जाणून घ्या. तुमच्या जन्मवारानुसार स्वतःमधील विशेष गुण, स्वभाव आणि बरेच काही..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुमचा जन्मवार तुमचा स्वभाव कसा आहे हे सांगू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा जन्मवार माहीत असणे आवश्यक आहे. अर्थातच आठवडा हा सात दिवसांचा आणि वार सुद्धा सातच. प्रत्येक वाराच प्रतिनिधित्व हा एक ग्रह करत असतो. जस सोमवार म्हटल की चंद्राच प्रतिनिधित्व, मंगळवार म्हटल की मंगळाच, बुधवार म्हटल की बुधाच.

गुरुवार म्हटल की गुरुच, शुक्रवार म्हटल तर शुक्राच आणि शनिवार म्हटल तर शनिच तस रविवार म्हटल की रवीच प्रतिनिधित्व तो वार करत असतो. त्यानुसार त्या ग्रहांच्या प्रवृत्तीचा किंवा त्या ग्रहांप्रमाणे त्या व्यक्तीचा स्वभाव ठरतो. जर तुमचा जन्म सोमवारी झाला असेल, तर तुम्ही सुंदर चेहऱ्याचे कोमल आवाजाचे चतुर सुखदुःखामध्ये समतोल ठेवणारे आणि दयाळू असतात.

तस सोमवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती या अत्यंत शांत स्वभावाच्या सगळ्यांची गोड बोलणाऱ्या आणि त्याच पद्धतीने गोड वागणाऱ्या सुद्धा असतात. या व्यक्तींना व्यवहार ज्ञान असत. मोठ्यांच्या आज्ञेत राहणाऱ्या आणि मनाने उदार असणाऱ्या व्यक्ती या सोमवारच्या दिवशी जन्मलेल्या असतात.

मंगळवारी जर तुमचा जन्म झाला असेल तर शरीराने काटक पराक्रमी सत्वगुणी रणशूर धनवान जमीन जुमला असलेला, कधी कधी थोडासा क्रूर साहसी चिडचिडा पण बऱ्याचदा वाचाळ आणि बडबड करणारे असे लोक असतात. अनेकदा खोट बोलण पण रेटून बोलण अशा स्वभावाची लोक सुद्धा मंगळवारी जन्मलेली सापडतात. भांडण करण्यात पुढे असणारे थोडेसे तापट असे सुद्धा लोक मंगळवारी जन्मलेले असतात.

बुधवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती सुंदर मृदू स्वभावाच्या चतुर धन कमवण्यामध्ये कुशल व्यापारी प्रवृत्तीच्या असतात. देवधर्म मानणाऱ्या पूजा वर्षा करणाऱ्या गोड बोलणाऱ्या आणि गोड बोलून स्वतःचं काम काढून घेणाऱ्या पण गोड बोलून मागून टीका करण्याचा स्थायीभाव सुद्धा यांचा असतो.

चेष्टा मस्करी करणे त्याबरोबरच इतरांचे गुन्हा उगवून पारखणे आणि व्यावसायिक वृत्तीच्या अशा सुद्धा असतात. बुधवारी जन्मणारे लोक हे बऱ्याच प्रमाणात व्यवहारिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या असतात.

गुरुवारी जन्म घेणारी लोक सर्व गुण संपन्न अल्पकामवासनेचे चांगल बोलणारे धैर्य शील धर्मशील आणि विख्यात असतात. तसेच स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारे असतात.शिक्षणात रस असणारे आणि आपल्या गुणवत्तेने धन कमावणारे आणि सन्मान मिळवणारे असतात.

जर तुमचा जन्म शुक्रवारी झाला असेल तर गालावर खळी किंवा तीळ असू शकतो. प्रसन्न चेहऱ्याचे चतुर थोडेसे स्वार्थी पांढरे वस्त्र परिधान करण्याची आवड असलेले धनधान्य संपत्ती सन्मान लोकप्रियता हे सगळ त्यांना मिळालेल रसिक आणि रंगेल सुद्धा असतात. चांगले कपडे घालने टापटीपीत राहणे ही त्यांची हौस असते. मनाने सदाचारी मोठ्यांचा आदर राखणारे असतात. त्याचबरोबर कलाक्षेत्राकडे यांचा ओढा असतो. अशा व्यक्ती पुढारी सुद्धा होतात.

आता वळूया शनिवार कडे शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींना गुढ विद्येमध्ये अत्यंत आवड असते. स्वकर्तुत्वानेलढा लावणारी अशी बुद्धिमान व्यक्ती म्हणजे शनिवारी जन्मलेली. तब्येतीने कृष बारीक शरीर तसच थोडेसे दुर्बलही असतात.

आपल्या जवळच्या व्यक्तीशी त्यांचा नेहमी विरोध असतो. वादविवाद होतो. खोडसाळपणा यांच्या बाबतीत कायम घडतच असतो. परंतु तरीही बुद्धिमान न्यायी असतात. कित्येकदा फटकळ पणा सुद्धा यांच्या स्वभावात असतो.

चला आता वळूया सुट्टीच्या वाराकडे अर्थात रविवारकडे रविवारी जन्म झालेल्या व्यक्ती या उष्ण प्रकृतीच्या पित्त प्रकृतीच्या शूर पराक्रमी आणि रणांगणामध्ये शौर्य गाजवणाऱ्या असतात. तसेच प्रत्येक काम धावून करणाऱ्या असतात. कोणतीही जबाबदारी आनंदाने स्वीकारणाऱ्या असतात.

प्रचंड स्वाभिमानी केस थोडेसे पिंगट आणि डोळे अगदी सुंदर असतात. वैभवशाली असतात. परंतु संघर्षामध्ये आणि वादविवाद यामध्ये रविवारी जन्मलेल्या व्यक्तींच काही ना काहीतरी नुकसान होत राहतात. रविवारी जन्मलेल्या व्यक्ती या कुन्हापुढेही मान झुकवत नाहीत.

तर असा असतो सोमवारपासून रविवार पर्यंत जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव मग मंडळी तुमचा जन्म वार कोणता आहे आणि या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे. सांगायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *