स्त्रियांनी कोणत्या दिवशी आपले केस धुवू नये. नाहीतर होतात वाईट परिणाम.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

प्राचीन धर्मामध्ये आपल्या जीवनासाठी उपयुक्त अशा अनेक बाबी सांगितलेल्या आहेत. आपल्या धर्मशास्त्रात काही असे कार्य आहे ज्यांना ठराविक दिवशी करणे विशिष्ट मानले गेले आहे. कारण आपल्या प्रत्येक वाराचे वेगळे महत्त्व आहे.

कारण प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी निगडित आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला कल्प म्हटले जाते तर देवी-देवतांचा एक दिवस हा आपल्या एक हजार दिवसान एवढा असतो. भगवंतांची आयुमर्यादा माणसांच्या आयु पेक्षा जास्त असते. त्याच प्रकारे सृष्टीचे चक्र चालत असते.

तसेच आपल्या धर्मात कोणत्या दिवशी कोणते कार्य करावे व कोणते कार्य करू नये हे सांगितलेले आहे. तर आपण या लेखात जाणून घेणार आहोत की स्त्रियांनी कोणत्या दिवशी आपले केस धुवू नये. यामध्ये काही सण-उत्सव ही शामिल आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार गुरुवारी केस कापणे शेविंग करणे आणि नखे काढणे हे अत्यंत अशुभ समजले जाते. असे म्हटले जाते
की असे केल्याने आपल्या मुलाबाळांवर संकटे येतात आपल्या हिंदू पंचांगानुसार आपले सर्व सण तिथीनुसार साजरे केले जातात. ते खूप शुभ असतात म्हणून कोणत्याही सणाच्या एक दिवस अगोदरच केस धुणे शुभ असते.

ज्योतिष शास्त्राच्या मान्यतेनुसार अमावस्याच्या वेळी चंद्र एक तर उच्च स्थितीत असतो किंवा नीचीय स्थितीत असतो. म्हणून अमावस्येला शक्यतो केस धुणे टाळावे. आणि हे करणे टाळले नाही तर त्यांच्या जीवनात याचा खूप परिणाम पडतो. त्यांच्या जीवनात अशांतता येते व अडचणी निर्माण होऊ शकतात.

सुवासिनी स्त्रिया सोमवारी आपले केस धुवू शकतात. जर सोमवारी तुमचा उपवास असेल तर केस धुऊ नये. सोमवारी जा स्त्रियांच्या बाळाचा जन्म झाला असेल त्या स्त्रियांनी आपले केस धुऊ नये. असे केल्याने आपल्या बाळावर परिणाम होऊ शकतो. मंगळवारीही सुवासिनी स्त्रियांनी आपले केस धुवू नये असे केल्यास आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

त्यासोबतच व्यवहारिक जीवनातही अडचणी येऊ शकतात. म्हणून मंगळवारी केस धुऊ नये. आणि मंगळवारी केस धुणे आवश्यक असेल तर आवळ्याचे चूर्ण लावून केस धुवावेत त्याने तो दुष्ट लागत नाही. सुवासिनी स्त्रिया बुधवारी आपले केस धुवू शकतात. पण जर आपला लहान भाऊ असेल तर बुधवारी केस धुऊ नका असे केल्यास हा दोष आपल्या लहान भावाला लागतो.

या दोषातून मुक्त होण्यासाठी आपण वरून देव किंवा संकट मोचन हनुमान आणि व गणपती बाप्पाची आराधना करू शकतो. गुरुवारी स्त्रियांनीच नव्हे तर पुरुषांनीही आपले केस धुऊ नये व फर्शी पुसू नये. गुरुवारी केस धुतल्यास दारिद्र्य येते. त्याशिवाय सुवासिनी स्त्रियांनी गुरुवारी केस धुतल्यास त्यांच्या पतीचे आयुष्यही कमी होते.

गुरुवार हा गुरु ग्रहाचा वार आहे आणि गुरु ग्रह आहे म्हणून अशी कामे करून गुरूला हलके करू नये. जर गुरुवारी केस धुणे आवश्यक असेल तर केसांना बेसन पीठ किंवा हळद लावून केस धुवावेत. शुक्रवारी सुवासिनी स्त्रिया केस धुवू शकतात. पण ज्या स्त्रियांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे किंवा ज्यांना पुत्र आहे. त्या स्त्रियांनी शुक्रवारी केस धूऊ नये.

जर शुक्रवारी केस धुणे अत्यंत आवश्यक असेल तर दही लावून केस धुवावे. शनिवारी सुवासिनी स्त्रियांनी अजिबात केस धुवू नये. कारण शनिवार हा शनीचा वार आहे व सर्व देवी-देवतांनमध्ये शनीला उच्च स्थान दिलेले आहेत जर तुम्हालाही वाटत असले ही शनीदेवाची आपल्यावर महिमा झाली पाहिजे तर शनिवारी केस धुवू नका.

शनिवारी केस धुणे अत्यंत आवश्यक असेल तर आधी आपल्या केसांना दूध लावावे मगच केच धुवावेत असे केल्याने शनी दोष लागत नाही. असे म्हटले जाते की शनिवारी, सोमवारी आणि गुरुवारी सूर्य नक्षत्रातून पडणारी किरणे आपल्या डोक्यावर प्रभावशाली परिणाम पाडतात.

सर्वांना तर माहितीच आहे केसांपासून आपल्या डोक्याचे संरक्षण होते म्हणून अशा अनुकूल परिस्थितीत केस कापणे याला शास्त्रांमध्ये नकार आहे. म्हणून सांगितलेल्या दिवशी केस धुऊ नये आणि कापू ही नये.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *