देवमाणूस मालिकेतील मंजुळा आहे पुण्याची बिझनेस वुमन, पुण्यात आहे तिची ‘ही’ कंपनी नाव ऐकून विश्वास नाही बसणार…

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

प्रत्येक जण वेगवेगळा असतो, प्रत्येकाला काही तरी नवीन करायचे असते. चित्रपट सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनय क्षेत्राबरोबर इतर क्षेत्रातही स्वतःला कार्यरत ठेवले आहे. अभिनय क्षेत्रात जसे ते पैसे मिळवतात तसेच इतर कोणत्याही क्षेत्रातून ते पैसे मिळवतात, कोणी हा साईड बिझनेस म्हणतात तर कोणी याला आवड म्हणतात.

कलाकार पडद्यावर जसे दिसतात तसेच ते खऱ्या आयुष्यात नसतात. मालिका असो वा चित्रपट प्रत्येक कलाकार पडद्याआड वेगळाच असतो. हल्ली मालिकेतून अनेक नवे कलाकार रसिकांच्या भेटीस येत आहेत. मालिकेतून आलेले प्रत्येक नवीन कलाकार हे उत्कृष्ट आहेतच शिवाय त्यांचा अभिनयाचा दर्जा देखील सर्वोत्कृष्ट आहे.

मराठी वाहिनीवर अनेक मालिकांनी प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे, त्यातील एक म्हणजे देवमाणूस मालिका होय. या मालिकेने फार कमी वेळेत रसिकांची मने जिंकली आहेत. आता ही मालिका शेवटच्या टप्प्यात आली असून यातील डॉक्टर लवकरच कायद्याच्या कक्षेत येणार हे नक्की आहे. या मालिकेला यातील कलाकारांनी भरपूर रंजक बनवले आहे. यातील प्रत्येक कलाकार उत्तम अभिनय करतो, सर्वजण खूप छान आपली भूमिका साकारतात.

आज आपण या मालिकेतील मंजुळा ची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिच्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. प्रतीक्षा ही एक उत्कृष्ट कलाकार आहे. तिने आजवर अनेक चित्रपट व मालिकेत रंजक भूमिका साकारून रसिकांचे मनोरंजन केले आहे. प्रतीक्षा ने ” चल खेळ खेळूया ” या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता.

तीने जरी भरपूर चित्रपटात काम केले असले तरीही तीला देवमाणूस मालिकेतून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. ती या मालिकेतून अगदी घराघरात पोहोचली आहे. अनेक जण तीचे चाहते बनले असून तिची भूमिका प्रेक्षकांना भरपूर आवडली आहे.

प्रतीक्षा ने आजवर अरे देवा, तात्या विंचू लगे रहो, जखमी पोलीस, हे मिलन सौभाग्याचे, मोलकरीण बाई, छोटी मालकीण, क्राईम पेट्रोल, करून गेलो गाव या व अशा अनेक चित्रपट आणि मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रतीक्षा अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट अभिनेत्री असून ती पुण्याची बिझनेस वुनम सुद्धा आहे.

प्रतीक्षा ला नेहमी वाटायच की आपला एखादा व्यवसाय असावा म्हणून तीने पुण्यात सलून खोलले आहे. मांजरी रोड, हडपसर, पुणे येथे तीचे ” APPLE” नावाचे वुमन सलून आहे. या सलून मध्ये भरपूर कमाई होते. या सलून च्या माध्यमातून तीची स्वतःचा व्यवसाय असण्याची इच्छा पूर्ण झालेली पहायला मिळते.

प्रतीक्षा सध्या तुझ माझ जमतय या मालिकेत पम्मीची भूमिका साकारत आहे. तीची ही भूमिका देखील बघता बघता लोकप्रिय होत आहे. ही भूमिका सुरुवातीला अपूर्वा नेमळेकर ही अभिनेत्री साकारत होती. पण तीला रात्रीस खेळ चाले ३ मध्ये शेवंताची भूमिका मिळाली त्यामुळे तीने तुझ माझ जमतय या मालिकेचा निरोप घेतला.

पण आता पम्मीची भूमिका प्रतीक्षा खूपच सुंदर निभावत आहे. या भूमिकेतील तिचा दमदार अभिनय रसिकांना मालिकेकडे आकर्षित करत आहे. प्रतीक्षा नेहमी अशीच पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येऊन आपल्या अभिनयाने झळकत राहो ही सदिच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *