सत्यघटना साक्षात स्वामींनी वाचवला भक्ताचा जीव..

Astrology

नमस्कार मित्रांनो

स्वामींचे भक्त श्री रामकृष्ण देशमुख यांनी आम्हाला हा अनुभव सांगितला आहे. हा अनुभव अत्यंत आश्चर्यजनक आहे. आणि स्वामींवर आपला असलेला विश्वास आणखीन दृढ करणारा आहे. देशमुख हे एका मुंबईतील मोठ्या कंपनीत काम करतात तेथे त्यांना दिवसभर मोठमोठ्या मशीन ना ऑपरेट करावे लागत. असाच त्या दिवशी ते स्वामींचे पूजा करून व एक वेळ माळ जपून ते त्यांच्या कामावर निघाले होते.

देशमुख सांगतात दुपारची वेळ होती नेहमीप्रमाणे सर्व कामगारांना जेवणाची सुट्टी दिलेली होती. देशमुखही त्यांच्या मशीनच्या वर उंच ठिकाणी असलेली डब्याची पिशवी घ्यायला गेले. सगळे कामगार बाहेर जेवणाला गेलेले होते आजूबाजूला कोणीच नव्हते. तेव्हा अचानक देशमुखांना काहीतरी तुटण्याचा आवाज आला त्यांनी आजूबाजूला बघितले पण त्यांना काहीच समजत नव्हते.

परत त्यांनी बघायचा प्रयत्न केला तर त्यांनी वरती बघितल. त्यांच्या डोक्यावर ची मोठी मशीन तुटायला आलेली होती आणि ती आर्धी तुटलेली सुद्धा होती. देशमुख ते पाहून खूप घाबरले आणि तसेच चक्कर येऊन खाली पडले. मशीनही तसेच जमिनीवर पडली खूप मोठा आवाज झाला. आवाज झाल्यावर जेवायला गेलेले कामगार बघायला आले. त्यानंतर चमत्कारच झाला मशीन जमिनीवर पडलेली होती आणि देशमुख हे त्यांच्या खुर्चीवर बेशुद्ध पडले होते.

त्यानंतर कामगारांनी त्यांना शुद्धीवर आणले येथे काय घडल त्याबद्दल विचारणा केली त्यावेळेस पण देशमुख आधी घाबरलेले होते. त्यांनी फक्त कामगारांना एक प्रश्न विचारला मला या खुर्चीवर कोणी आणल. सगळे कामगार चकित झाले आणि त्यांनी विचारल मग तू कुठे होतास आम्ही तर कोणीच इथे नव्हतो. आम्ही तर तुला जेवणासाठी हॉलमध्ये शोधत होतो आणि तू अचानक बेशुद्ध कस काय झाला.

त्यानंतर देशमुख खळबळले आणि परत विचारल तुम्ही खरच मला इथे कोणीच नाही आणल सगळे नाही म्हणाले. आणि सर्वांचे प्रश्नांची उत्तरे द्यायला टाळाटाळ केली. आणि येथून एकांतात असलेल्या ठिकाणावर निघून आले आणि पाकिटातील स्वामींचा फोटो काढून त्यांना वंदन केले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते कारण स्वामींनी त्यांना स्वतः मोठ्या अपघातातून वाचवले होते.

स्वामींनी त्यांना स्वतः मशिनी खाली येण्यापासून वाचवले होते आणि स्वतः त्या खुर्चीवर जाऊन बसवले होते. स्वामींनी देशमुखांचा जीव वाचवला होता देशमुख यावेळी खूप रडले आणि स्वामींना खूप वेळा प्रणाम व धन्यवाद केले. त्यांना ही गोष्ट आपल्या सर्व कामगारांना व सहकाऱ्यांना सांगायची होती. पण ती लोक या गोष्टीला खोट समजतील व मजाक उडवतील म्हणून त्यांनी हा चमत्कार फक्त त्यांच्या परिवाराला सांगितला.

देशमुख म्हणतात की, मी आज हा अनुभव माझ्या लेखाच्या द्वारे खूप जणांना सांगू शकत आहे. आणि मी या लेखाचा आभारी आहे पण खर तर आम्ही देशमुखांचे आभारी आहोत त्यांनी एवढा छान अनुभव आम्हाला सांगितला. हा अनुभव महाराजांचे असणारे अस्तित्व साध्य करण्यास सक्षम आहे.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *