एक हृदयस्पर्शी कथा वेडे प्रेम.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

आजच्या जमान्यात संसार योग्यरीत्या चालावा म्हणून पती व पत्नी दोघेही नोकरी करत असतात. पण दोघेही जॉब करत असताना घराकडे व मुलबाळांकडे थोडतरी दुर्लक्ष होतच. हेच दुर्लक्ष भविष्यात खूप मोठा प्रश्न निर्माण करतो. हा प्रश्न कधी सोडवला जातो तर कधी त्या प्रश्नात माणूस गुंतून जातो.

आई आज शेवटचा पेपर आहे मला घ्यायला येऊ नको. आम्ही सर्व मैत्रिणी रिद्धीकडे जाणार नाईट आऊट करणार. आई म्हणाली आग तुझ हे काय परीक्षा संपली की नाही तुझ सुरू झाल. बाबांना का नाही सांगितले ते ओरडतात माझ्या नावाने तू सांगशील बाबांना त्यांना वेळ तरी असतो का?

आणि हे काय बॅग मध्ये काय घेतल एव्हढ आग आताच तर सांगितल नाइट आऊट करणार आहे मग सोबत ड्रेस नको का? प्रियूची दहावीची परीक्षा होती स्मिताने तिला सेंटर वर सोडलं व ऑफिस ला गेली. रिद्धीच्या आईला विचारते म्हटल तर तिचा फोन व्यस्त होता. नंतर कामात मिसळून गेली ५ वाजता घरी आली आणि रिद्धीच्या आईला फोन लावला.

रिद्धीची आई म्हणाली नाईट आऊट वैगरे काहीच नाही रिद्धी घरीच आहे. स्मिताने सर्व मैत्रिणींकडे फोन केले मात्र प्रियु कुठेही नव्हती आता मात्र स्मिता घाबरली. तिने लगेच नवरा सुमेधला फोन लावला आणि म्हणाली अहो ऐकता का? तो म्हणाला मी व्यस्त आहे मित्रांसोबत बोलून फोन ठेवला. तिने परत फोन लावला व सुमेधला पूर्ण हकीकत सांगितली तो म्हणाला मी आलोच घरी, सुमेध लगेचच घरी आला.

आल्याआल्या मी त्याला बोलले तुझ लक्ष कुठ असत तुझ्यामुळेच ती वाया गेली वैगरे वैगरे. ती म्हणाली गेली असेल वाया पण आता आपण पो-लि-सांकडे गेलेच पाहिजे. ते दोघे पो-लि-सां-कडे गेले. पो-ली-स भलतेच प्रश्न विचारू लागले काही ल-फ-ड होत का मुलीचं? साहेब अहो काय बोलताय माझी मुलगी अश्यातली नव्हतीच.

स्मिताने सर्व पो-लि-सां-ना सांगीतले ती घरून जाताना बॅगमध्ये कपडे घेऊन गेलीय असेही सांगितले. तिने पैसे आणि दागिने नेलेय का पोलिसांनी विचारले? हो दागिनेही नेलेय. पो-लि-सां-नी तिला लगेच शोधून काढले. रेल्वे स्थानकावर एक मुलासोबत सापडली. पोलिसांनी स्मिताला व सुमेधला पो-लि-स-स्टेशन मध्ये बोलावले.

स्मिताला धक्काच बसला ती एक किराणा दुकानात काम करणाऱ्या मुलासोबत पळून गेली होती. तो २० वर्षाचा मुलगा होता. सुमेध तेथेही स्मितालाच दोष देत होता एव्हढी पोरगी हाताबाहेर गेली तुझ लक्ष कुठ होत? स्मितालाही आपण स्वतः अपराधी आहोत असे वाटू लागले. मधेच इंस्पेक्टर बोलले साहेब काय तुम्ही मॅडम ला दोष देत आहात तुम्ही कुठ होता.

तुम्ही पण घरीच राहतात ना? मग वडील म्हणून तुमची पण जबाबदारी आहेच की. तुमची भांडण बाजूला ठेवा या केसचे काय करायचे ते बघा. प्रियु म्हणाली आम्हाला लग्न करायचेय त्यावर इंस्पेक्टर ने दोघांना धमकावले तुम्ही दोघ नाबालिक आहात म्हणून तुम्ही लग्न करूच शकत नाही. तुला पळवून आणले म्हणून या मुलाला शिक्षा होईल आणि तू पण घरून दागिने व पैसे चोरून आणले म्हणून तुलाही शिक्षा होईल.

आता मात्र प्रियु घाबरली व आईसोबत घरी यायला तयार झाली. दोन दिवस प्रियु खोलीतून बाहेर आली नाही व कोणाशीही बोलत नव्हती. शेवटी स्मिता आणि सुमेध तिला कोन्सलर कडे घेऊन गेले. अनुपमा मॅडम कोन्सलर म्हणून एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व होते. तिने प्रियुबद्दल सर्व जाणून घेतले.

प्रियु जे काही सांगत होती ते सर्व ऐकून स्मिता आणि सुमेध ला धक्काच बसला. प्रियु म्हणाली माझे आईबाबा सतत भांडत असतात. आई नेहमी म्हणते प्रियुसाठी मी सगळ सहन करतेय नायतर कधीची निघून गेली असती. कधीकधी वाटते आ-त्म-ह-त्या करावी म्हणजे माझ्यामुळे होणार त्रास कमी होईल. स्मिताच्या डोळ्यात पाणी आले सुमेधने स्मिताचे डोळे पुसले.

प्रियु सांगू लागली आणि बाबा ते तर नेहमी बाहेरच असतात त्यांचे काम व मित्रांसोबत पार्टी त्यांना माझ्यासाठी वेळच नसतो. माझ्यावर कोणी प्रेमच करीत नाही. माझ्याकडे कोणाचेही लक्ष नसते. एकदा मला निबंध स्पर्धेत बक्षीस मिळाले आईला दाखवण्यासाठी तिच्याकडे गेली ती बाबांवर चिडलेलिच होती मी तिच्याजवळ गेली ती ओरडली व म्हणाली जा तिकडे अभ्यास कर. मला खूप वाईट वाटले.

मला पेन हवा होता तेव्हा मी दुकानात गेली. माझ्या हातात मार्कशीट होती राजने ती पहिली माझी प्रशंसा केली मला खूप आनंद झाला तेव्हापासून मी त्याला माझं सर्वकाही सांगू लागले. आणि आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो. अग प्रियु हे प्रेम नाही आकर्षन आहे राज तुझा मित्र आहे इथपर्यंत ठीक आहे पण लग्न करण योग्य नाही. आधीच तुझ हे वय लग्नाचे नाहीच आणि तू त्याच्यासोबत ऍडजस्ट करू शकशील.

तुझ्या अंगावरील ड्रेस त्याचा महिन्याचा पगार नाही. अनुपमा मॅडम ने खूप छान समजून सांगितल हे बघ प्रियु तुझे आईबाबा भांडत असले हे खरे असले तरी हे खरे नाही की त्यांच तुझ्यावर प्रेम नव्हत. तुझ्या वडिलांना तुझ्यासाठी वेळ नाही पण ते हे सर्वच तुझ्या भविष्यासाठीच करताय न तू पळून गेली तेव्हा तुझ्या आई बाबांची काय अवस्था झाली होती तुला माहीत आहे?

अनुपमा ने प्रियुला छान समजावून सांगितले प्रियुला तिची चूक कळली व आई बाबांवरची नाराजगी ही दूर झाली. स्मिता आणि सुमेध अनुपमा मॅडम ला म्हणाले मॅडम आम्हाला कळलेच नाही की आमच्या छोट्या छोट्या भांडणाचा एव्हढा मोठा परिणाम होईल.

त्या दिवसापासून स्मिता आणि सुमेध यांच्यातील भांडणे कमी झाली. सुमेध ही लवकर घरी येऊन प्रियुला वेळ देतो. प्रिहुही आता नीट अभ्यास करते. प्रियु लहान होती म्हणून आणि वेळेच पो-लि-सांना सापडली म्हणून मात्र खूप अश्या मुली आहेत. ज्या त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य बरबाद करतात.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *