गुरुपौर्णिमा येण्या आधीचे ३ मोठे गुरुवार करा ही स्वामी सेवा दाखवा हा नैवैद्य स्वामींचे साक्षात दर्शन होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो

श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तांसाठी व स्वामी सेवकांसाठी एक खास दिवस असतो, तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस. गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या गुरूचा दिवस गुरूला आठवण्याचा व त्यांची सेवा करण्याचा दिवस असतो. तर मित्रांनो ही गुरुपौर्णिमा जुलै महिन्यात २३ तारखेला येणार आहे. तर भक्तांनी आतापासूनच गुरूंची व स्वामींची पूजा केली तर त्यांना त्याचा लाभ मिळेल.

तर तुम्हाला ही पूजा फक्त गुरुवारी करायची आहे. तस बघायला गेल तर गुरुपौर्णिमेपर्यंत 3 गुरुवार येणार आहेत. एक गुरुवार येईल तो ८ जुलै चा दुसरा येईल तो १५ जुलै चा, आणि तिसरा येईल तो २२ जुलै चा आणि २३ तारखेला गुरुपौर्णिमा आहे तर या तीन गुरुवारी तुम्ही स्वामींची विशेष पूजा करा.

या ३ गुरुवारी स्वामींना विशेष नैवेद्य दाखवा जेणेकरुन स्वामी प्रसन्न होतील. तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ११ माळी श्री स्वामी समर्थांच्या जप करायचा आहे. म्हणजे एक माळेत १०८ वेळा असे ११ माळी जप श्री स्वामी समर्थ या नामाचा करायचा आहे.

बस एव्हढि छोटी सेवा तुम्हाला करायची आहे, स्त्री असो किंवा माणूस कोणीही करू शकतात. त्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींना एक नैवेद्य दाखवायचा आहे यात गोड पदार्थ असायला हवी. तुम्ही गोड काहीही ठेवू शकतात. आणि सोबत भाजी पोळी ठेवू शकतात.

तर तुम्ही या तीन गुरुवारी ११ माळ जप आणि सकाळी किंवा संध्याकाळी गोड पदार्थांचा नैवेद्य ठेवा. यामध्ये शिरा, खीर किंवा बाहेरून आणलेली मिठाई सुद्धा चालेल. हे करून बघा स्वामी प्रसन्न होतील फक्त मनोभावाने आणि विश्वासाने करा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *