प्रेम असेही- अविवाहित विधवा डोळ्यात अश्रू आणणारी एक हृदयस्पर्शी कथा.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

बापाला ब -द-ना-मीची भीती होती, म्हणून ती ग-र्भा-त-च नको होती. कारण ही तसेच होते तिची आत्या घरातून प-ळू-न जाऊन आं-त-र-जा-ती-य झाली होती. आजोबानी खोट्या मानपान प्रतिष्ठेसाठी आ-त्म-ह-त्या केली होती. आता त्यांना घरात मुलगी नको होती.

घरात पत्नी व सून हवी होती पुढे वंश वाढायला. पण मुलगी आणि बहीण कदापि नको होती. घरातील पुरुषांनी बाहेर खाली पणा केला तरी चालतो. त्याने एक सोडून अनेक लग्न केलेली चालतील. कारण ते पुरुष होते त्यांचे नियम त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी रीतसर बनवले होते, ते पराक्रमी होते. त्यांच्या पिढ्यांचा उद्धार ते करणार होते.

मुलगी घरात जन्माला येईल आणि दुसऱ्यांच्या पिढ्या उद्धारायला जाईल. पुन्हा तिने बाहेर काही केल तर किती ब-द-ना-मी ह्या एक आणि अनेक कारणाने मुलगी नको होती. तशी अमृता पण नको होती बापाला, जरी आईला हवी असली तरी तिचे मत कोण विचारत आहे. तीचे काम फक्त पोटात वाढवायचे आणि जन्म द्यायचा.

कारण ती पण एक स्त्री आहे आणि ती जि-वंत आहे हीच या पुरुष प्रधान तिच्यावर केलेली मेहरबानी होती. चोरून ग-र्भ-धा-र-णा चाचणी केली आणि यात ती दिसली बापाला. मग प्रयत्न झाले तिचे अस्तित्व विश्वात येऊ नये. म्हणून डॉक्टरांनी नकार दिला ग-र्भ-पा-ता-ला मग अनेक रामबाण औषधांचा वापर केला पण नकळत विसरले की, रामबाण निरपराधाला व-धा-ला नव्हता कधी.

सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि जोराने रडत ही जगात आली. पण निराश होऊन बापाची मान खाली गेली. बाराव्या दिवसात नामकरण विधी असतो पण हिचा लगेच झाला. बाप म्हणाला काय पाप केले मी म्हणून ही अ-व-दसा माझ्या घरात जन्माला आली.

अ-व-द-सा का तर मोठी झाल्यावर वाकडे पाऊल पडेल, का तर आपली ब-द-ना-मी होईल याच नाग भीतीने अनेक कळ्या खुलण्याच्या पहिले ग-र्भा-त-च खुरडल्या होत्या. पण अमृताचे नशीब ती जन्माला येऊ नये म्हणून बापाने प्रयत्न करूनही तिचा जन्म झाला. परंपरा जगाच्या लाजेने पाळायच्या म्हणून मग पाचवी, बारस झाल.

बारशाला कुणीतरी अमृता नाव सुचवल पण तिची आजी तिला ये अ-व-द-सा अशीच बोलायची. तिला अवदसा म्हणजे काय हे सुरुवातीला माहीतच नव्हते. जसा त्या शब्दांचा अर्थ माहित झाला तशी ती दुःखी झाली. पण तक्रार करायची कुणाकडे इथे कुंपणच शेत खात होते.

लहान असल्या पासूनच तिच्यावर निर्बंध लादले होते. मुलीच्या जा-तीने जास्त खिदळायचे नाही, उड्या मारत फिरायचे नाही, परक्या माणसांबरोबर बोलायचे नाही, सातच्या नंतर घराबाहेर पडायचे नाही, कपडे संपूर्ण अंगभर वापरायचे.

गावात सातवीपर्यंत शाळा होती. सातवीला चांगल्या गुणांनी पास झाली. पण पुढे शिकायला पाठवले नाही. तिथे तिने काही केले तर तिचा पाप नावाचा प्राणी या एक आणि अनेक दक्षता घेत होता. आता ती वयात आली आणि जणू झिंग्या कर तिच्यावर लादला गेला.

तिच्यावर अनेक अटींची वाढ झाली. जवळजवळ घराच्या बाहेर पडणे मुश्कील होऊन गेले. पुरुषांशी बोलले तर दूर तिच्या मैत्रिणी बरोबर बोलणे पण कमी झाले. एक दिवशी धनंजय पाहुणा म्हणून गावात आला.

भारतीय लष्कर सेवेत असणारा त्याची आत्या तिच्या गावात राहत होती. गावात सहज फेरफटका मारत असताना अमृता आणि त्याची नजरानजर झाली. तिने लगेच नजर बाजूला फिरवली. आता समोरून तो निघून गेला असेल म्हणून तिने वर मान करून पाहिले. तर तो तिच्याकडे एकटक पाहत होता. पुन्हा नजरानजर झाली मी तिथून निघून गेली.

कारण नकळत नयन बाण दोघांच्या हृदयात घुसले होते. धनंजयला ती मनातून आवडली होती, मित्राकडून चौकशी केल्यावर समजले की तिच्या घरातील वातावरण तिच्या किती आणि कसे विरोधात आहेत. लष्करात ला धनंजय आणखीनच तिच्या प्रेमात पडला. ती दिसावी म्हणून धडपडू लागला, अमृतालाही धनंजय ला बघावे असे सारखे वाटत होते.

अनेक दिवसांच्या एकमेकांच्या पाहण्यात किती दिवस घालवायचे म्हणून त्याने तिला भेटायचे ठरवले. पण ते सहज शक्य नव्हते. हिला तर घरातून बाहेर निघायची चोरी होती.
बराच विचारांनी त्याने तिला निरोप देऊन भेटायला बोलावले. भेटण्याचे ठिकाण गावातील नदी आणि वेळ संध्याकाळची कारण तिथे कोणी नसणार.

पण कुणालाही जोडीला न घेता. धनंजय नदी किनाऱ्याला जाऊन तिची वाट पाहत होता. हाताच्या बोटांनी ती येईल असे लिहीत होता. पण ती नक्की येईल का? मनात या प्रश्नाने खळबळ माजवली होती. त्याला सहज येणे शक्य होते. पण तिला अनेक अडथळे पार करायचे होते. काही तरी खोटे सांगायचे होते. घरात मग हळू सर्वांच्या नजरा चुकवून त्याला भेटायचे होते.

पण तिने त्याला भेटायचे निश्चित केले होते आणि ती मैत्रीण आजारी आहे मला बरेच दिवस भेटली नाही हे कारण सांगून घरातून बाहेर पडली. लपत-छपत नदीच्या दिशेने निघाली धनंजय तिची वाट पाहत होता. एव्हाना त्याला येऊन दोन तास उलटून गेले होते, अंधाराने बऱ्यापैकी बालसे घातले होते.

शेवटी निराश होऊन तो उठला आणि जायला निघाला त्याची खूप निराशा झाली होती. काही अंतर तो चालला आणि पुन्हा विचार करू लागला. आपण निघून गेलो आणि ती आली तर तिच्या नजरेत आपण उतरून जाऊ धनंजय लगबगीने पुन्हा माघारी येऊन बसला. दहा-पंधरा मिनिटे झाली असतील आणि त्याच्या कानावर पैंजणांचा मंजूळ स्वर पडला.

तिच्या येण्याने जणू पाणी त्याला थरथरल्यासारखे वाटले. तो सर्वोच्च आनंदाने मनात भरला होता, युद्धात शत्रूवर विजय मिळावा तसा. आणि देह भान विसरून नाचवे अशी त्याची अवस्था झाली होती. ती मंजुळ पावलाने येऊन त्याच्या शेजारी बसली. तो तिला आणि ती त्याला निरखत होती पण त्यांना अंधाराने तो आनंद घेऊच दिला नाही.

पण दिवसा एकमेकांना चोरट्या नजरेने पाहिले रूप समोर येत होत.

तिचे बोलके डोळे त्याला बरेच काही सांगून गेले होते. खऱ्या प्रेमाला हेच वरदान असते.अव्वल म्हणा किंवा मुके शब्द म्हणा तरी डोळे एकमेकांशी मनसोक्त बोलत असतात. त्यांनी अगोदरच एकमेकांच्या डोळ्यातून संवाद साधला होता. आता फक्त एकमेकाला दोघांचा आवाज ऐकायचा होता. पुढाकार घेऊन त्याने तिचा हात हातात घेतला आणि आयुष्यातील पुरुषाचा स्पर्श तिने पहिल्यांदा अनुभवला.

त्या स्पर्शात आपले पणाच्या भावनेचा तिला अनुभव आला. सर्व अंगात जणू एक नव्या चैतन्याच्या तिच्या समावेश झाला होता. धनंजय ने विचारले तिला सखे मला तुझे नाव ज्ञात आहे. पण ते तुझ्या मुखातून ऐकायचे आहे. अमृताचे स्वर थरथरले होते. आता कुंद हवेने आपली मुजोरी सुरू केली होती.

शब्द सहज उमटायला तिला सयास पडत होता. अ अ अमृता तो जगातला पहिला आवाज होता ज्यात कँप होता. पण त्याने हृदय द्रावले होते. सिनियरचा पहाडी आवाज आणि त्याला प्रतिक्रिया देतांना याचा पहाडी आवाज असायचा. पण आजचा सौम्य आणि मितभाषी आवाज संवाद घडत होता.

त्याने तिचा हात सर्वस्य प्रेमाने हळुवार आवळला. नाजूक चुं बन त्याला घेतले. तो हात तसाच घेऊन हृदयाशी कवटाळला. अमृताला पुरुषाकडून असे प्रेम प्रथमच लाभले होते. नकळत तिच्या डोळ्यात अश्रूंचा पूर दाटला त्याने विचारले तिला काय झाले प्रिये का रडतेस.

आयुष्यात मला असे प्रेम प्रथमच लाभले. आयुष्यात आजपर्यंत अपमानकारक वागणूकच मिळाली. एवढे प्रेम कधी मिळाले नाही आणि मिळेल याची शाश्वती नव्हती मला. नकळत त्याने तिला कवटळले आणि ती ओक्साबोक्सी रडत होती. जणू तो बापाच्या मायेने तिला पाठीवर थोपटून गप्प करत होता.

आता नकळत वाऱ्याची झुळुकही थांबली होती. ती सोय आलामत झाली होती आणि तो प्रेम काफिया जणू त्याला तिच्या लहानपणापासून ची माहिती मिळाली होती. नकळत त्यांनी नदी, काजवा, आकाशातील चंद्राला साक्षी म्हणून एकमेकाला पती-पत्नी म्हणून स्वीकारले होते.
समाज मान्यता असावी हा आग्रह दोघांचाही नव्हता.

विवाह नंतरचे जे पुरुष आणि स्त्री मध्ये घडते. ते विवाहपूर्व अमृताने धनंजय मध्ये नकळत घडून आले. कारण दोघे संपूर्ण जगाला विसरले होते. जन्मोजन्मीच्या संगतीच्या आनोभागा घेतल्या होत्या. पुढच्या सुट्टीत तो तिला समाज मान्यतेने अर्धांगिनी बनवणार होता.

आज ती खूपच आनंदी होती नकळत स्वतःच्या पायांनी नदीच्या पाण्यात असलेल्या चंद्राला ती नाचवत होती. तिच्या आनंदात विरजण पडायला नको म्हणून तो चंद्रही नाचत होता.

अमृता आणि धनंजय एकमेकांच्या सहवासात वाहत गेले की रात्र अर्ध्यावर येऊन ठेपली. धनंजयच्या लक्षात आले खूपच उशीर झाला होता. आता निघायला हवे दोघे एकमेकांचा निरोप घेऊन निघाले.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता भेटणार होते. न चुकता इकडे अमृताच्या घरातील वातावरण अतिउष्ण झाले. रात्रीचे बारा वाजले होते आणि साडेचारला मुलगी घरातून गेली होती. बापाने आईला शिव्या देता देता मारझोड केली होती. भाऊ, काका शेजारचे अमृतला शोधायला निघाले होते.

सर्वांनी शोधाशोध केली ती सापडली नाही तसे सर्व पुरुष माघारी आले. अमृता घरातून इतका वेळ बाहेरच असणे हे प्रथमच घडले होते. तिच्या काळजीने घरात आईच व्याकूळ होती. बाकी सर्वांच्या चेहऱ्यावर संताप दाटला होता आणि तेवढ्यात अमृताने घरात प्रवेश केला. बाप ताडकन उठला आणि तिच्या कंपरे कमरेत लाथ मारली ती जाऊन भीतीवर आदळली.

आई रडत रडत तिला उचलायला धावली बापाने आईच्या कानाखाली लागून दूर लोटली शेजारची काकू आईला आवरु लागली घरातील समस्त पुरुष वर्ग तिला मारू लागला.पण सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला अमृता त्यांच्या मारजोडीला भिक घालत नव्हती. जणू ती अमृत पिऊन अमर झाली होती. या साऱ्या घडणाऱ्या प्रकाराची तिला पूर्वकल्पना होती. ती समयाशी सादर झाली होती मारझोड करणारे हात शरमले.

भाग-२ साठी कमेंट मध्ये नक्की कळवा. मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *