कर्मनाशा नदीची अद्भुत कहाणी, वाचून थक्क व्हाल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

भारतात खर तर सगळ्याच नद्यांना पवित्र मानले जात. इथे नदीला माता म्हटले जात. गंगामाता ही देशातली सगळ्यात पवित्र नदी असून देशात विविध शुभकाऱ्यांमध्ये नद्यांचा पवित्र जल वापरण्याची प्रथा फार पुरातन आहे. भारतात नदीचा महिमा इतका महान असताना सुद्धा एक नदी मात्र अशी आहे तिचं पाणी पिणं तर सोडाच पण त्या पाण्याला स्पर्श करताना सुद्धा लोक घाबरतात. या नदीच्या पाण्याला स्पर्श झाला तर तुमची सगळी चांगली कर्म नाश पावतात असा समज आहे.

पण कोणती आहे ती नदी आणि कुठे वाहते चला जाणून घेऊया. बिहार आणि उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या या नदीचे नावच मुळी आहे कर्मनाशा नदी कर्मनाशा हा शब्द कर्म म्हणजेच काम आणि नाशा म्हणजेच नाश अशा दोन शब्दातून बनलाय. या नदीविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. प्राचीनकाळी या नदीचे पाणी वापरून अन्न शिजवला जात नसे.

कर्मनाशा नदीच्या काठावर राहणारी लोक पूर्वीच्या काळी फळ खाऊन आपलं जीवन व्यतीत करायचे असे सांगितले जात. ही नदी बिहारच्या कैमुर जिल्ह्यात उगम पावते. आणि उत्तर प्रदेशातील सोनभद्र चांदोली वाराणसी कासेपूर अशी वाहत अखेर गंगेला मिळते. १९२ किलोमीटर लांबीच्या या नदीचा ११२ किलोमीटरचा प्रवास उत्तर प्रदेशातून होतो. पौराणिक कथेनुसार सत्यवचनी राजा हरिश्चंद्र यांचा पिता सत्यव्रत याने त्याचे गुरु वशिष्ठ यांच्याकडे सदेह स्वर्गात जाता यावं असं वरदान मागितल.

पण वशिष्ठ ऋषींनी त्या गोष्टीसाठी नकार दिला. तेव्हा नाराज झालेला राजा विश्वामित्र ऋषींकडे गेला आणि तिथेही त्यांनीहीच इच्छा व्यक्त केली. विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी यांच्यात शत्रुत्व होतं. त्यामुळे विश्वामित्रांनी तपाच्या बळावर सत्यव्रताला स्वर्गात पाठवल. पण त्यामुळे नियम मोडला गेला आणि इंद्र रागवला. आणि त्याने सत्य व्रताला डोकं खाली आणि पाय वर अशा अवस्थेतून स्वर्गातून परत खाली पाठवल.

पण विश्वामित्रांनी त्याला मध्येच रोखलं आणि तो आधांतरी राहिला. त्याला त्रिशंकू अवस्था प्राप्त झाली. इकडे देवता आणि विश्वामित्र यांच्यात युद्ध सुरू झाल. तेव्हा त्रिशांकूच डोकं खाली असल्याने त्याच्या तोंडातून वेगाने लाळ पृथ्वीवर पडली. आणि त्यातूनच कर्मनाषा नदी बनली अशी मान्यता आहे. ऋषी वशिष्ठ यांनी राजाला चांडाळ होशील असा शापही दीला होता.

तेव्हा या नदीच्या पाण्याला स्पर्श केला तर माणसाचे सर्व पुण्य कर्म नष्ट होते असा समज निर्माण झाला. आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी या नदीच्या पाण्याला स्पर्शही केला जात नसे. पण आता मात्र परिस्थिती बदलली आता माणसाला पाण्याची गरज आहे.

आणि त्यामुळे प्रत्यक्षात मात्र या नदीचे पाणी आज वापरलं जाते. आणि त्यावर शेतीही केली जाते हे असं समजतंय. मग मित्रांनो कर्मनाशा या नदीच्या कथेविषयी तुम्हाला माहित होते का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *