डोळ्यात अश्रू आणणारी हृदयस्पर्शी कथा- तडजोड भाग-१

Uncategorized

तडजोड.

एका कॉमन मित्रामुळे त्यांची ओळख झाली. आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर लग्नाचे वेध लागले. दोघांचे प्रादेशिक विभाग तसे वेगवेगळे म्हणजे राहणीमान पद्धती खान पान तसेच सगळच वेगळे.

त्यात दोन्ही कुटुंब पारंपारीक विचाराचे स्वतःच्या मर्जीने लग्न म्हटले तर भुवया उंचावतात. आधुनिक विचारांना कडाडून विरोध न करणारे पण ते सहजतेने समजून न घेणारे असे काहीसे.

तस कठीणच दोघांना लग्नाला होकार मिळण्याचे. पण दोघांनी प्रयत्नांची शर्त लढवून ही मोहीम यशस्वी पार पाडली.
थोड्या कुरबुरी आणि तक्रारीच्या सुरातच लग्न सोहळा पार पडला. दोघेही एकदम खुश.

पण कुटुंबातील सदस्यांनी अजूनही पूर्णपणे तिला स्वीकारलेल नसत. हे तिला पहिल्याच दिवशी त्यांच्यावर वर वरच्या वागण्यावरून समजल. आपण लग्न स्वतःच्या निवडीने केले त्यांना त्यांच्या आवडीनुसार ते करता आल नाही. म्हणून ही नाराजी काही दिवस राहणार.

तु सगळ्यांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न कर. काही तडजोडी तुलाच कराव्या लागतील. त्यांची मन जिंकण्याची तु तयारी ठेव. एकदा तू त्यांची मने जिंकली की ते तुला मनापासून स्वीकारतील. अस सांगून तो तिची समजूत काढतो.

त्यावर ती म्हणते लग्न लव्ह असो व अरेंज स्त्रीला त्यांच्या कुटुंबासाठी तडजोड करावी लागतेच. माहेरी मला कबड्डीत खुप नाव कमवायच होत. पण बाबांना ते आवडत नव्हते मग त्यावेळी केली की तडजोड. पुढे जाऊन फॅशन डीसाइन केले. तेव्हापासून तडजोडीची सवय झाली.

तशी आता इथेही करेल. आणि एकदिवस सगळे मला स्वीकारतीलच तसा विश्वासही आहे मला तडजोडीच्या लढाई साठी ती सज्ज झाली. लढाई वाटत होती तितकी तर सोपी नव्हती. ती जमेल तितके प्रयत्न करत होती.

सुरुवात जेवण बनवण्या पासून झाली. तिच्या जेवण बनवण्याच्या पद्धतीत आणि सासरच्या जेवण बनवण्याच्या पद्धतीत फरक होता. मग हिला चांगले जेवण बनवता येत नाही म्हणून कांगावा सुरू झाला.

भाग-२ साठी कमेंट मध्ये नक्की कळवा. मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *