कथा एका वीर पत्नीची.. एक सैनिक देशसेवेसाठी बॉर्डरवर जायला निघतो तेव्हा.. भाग- २

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

संध्या अतुल ला पूर्ण नजरे मध्ये सामावून घेत असते. त्याचे अश्रू पाहून तिच्याही डोळ्यात अश्रूंची गर्दी झालेली असते. संध्या बोल ना भीती नाही का वाटत अतुल पुन्हा तिला विचारतो. तशी संध्या हळुवार बोलायला सुरुवात करते. अतुल जेव्हा आपल लग्न झाल होत तेव्हा मी तुला सप्तपदी मध्ये ७ वचन दिलेले.

ते फक्त माझ्या मनात आहे, कोणाला आजवर बोलून नाही दाखवली आणि त्याची काटेकोर पालन करते. पण आज तु असा कावरा बावरा झाला आहेस म्हणून मी तुला सांगते.

पहिले वचन तुला दिलेले- मी तुझ्या देशाच्या सुरक्षेच्या कर्तव्याच्या आड कधी येणार नाही. म्हणूनच मी डिलिव्हरीच्या वेळेला तू माझ्या सोबत असावा अशी अपेक्षा बोलून नाही दाखवली.

दुसरे वचन- तुझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्या एकटीचे असेल. तुझ्यावर करोडो कुटुंबाची जबाबदारी तर मी एकाची घेऊ शकत नाही.

तिसर वचन- तुला कोणत्या भावनेत बंधनात अडकून न ठेवता तुला प्रत्येक वेळी मी तुझ्या जबाबदारीची जाणीव करून देण आहे. जे मी आता करते.

चौथ वचन- तुझ्याकडे सोन, वैभव, दागदागिने हे मागण्यापेक्षा देशाच्या सुरक्षेचा एक आजाद भारताचा दागिना मागेल.

मी तुला दिलेल ५ वचन- आपल्या वैवाहिक जीवनाची जितकी क्षण मिळतील त्यात मी समाधान मानेल. परंतु कधी देवापुढे हात नाही जोडणार की माझ्या नवऱ्याची मला साथ हवी आहे. म्हणून त्यांना जिवंत ठेव. पण श त्रू सेनेचा एक सैनिक अजून मा रा वा म्हणून त्यांना जिवंत ठेव हे नक्की त्याच्याकडे मागेन.

मी तुला दिलेले माझ ६ वचन- आपल्या मुलाला किंवा मुलीला मी या देशाच्या सेवेसाठी तयार करेल. आणि माझ ७ वचन- तुला वीर मरणआले तर आयुष्यभर मी वीरपत्नी म्हणूनच जगेन.

अरे अतुल जेव्हापासून मी तुला माझ मानलय, तेव्हापासून माझ्या एका मनात तुझ्यावरच प्रेम आणि दुसऱ्या मनात तुझ वीर म-रण्याच वास्तव हेच आहे. मग मला भीती कशाची वाटेल अरे जी लोक गाड्या फिरवतात पैशाचा माज करतात, भ्रष्टाचार करतात गावात राहणाऱ्या लोकांना तुच्छ समजतात. गर्विष्ठ, अहंकारी असतात.

मुलींवर अत्याचार करतात, गरीब-श्रीमंत यांमध्ये फरक करतात. त्यांना काय कळणार देश प्रेम म्हणजे काय असत. अरे आमच्या चेहऱ्यावर समाधान बघ. अरे लोकांकडे करोडो रुपये असतात त्याचा मा-ज करतात.

अरे त्या रुपयांपेक्षा आपण किती पटीने महाग असलेला मुलगा आम्ही देशाला देतो. तू याच विचाराने ना की ज्या भारत मातेचे न फिटणारे रून आहेत आपल्यावर ते थोडे फार रक्तात माखलेल्या जवणामुळे फिटले जातात.

तुला मरण आले तर आम्हाला खूप वाईट वाटेल. पण चेहऱ्यावर खूप मोठा समाधान असेल जिवंतपणी भारत मातेसाठी थोडे काहीतरी करायला मिळाले. अरे एक जवान बॉर्डरवर गेला. म्हणून तर तो फक्त एकटा देश सेवा नसतो करत.

तर त्याच आख कुटुंब या कार्यासाठी जोडलेल असत. तुला मरन येऊ शकते हे मला आधीच माहिती होत. त्या भीतीकडे मी बघितले असते तर मी लग्नच केल नसत. मम्मीने तुला आर्मी मध्ये घातलेच नसत. अरे लोक जगतात वेळ येईल तेव्हा मरतात. पण सगळ्यांच्या मरण्याला अर्थ असतो का? तुझ्या मरणाला अर्थ असणार आहे.

तुझ्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शरीराला पाहताना आम्हाला जेवढे दुःख होईल तेवढा तुझा अभिमानही वाटेल. माझ्या नवऱ्याला या देशासाठी मरण स्वीकारले आणि लोकांच काय ते आमची दखल घेतील की नाही. दखल घेतली नाही तरी तू आम्हा एक मोठी गोष्ट देऊन जाशील ते म्हणजे मानसिक समाधान.

आमची मान कायम गर्वाने उंच असेल. खालील जाणार नाही. हा दागिना तू देऊन जाणारे आम्हाला. त्यामुळे तू आमची काळजी करू नको. तू उद्याची तयारी कर असे म्हणून संध्या तिचे बोलणे थांबवते.

तसा अतुल ताडकन उठतो आणि तिला सॅल्युट करतो आणि म्हणतो आमच्यासारखे जवान देशाला मिळतील. पण त्यांना सोबत देणारी नवऱ्याचे स्वप्न स्वतःची मानून जगणारी अशी वीरपत्नी मिळायला हवी.

खूप अभिमान वाटतो ग तुझा, तुझ्यामुळे माझे बळ अजून वाढले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. हे संध्याने दाखवून दिले. देशामध्ये वीर पत्नीचे महत्व हे जवान शहीद झाल्यावरच कळते. पण खरच तिने देशासाठी जे सॅक्रिफाइस केलेल असत त्यासाठी खूप मोठ धाडस लागत. सलाम अशा वीर पत्नीला.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *