घराजवळील ही वस्तू वापरा फक्त २ मिनिटात धान्यातील किडे पळून जातील पुन्हा धान्यातील किडे कधीच होणार नाही.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक असतो योग्य आहार या आहारासाठी धान्य, कडधान्य आपण वापरत असतो. हे जर खराब असले तर याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतात.

तुम्ही हाडामासाच्या शेतकरी असाल तर धान्य खराब राहिल्यास विक्री करताना कवडीमोलाने व्यापारी खरेदी करतात. म्हणजेच आपला फायदा न होता नुकसान होते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला हे माहीतच हवे की, धान्यामध्ये किडे अळ्या का होतात. धान्यामध्ये किडे अळ्या होऊ नये म्हणून काय करायला हवे.

धान्य वर्षभर आपल्याला पुरावे म्हणून आपण धान्य साठवून ठेवत असतो. परंतु याच धान्यांमध्ये साधारता दहा-बारा प्रकारचे किडे होतात. त्यामध्ये सौंड, भुंगेरा, खापराकिडा तांडळातील पतंग असे किडे होतात. हे किडे जास्त पावसाळ्यात पाहायला मिळतात.

पावसाळ्यात असलेले तापमान व आर्द्रता किडींना पोषक ठरते म्हणून पावसाळ्यात जास्त धान्याला जपावे लागते. कीटकांचा जीवनक्रम १ ते १५ दिवसांचा असून त्यांची प्रजनन क्षमता भरपूर असल्याने अनुकूल हवामानात त्यांची संख्या एकदम झपाट्याने वाढते.

कृषी तज्ज्ञांच्या मतानुसार धान्याला कीड का लागते तर किडा भुंगेरा, सौंड, धान्याचा पतंग यांचा प्रादुर्भाव शेतात धान्य पिकत असतानाच होतो. पिकलेल्या धान्यावर ते अंडी घालतात आणि अशा रीतीने उपद्रव शेतातून साठुन घेतो.

साठवणुकीचे साधने पोते, कनग्या यामध्ये किडी तआसरा शोधतात. साठवलेल्या धान्यात अगदी कमी किडी असल्या तरी अनुकूल परिस्थितीत त्यांची भरमसाठ वाढ होते. म्हणूनच खबरदारीचे उपाय करण्याची दक्षता घेणे आवश्‍यक असते.

त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे धान्य उन्हात चांगले वाळवावे. धान्य भरण्याची साधने नेहमी स्वच्छ व कोरडी ठेवावीत. जुनी पोती वापरायचे झाल्यास शक्य झाल्यास धुरी द्याव किंवा धून वापरावी. धान्य साठवण्याची जागा नेहमी स्वच्छ व कोरडी ठेवावीत.

धान्य पोत्यात साठवताना जमिनीवर फळ्या, बांबू किंवा पॉलिथिन पेपरचा वापर करावा. त्यामुळे जमिनीतील ओलावा पोत्याला लागणार नाही. साठवणूक करताना शक्यतो हवामान आधुनिक असावे.

अशा प्रकारे धान्याची काळजी घेतल्यानंतर याच धान्यांमध्ये आपल्याला आपले धान्य वर्षभर कीडमुक्त राहण्यासाठी आपल्याला या वनस्पतीचा वापर करायचा आहे. या उपयासाठी दोन वनस्पती लागणार आहे.

१) गुळवेल- धान्यामध्ये वर्षभर किडे-मुंग्या न होण्यासाठी गुळवेल अत्यंत फायदेशीर ठरतो. म्हणून गुळवेल चा वापर करताना गुळवेल चे बारीक बारीक तुकडे करावे किंवा गुळवेलचा जो वेळ आहे. तो वेल जशास तसा त्यामध्ये तुम्ही जरी ठेवला तर याचा अत्यंत फायदा होतो.

२) कडुनिंब- कडुनिंब सर्वत्र आढळतो या कडुलिंबाचा पाला किंवा या वनस्पतीच्या काड्या आहे त्या धा न्यामध्ये वापरायच्या आहेत. जर तुम्ही कोटीमध्ये वापरत असाल तर साधारणतः दोन ते तीन थर करायचे आहेत. प्रत्येक थरांमध्ये ४ ते ५ काड्या असाव्यात. यामुळे या सर्व समस्या कमी होतील.

तसेच ज्या व्यक्तींच्या घरामध्ये भुंगे किडे झालेले आहे त्यामध्ये तुम्ही या लिंबाच्या काड्या त्यामध्ये टाकुन पहा. ते किडे मरतील तिथे त्यांची प्रजनन कमी राहील ते वाढणार नाहीत. असे या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी कडुनिंबाची पाने अत्यंत उपयुक्त असतात.

जर तुमच्या धान्याला ओलसरपणा आलेला असेल तर तुम्ही घरामध्ये असलेला कोणताही पेपर त्यामध्ये टाकू शकता. आद्रता शोषून पेपर घेतो. त्यामुळे धान्याला ती आद्रता लागत नाही. असे हे तुम्ही साधे उपाय घरी करू शकतात अशा या उपायाने तुमचे सर्व धान्य सुरक्षित राहील.

मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहि ती ही सर्वसा मान्य माहि तीवर आधा रित आहे. मराठी तडका या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *