दसऱ्याला या गोष्टी नक्की करा समृद्धी येईल घरात. आणि या चुका केल्या तर होईल आयुष्यभर पश्चताप.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. अनेक लोक या दिवशी साधना करतात. या दिवशी जर तुम्ही काही ज्योतिषीय छोटे छोटे उपाय केलेत तर नक्कीच तुम्हाला तुमच्या समस्यांपासून सुटका मिळेल. दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करताना मंदिरात झाडू दान केल्याने धन आणि समृद्धीची प्राप्ती होते.

जर नोकरी व्यवसायात अडचणी येत असतील तर दसऱ्याच्या दिवशी आई जगदंबेची पूजा करा तिला दहा फळांचा नैवेद्य दाखवा आणि ती दहा फळ गरिबांना वाटून टाका. त्याचबरोबर देवीला या दहा फळांचा नैवेद्य दाखवताना ओम जयाय नमः म्हणायला विसरू नका. दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या खटलांपासून मुक्तता मिळते.

शनीच्या झाडाखाली दिवा लावल्याने सौभाग्य प्राप्त होते. जर व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर दसऱ्याच्या दिवशी नारळ सव्वा मीटर पिवळ्या कपड्यांमध्ये गुंडाळा त्याचबरोबर मिठाई हे सगळं घेऊन राम मंदिरात अर्पण करा. व्यवसायाला त्वरित गती मिळेल. कुठल्या आजार आणि तुम्ही त्रस्त असाल कुठला रोग तुम्हाला असेल तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी पाण्याने भरलेला एक संपूर्ण नारळ घ्या.

स्वतःवरण तो २१ वेळा ओवाळून रावण दहनाच्या अग्नीमध्ये फेकून द्या. जर तुम्ही घरातील सर्व सदस्यांवरून असा नारळ ओवाळून टाकलात तर नक्कीच त्याचे उत्तम परिणाम प्राप्त होतील. दसऱ्याच्या दिवसापासून कुत्र्याला रोज सलग ४३ दिवस बेसनाचे लाडू खाऊ घाला. त्यामुळे तुमच्या पैशाच्या संबंधित समस्या दूर होतील.

संकटातून मुक्त होण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी सुंदर कथा ऐकल्याने वाचल्याने सर्व रोग मानसिक त्रास दूर होतात. दसऱ्याच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांवर तुरटीचा तुकडा ओवाळून गच्चीवर किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन इष्ट देवतेचा स्मरण करत फेकून द्या. अस मानल जातं असं केल्याने सुद्धा सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

दसऱ्याला रावणाच्या दहनानंतर गुप्त दान देणं अत्यंत शुभ मानले जातात. अशा प्रकारचे दान तुम्ही दसऱ्याच्या दिवशी देऊ शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं यापैकी कुठलाही उपाय तुम्ही केला नाही तरी चालेल पण एक उपाय मात्र तुम्ही कराच करा. दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करायला विसरू नका. त्यामुळे तुमच्या घरातल्या लहान मुलांवर माता सरस्वतीची कृपा होईल.

त्या लहान मुलांच्या हातूनच हे सरस्वती पूजन करता आलं तर अति उत्तम. त्यांच्या शाळेची पुस्तकं मांडा त्याच्यावर हळदीकुंकू अक्षदा वा फुल वाहून सरस्वती काढायला त्यांना शिकवा. सरस्वती मातेचा एखादा श्लोक म्हणायला लावा. नक्की सरस्वती मातेची कृपा त्यांच्यावर होईल. दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीची पूजा करणे अत्यंत आवश्यक असत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *