गुरुकृपेचा अनुभव येईलच, गुरुपौर्णिमेपर्यंत करा एक काम.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

३ जुलै २०२३ ला आलेली आहे गुरुपौर्णिमा. आणि गुरुकृपा मिळण्यासाठी गुरुपौर्णिमा दिवस उत्तम मानला जातो. गुरुपौर्णिमेपर्यंत काही सेवा जर तुम्ही केल्या किंवा काही साधना तुम्ही केल्या तर तुम्हाला गुरुकृपेचा अनुभव निश्चितच येईल. पण नक्की करायचं काय हे जर तुम्हाला माहित नसेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गुरुकृपा मिळवण्यासाठी तुम्ही गुरु पौर्णिमेपर्यंत नक्की नक्की कुठल्या सेवा करायला हव्यात. चला तर मग सुरुवात करूया. जीवनातील संकट दूर होण्यासाठी गुरुकृपा ची खूप गरज असते. ज्यांच्यावर गुरुकृपा झाली ते घनसागरातून तरुण गेले.

अर्थात त्यांच्या सगळ्या संसारिक समस्या ही सुटल्या आणि ईश्वर प्राप्ती सुद्धा त्यांना झाली. गुरुकृपा होण्यासाठी नक्की काय करायचं. तर गुरुपौर्णिमा ही मोठी पौर्णिमा मानली जाते गुरुपौर्णिमा ही तीन जुलैला आहे. आणि तोपर्यंत तुम्ही काही खास सेवा करू शकता. त्यामध्ये सगळ्यात पहिली सेवा म्हणजे तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामी चरित्र सारामृत असं पारायण तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता.

सात दिवसांचे पारायण तुम्ही करायचे आहेत. हे पारायण तुम्ही कसं करायच. तुम्ही साधारणपणे 26 जून पासून हे पारायण सुरू केला आणि रोज तीन तीन अध्याय वाचत गेलात तर तीन जुलै पर्यंत तुमचा हे पारायण पूर्ण होईल. आणि पारायण पूर्ण झाल्याच्या दिवशी पारायण जमातीच्या दिवशी तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो आसनावर मांडायचा आहे.

विधीवत पूजा करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. आणि या पारायणाची समाप्ती करायची आहे. व्यक्ती पूर्ण अंतःकरणाने केलेली स्वामी चरित्र साराअमृताची पारायण हे गुरुकृपा अनुभव आपल्याला देत असतात. आता तुमच्याकडे सात दिवस द्यायला वेळ नसेल तर तुम्ही तीन दिवसांचे पारायण सुद्धा करू शकता.

गुरुपौर्णिमेच्या आधी तीन दिवस पारायण सुरू करा. आनि रोज सात सात अध्याय वाचा. तरीसुद्धा तुमच पारायण आरामात पूर्ण होईल. आणि पारायण पूर्ण झाल्याच्या दिवशी नैवेद्य करा. स्वामींची पूजा करा. आणि तो नैवेद्य सर्वांना वाटा. याशिवाय आणखीन एक सेवा तुम्ही करू शकतात ती म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे.

हा जप तुम्ही अगदी आजपासून सुरू करू शकतात. संध्याकाळी देवापुढे दिवा लावायचा आणि स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जप गुरुपौर्णिमेपर्यंत करायचा आहे. या उपायाने तुम्हाला निश्चितच मनशांती मिळेल. तिसरी सेवा म्हणजे स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा. तारक मंत्र गुरुपौर्णिमेपर्यंत रोज म्हणा.

भक्तिभावाने श्रद्धापूर्णांक अंतकरणाने करा. तारक मंत्र म्हणताना समोर एक ग्लास पाणी ठेवा आणि तारक मंत्र म्हणून झाल्यावर ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडा. हे तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत रोज करू शकतात. मित्रांनो तीन उपाय मी तुम्हाला सांगितले यापैकी कोणताही एक रुपया निवडा जो तुम्हाला शक्य असेल तुम्ही करू शकतात तो उपाय निवडा.

आणि रोज श्रद्धा भक्ती अंतकरणाने गुरु पौर्णिमेपर्यंत हा उपाय करा निश्चितच स्वामींच्या कृपेचा अनुभव तुम्हाला येईल. पण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही कोणताही उपाय करता किंवा कुठलीही साधना तुम्ही करता त्या साधनेचे काही नियम असतात. आता जेव्हा गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही स्वामींसाठी साधना करणार आहात तेव्हा खोटं बोलू नका.

कोणालाही फसवू नका कोणाशी वाईट वागू नका. शक्यतो वानीचा दोष निर्माण होईल अशी शब्द बोलू नका. त्याचबरोबर शाकाहारी भोजन करा. निश्चितच गुरुमाऊली तुमच्यासाठी प्रेमाची सावली राहील श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *