कथा एका वीर पत्नीची.. एक सैनिक देशसेवेसाठी बॉर्डरवर जायला निघतो तेव्हा..

Uncategorized

वीर जवान तुझे सलाम.

अतुल बाहेरच्या अंगणात एक सलग खडे मारत विचार करत होता. उद्या त्याला बॉर्डर वर परत सुट्टी संपून जायच होत. नुसत नेहमीच्या कामात रुजूवायच नव्हत. तर एका मिशनसाठी त्याची निवड झाली होती. तो या विचारात होता की उद्या मिशन वरती गेल्यानंतर त्याच काही बर वाईट झाल?

तर त्याच्या कुटुंबाचा कस होईल. त्याला एक महिन्याचा मुलगा होता. बायकोच्या डिलिव्हरी साठी अतुल सुट्टी काडून आला होता. या एका महिन्यात त्याला मुलाचा इतका लळा लागला होता की, त्याला सोडून जायला अतुला जड झाले होते. मनात खूप वाईट विचार येत होते. मधूनच त्याच्या मनात विचार आला.

आपण जाणार तर आपली ही परिस्थिती आहे. बायकोची स्थिती कशी असेल, सकाळ पासून ती माझ्या सामानाची आवरा आवर करतेय. काय होत असेल तिच्या मनाच. तो तिला हाक मारतो. संध्या जरा इकडे ये. तशी संध्या त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणते काही काम होते का?

मला गडबड होती अजून खूप काही खायला तुला दयायचेय त्याची तयारी चालू आहे बघ बोल पटकन. संध्या जरा बसणा बोलायचं होत. अतुलच्या आवाजातला फरक तिला जाणवून आला आणि संध्याही हळुवार अतुलकडे पाहत त्याच्या शेजारी बसली.

आपल्या नजरेने अतुलला पारखत होती. काय झाल अतुल अस मंदावलेला सुरात तिने अतुलला विचारल. तसा अतुल बाळा बद्दल काही बोलायला लागला. तिला जाणवत होत की, अतुला बोलायच काही वेगळेय आणि तू बोलतो काही भलतच. तिने त्याच्या हातावर हात ठेवून त्याला धीर देत म्हटले जे मनाते ते बोल अतुल ते मला ऐकायचे आहे.

अतुलने मोठा श्वास घेतला आणि तो सोडत सोडत तिच्याकडे पाहायला लागला. संध्या या एका महिन्यात तुझी आणि बाळाची खूप सवय झाली ग. तुझ्या अवती-भवती असण्याची सवय झाली. अतुल अजूनही मेन विषयात शिरत नव्हता. हे संध्याच्या पारखून असलेला लगेच कळले.

ती म्हणाली अतुल तुझी नजरच काही वेगळेच सांगते रे तू आम्हाला सोडून जाणार याच वाईट कमी आणि काळजी जास्त वाटते. तुझ्या नजरेत मला काळजी वरचे प्रेम दिसून येते. तुझ्या मनातील हुरहूर मला जाणवते. कसला इतका विचार करतोय की तू माझ्याशी बोलायलाही तुला भीती वाटते.

आता तुमच्या डोळ्यात पाणी येत आणि खरच तो विषयाला धरून संध्याला सांगू लागतो. संध्या अगदी बरोबर ओळखलस तू मला तुमची सर्वांची काळजी वाटते. उद्या मी मिशन वर जाणारे माझी निवड झाली याचा मला खूप आनंद आहे. पण काळजी वाटते की उद्या मला या ऑपरेशनमध्ये मरण आले तर तुझ काय?

आपल्या बाळाच कस होणार, मम्मी-पप्पांना तू सांभाळशील ग. पण पोरा विना जगण मुश्किल होऊन जाईल त्यांच. हे विचार मगा पासून माझ्या मनात येतात बघ. संध्या या देशासाठी किती गोळ्या छाताडावर खायला मी तयार आहे. या भारत मातेचे रक्षण करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. आणि या माती साठी माझा जीवही पणाला लावायला तयार आहे.

पण एक कर्तव्य पार पाडताना मी दुसऱ्या कर्तव्याला मूकतोय अस वाटतय ग. शहीद जवानांच्या पत्नीचे जीवन नंतर खूप खडतर जाते. ज्या देशावर आपण अतोनात प्रेम करतो तो देश, त्यातील देशवाशी माझ्या माघारी माझ्या कुटुंबाची किती दखल घेतील याची चिंता वाटते ग.

माझा मुलगा ज्याला काही कळत पण नाहीये ग. तो बापाविना सगळ जीवन कस काढेल. बोलणा संध्या तुला भीती नाही का वाटत.

भाग-२ साठी कमेंट मध्ये नक्की कळवा. मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *