दारू पिऊन मृत झालेल्या नवऱ्याला त्याच्या विधवा पत्नीने लिहिलेले पत्र.

Uncategorized

प्रिय,

काल तुझा अकाली मृत्यु झाला. आयुष्यात स्थिर स्थावर होऊन आनंद उपभोगण्याची मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायको बरोबर गप्पागोष्टी करण्याचे तुझे वय परंतु त्या सुखाला तू कायमचा मुकलास. मात्र तुझ्या या मृत्यूमय आनंदाला तुझे मुले देखील पोरकी झाली रे.

तुझी बायको ही मुकली त्या सुखाला आणि पती सुकला. काय कारण होत या सगळ्यांच तू खोट्या आनंदात रममाण झाला होता. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतोस याचे तुला भानच राहिले नव्हते रे.

लग्न झाल्यापासून पाहते तू कायम मित्रांच्या गराड्यात चिअर्स करत असायचा. मित्र असावेतच पण आपल कुटुंब देखील आहे. आणि त्याबद्दल आपल्या जबाबदारीचा तुला विसर पडला होता. शिवाय रोज रात्री बाटली घेऊन घरी बसणे होतेच. त्यामुळे आपल्या मुलांवर याचा काय परिणाम होतोय याची तू चिंताच करत नव्हता.

रोज रात्री नऊनंतर बाबा आपले नाहीच जणू याची त्यांना सवय लागली होती. पण तुझी भीती देखील वाटत होती, बायकोवर हात उचलणे भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले होते. आपली मुल कितवीत आहे, त्यांना काय हवे काय नको याची तुला पर्वाच नव्हती.

तू आणि तुझे मित्र दारू ही औषधी आहे हे पेपरमध्ये दाखवाचा. परंतु त्याच दारूमुळे आपल्यातला दुरावा वाढला हे तुला समजलेच नाही. किंवा समजून घेण्याची तुझी इच्छाच नव्हती. जर ही बाटली एवढा आनंद देणारी औषध असेल तर ती मी आणि मुलांनी घेतली तर चालले असते कारे?

अधून मधून तुला प्रेमाची भरती यायची पण तू दारू सोडवायची ठरवायचा. परंतु मित्रच आडवी यायची कुठल्या तरी आनंदात किंवा कुठल्या तरी दुःखात तू परत त्यांच्या बरोबर बसायचास की मग पुन्हा सर्व सुरू. मित्राला परत परत दुःखात लोटणारे असले कसलेरे हे मित्र.

जीवनात आनंद मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. परंतु तुम्ही सर्वांनी मात्र वाईट मार्गच निवडला. दारू पिणे सोडून बघितल असत तर यातले अर्धे मित्र गायब झाले असते. तुझे आजारपण चालू झाल्याने घराची आर्थिक परिस्थिती अजूनच ढगमगली.

तुझ्या पोटात झालेल्या पाणी काढणे किडणी वरची सूज उतरवायला औषध घेणे चालू झाले. माझ्या सुद्धा ऑफीसला दांड्या चालू झाल्या. हौस मौस करणे तर दूरच मुलांची फी सुद्धा वेळेवर भरली जात नव्हती.

तुझ्या शेवटच्या आजाराने तर डोक्यावर कर्ज करून ठेवले. तू बरा होणार नाही माहिती असून सुद्धा तुझ्या औषधोपचराचा खर्च थांबवला नाही आम्ही. सरकारला सुद्धा दारू बंदी नको आहे. कारण त्यांचे मिळणाऱ्या महसूलाकडेच लक्ष आहे.

पण माणसांची कामे करण्याची ताकद कमी होणे. आजारपण वाढणे यामुळे होणारे नुकसान सरकारला दिसत नाही का? शिवाय नवरा, मुलगा, वडील गमावणे याची किंमत पैशात कशी मोजणार आहे हे सरकार.

आता तुझ्या आईवडिलांची सेवा मुलांचे शिक्षण ही सर्व एकटीची जबाबदारी झाली आहे. ती मी पार पाडीनच पण महत्वाची म्हणजे माझ्या मुलांना या एकाच प्याला पासून दूर ठेवणे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.

पुढच्या जन्मात मला तूच नवरा म्हणून हवा आहेस. परंतु तुझ्या हातात ग्लास नसेल तरच तुझीच प्रिय अर्धांगनी.

मित्रांनो खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दारू वाईटच असते मग ती किती महाग असुद्या. एन्जॉय करा पण आपलच आयुष्य बर्बाद करू नये. आपलच तर होतो ओ पण सोबतच आपल्या कुटुंबाचे देखील करतो.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *