देवमाणूस मालिकेतील कलाकारांचे मानधन पाहून तुम्हीही थक्क व्हाल, जाणून घ्या एका एपिसोडसाठी घेतात एवढी फी…

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

मराठी वाहिनीवर अनेक मालिका रोज चालू असतात, काही मालिका तर प्रेक्षकांच्या सवयीच्या बनल्या आहेत. मालिकेतील कलाकार हे अगदी घरचे सदस्य बनून जातात. त्याद्वारे कलाकार रोजच रसिकांच्या भेटीस येत राहतात. त्यामुळे कलाकार अगदी थोड्याच दिवसात आपलेसे वाटतात. ओळखीचे बनतात, आवडीचे बनतात. हल्ली मराठी मालिका भरपूर लोकप्रिय होत आहेत, त्यातील देवमाणूस मालिका तर अनेकांना आवडते.

या मालिकेने फार कमी दिवसात जास्त लोकप्रियता मिळवली आहे. यातील सर्वच पात्रे उत्कृष्ट असून त्यांचा अभिनय उत्तम दर्जाचा आहे. देवमाणूस मालिकेचे कथानक खूप छान आहे, माणूस काही वेळा एखाद्या अनोळखी व्यक्तीला आपला समजून बसतो आणि मग तीच व्यक्ती आपल्याला कधी धोका देईल याची खात्री कोणीच नाही देऊ शकत. गावातील भोळ्या गावकऱ्यांचा विश्वास जिंकून त्यांच्या पाठीमागे कट रचत असणारा हा डॉक्टर अजित कुमार याने अनेक तरुणींना फसवले असते.

पण तरीही गावातील सर्व लोक त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत असतात. आपल्या जिवासाठी घातकी असणाऱ्या व्यक्तीला गावातील लोक देवमाणूस समजतात. पण तो त्यांच्या माघारी किती वाईट कृत्य करतो हे कोणालाच माहीत नसते. ही मालिका दिवसें दिवस खूपच रंजक होत चालली आहे. या मालिकेतील सर्वच पात्र खूप महत्वाची आणि छान आहेत. यातील डॉक्टर, दिव्या सिंग, डिंपल, आजी तसेच आणखी सर्वच पात्रे उत्कृष्ट असून त्यांच्या सुंदर अशा अभिनय कौशल्याने या मालिकेचे चाहते वाढवले आहेत.

पण हे कलाकार अभिनय करण्यासाठी किती मानधन घेतात याचा आपण कधी जास्त विचार करत नाही, काही जणांना असा प्रश्न पडत असेलच. तर आजच्या लेखात या मालिकेतील कलाकारांचे मानधन किती आहे हे माहिती करून घेऊया. तुम्ही हा लेख पूर्ण वाचला तर तुम्हाला देखील त्यांचे एका एपिसोड मागे किती मानधन असते हे समजे.

देवमाणूस मालिकेत डॉक्टर ची भूमिका साकारणारा अजित कुमार म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड हा एका एपिसोड साठी २०००० रुपये घेतो. त्याची या याआधी लगीर झाल मधील भैयासाहेबांची भूमिका त्याने उत्कृष्ट निभावली आहे. देवमाणूस मालिकेतील इन्स्पेक्टर दिव्या सिंग एका एपिसोड साठी जवळपास १७००० एवढी फि घेते, दिव्या चे खरे नाव नेहा खान असे असून नेहाने या मालिकेत काम करण्याआधी शिकारी, बॅड गर्ल, काळे धंदे , हाफ टूथ, गुरुकुल, बियोंड बॉर्डर या व अशा अनेक चित्रपटात तीने खूप छान भूमिका साकारली आहे.

मालिकेत डॉक्टर सोबत लग्न होत असलेल्या डिंपल चे खरे नाव अस्मिता देशमुख असे आहे, अस्मिता खऱ्या आयुष्यात दिसायला खूप हॉ-ट आहे. तीचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. अस्मिता देवमाणूस मालिकेत डिंपल ची भूमिका साकारताना एका एपिसोड साठी जवळपास १८००० इतकी फि घेते. तसेच या मालिकेत डिंपल ची आजी ची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे रुक्मिणी सुतार या असून सध्या त्या ७५ वर्षाच्या आहेत. या मालिकेत त्या डॉक्टर अजित कुमार आणि डिंपल च्या लग्नाच्या विरोधात आहेत. या मालिकेतील एका एपिसोड साठी सरू आजी १५००० घेतात.

मालिकेतील बाल कलाकार असणारा टोण्या प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतो, लहान असूनही उत्तम अभिनय करतो. त्याचे खरे नाव विरळ माने असे आहे. या मालिकेतील एका एपिसोड साठी विरळ जवळपास ७००० इतकी फि घेतो. तसेच या मालिकेत वंदी ची भूमिका करणारी अभिनेत्री पुष्पा चौधरी ही एका एपिसोड साठी ९००० इतकी फि घेते. याशिवाय मालिकेतील बज्या म्हणजेच किरण डांगे हा एका एपिसोड साठी १०००० इतकी रक्कम आकारतो.

तसेच मंगल ची भूमिका करणारी अभिनेत्री अंजली जोंगळेकर ही देखील एका एपिसोड मागे १२००० इतकी फि घेते. तसेच मालिकेतील विजय ची भूमिका साकारणारा अभिनेता एकनाथ गीते हा ११००० इतकी रक्कम घेतो. देवमाणूस मालिकेतील हे कलाकार एका एपिसोड मागे एवढ्या फि घेतात.

पण आज त्यांच्या मुळेच ही मालिका प्रसिद्धी चे शिखर गाठत आहे. प्रत्येक कलाकार हा उत्कृष्ट असून अभिनय सुद्धा खूप सुंदर असतो त्यांचा. तर आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *