ज्योत सरळ वरच्या दिशेला जाणारी असावी. दिवा लावल्यानंतर प्रथम भगवान श्री गणेशाला नमस्कार करावा. त्यानंतर लक्ष्मी देवी श्रीहरी विष्णू हनुमानाला आणि सर्व देवी देवतांना वंदन करावे. शनी देवाला वंदन करावे त्यानंतर हनुमान चालीसा वाचून श्री हरी विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा.

जर शनि देवा पासून मुक्ती मिळवायची असेल तर ओम शम शनीदेवाय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. आणि पितृ देवा पासून मुक्ती मिळवायची असेल तर ओम पितृत्व नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. मान्यता नुसार पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालीसा चे वाचन केल्यास सर्व प्रकारच्या ग्रहपीडा नष्ट होतात. शनिदेवाच्या प्रकोपापासून तुम्हाला मुक्ती मिळते.

कारण शनी देवांनी स्वतः सांगितलेले आहे की, जी लोक हनुमानाची पूजा करतात त्यांच्यावर कधीही शनीदेवाचे प्रकोप राहत नाही. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामनाची पुरती तर होतेच सोबत आपल्या सर्व शत्रूंचा नाश होतो. रविवार टाळून आपण तसे तर रोजच या झाडाचे पूजन करू शकतो. मात्र या झाडाचे लांबूनच पूजन करावे या झाडाला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.

शनिवारी या झाडाला स्पर्श केल्यास काही हरकत नाही. कारण शनिवारी या झाडांमध्ये साक्षात श्रीहरी विष्णूचा आणि सोबत देवी लक्ष्मीचा वास असतो. बाकीचे सर्व दिवस या झाडांमध्ये लक्ष्मीचा वास असतो तर मित्रांनो हे सर्व उपाय करा आणि आपल्या जीवनातील बाधा समस्या यावरती उपाय मिळवा.

जर हा लेख आवड ला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शे-अर क रायला वि सरू नका. तसेच अ शाच प्र-कारच्या अनेक नव-नवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामा जिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधा रावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसर वण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्या मुळे कोणीही तसा गै रसमज करून घेऊ नये.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *