को-रो-ना पॉ-झि-टि-व्ह सासऱ्याला स्वत:च्या पाठीवर बसवून या सुनेने दवाखान्यात नेले, लोक म्हणत आहेत या सुनेने आपल्या सासऱ्या सोबत..

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

काही दिवसांपूर्वी एका महिलेचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत होते. त्यामध्ये एक महिला को-रोना पॉ-झि-टि-व्ह असलेल्या आपल्या सासऱ्याला स्वतःच्या पाठीवरून रिक्षामध्ये घेऊन जाताना दिसत होती. त्यानंतर सोशल मीडियावरील युजर्सनी या महिलेचे जोरदार कौतुक केले होते.

त्या २४ वर्षीय सुनेचे नाव निहारिका दास असे आहे. तिने या वायरल फोटोवर आपली प्रतिक्रिया देत सांगितले की अशी आशा आहे की, इतर कोणाच्या आयुष्यात अशी परिस्थिती कधीच निर्माण होऊ नये. ही गोष्ट २ जून या दिवशी घडली होती. जेव्हा आसामच्या रहगाव जवळील भाटगाव येथील रहिवासी असलेल्या निहारिका दासला सासरे थुलेश्वर दास यांच्यामध्ये को-रो-ना-ची लक्षणे दिसू लागली.

त्यानंतर निहारिकाने स्वत: ऑटो रिक्षाची व्यवस्था केली आणि त्यांना जवळच्या सामुदायिक आ-रोग्य केंद्रात घेऊन गेली. हे आ-रोग्य केंद्र राहापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. निहारिका पुढे असे सांगते की, “माझा नवरा तेथील सिलिगुडीमध्ये” काम करतो. यामुळे तो घरी नव्हता आणि माझ्या घरी येणारा रस्ता खुप खराब असल्यामुळे तिथे रिक्षा येऊ शकत नव्हती.

त्याच्यातच तिचे सासरे खुप अशक्त असल्याने त्यांना चालता येत नव्हते. त्यामुळे दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे निहारिकाला सासऱ्याला पाठीवरून रिक्षा पर्यत न्यावे लागले. सामुदायिक आ-रोग्य केंद्रात चाचणी घेतल्यानंतर तिथून २१ किमी अंतरावर असलेल्या नागगावमधील को-वि-ड हॉ-स्पि-टलसाठी जावे लागले.

अस असल तरी, तिने सासऱ्याला घेऊन नागगाव को-वि-ड रु-ग्णा-ल-यात पोहोचल्या नंतरही तिथे नीट व्यवस्था नसल्यामुळे निहारिकाला सासर्यांना पाठीवर ठेवून तीन मजल्यांच्या पायर्‍या चढून जाव लागल. कारण तिथे मदतीसाठी कोणीही उपलब्ध नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावर लोक निहारिकाची जोरदार प्रशंसा करत आहेत.

तेव्हा निहारिका म्हणाली, नक्कीच मला आनंद आहे की फोटो पाहून लोकांना आनंद झाला. या फोटोद्वारे मला एकच संदेश द्यायचा आहे की, लोकांनी एकमेकांना मदत करायला हवी. इतकेच नव्हे तर निहारिका पुढे म्हणाली, ग्रामीण आ-रो-ग्य पायाभूत सुविधा सुधारण्याची गरज देखील आहे.

आम्हाला रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे आम्ही माझ्या सासऱ्यांना एका लहान भाड्याने घेतलेल्या व्हॅनमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्यामध्ये जर चुकुनही वाटेत त्या रु-ग्णा-ला ऑक्सिजनची आवश्यकता भासली असती तर, त्याने आपला जीव गमावला असता. तसेच निहारिका स्वतः सुद्धा को-रो-ना पॉ-झि-टि-व्ह आहे. परंतु सोशल मीडियावर तिचा आदर्श सून म्हणून गौरव केला जात आहे.

तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांपासून ते मोठे पत्रकार त्याच्याशी संपर्क साधत आहेत. निहारिका यावर खूष आहे. पण त्या वेळी तिला खरोखरच लोकांच्या मदतीची गरज होती, तिला एकट वाटत होत. यामुळे आसामच्या त्या गावासोबत अनेक गावाच्या आ-रोग्यविषयक अत्यंत बिकट परिस्थिती उघडकीस आली आहे.

निहारिका त्यावर म्हणाली की तिला त्यांच्या गावात एक रुग्णवाहिकासुद्धा सापडली नाही. इतकी वाईट अवस्था गावाची झाली आहे. मात्र सुनेच्या या कठीण कष्टाला यश मिळाले नाही. कारण ५ जूनला गुवाहाटीच्या मेडिकल रिपोर्ट नुसार समजले की तिथे थुलेश्वर दास यांचा सोमवारी मृ-त्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *