१० मे, अक्षय्य तृतीया ५ वास्तू उपाय, हे उपाय करा घरात सुख समृद्धी नांदेल, घरात लक्ष्मीचे आगमन होईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो अक्षय तृतीया म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा शुभ मुहूर्त या दिवशी सोन खरेदी कराव असा आवर्जून सांगितल जात. कारण त्यामध्ये कधीच घट होत नाही पण सगळ्यांनाच सोन खरेदी करणे शक्य नसत. बाकीच्यांनी काय करायच, बाकीच्यांनी कुठले उपाय करायचे ज्यामुळे त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य येईल, तेच या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ते जास्त खर्चिकही नाहीयेत त्यामुळे अगदी कोणीही करू शकत. दहा मे रोजी आहे अक्षय तृतीया आणि हा सण आपल्याला लाभदायक व्हावा यासाठीचे पाच उपाय आहेत.

१) त्या पैकी पहिला उपाय म्हणजे मातीचा दिवा अक्षय तृतीया हा शुभमुहूर्त आहे. त्यामुळेच हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करावा. यासाठी दिवाळीत आपण दिवा किंवा पण ती लावून रोशनी करतो की नाही त्याचप्रमाणे अक्षतृतीयेला सुद्धा दारामध्ये मातीचा एक छोटासा अभिवादन नक्की लावा आणि माता लक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये स्वागत करा. तिचा आशीर्वाद यामुळे तुम्हाला लाभेल.

२) त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे आंब्याचा उपाय आहे. हिंदू संस्कृतीतील प्रत्येक पूजेत ऋतूकालीन फळा फुलांचा पूजेमध्ये समावेश केला जातो आणि सध्याचा ऋतू सर्व फळांचा राजा असणाऱ्या आंब्याचा आहे. म्हणूनच घराघरात आंबा आता दाखल झालेला आहे. याच आंब्याचा नैवेद्य तुम्हाला तुमच्या घरातल्या देवतांना दाखवायचा आहे आणि त्यांच्याकडे सुख-समृद्धीसाठी प्रार्थना अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे.

३) त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे कापूस अक्षय तृतीयेच्या दिवशी थोड्याशा कापसाची वस्त्र करून ती देवाला अर्पण करायचे आहे. कापसाचे अस करून त्याची पूजा करायची आहे. त्यामुळे घरात सुबत्ता कायम राहते.

४) मीठ केवळ आहारशास्त्रातच नाही तर वास्तुशास्त्रातही अतिशय महत्त्वाचे आहेत. आयुर्वेदिक ज्योतिष शास्त्र देखील मिठाचे महत्व अधोरेखित करते. मिठाशिवाय अन्न आणि लागतं ते योग्य प्रमाणात आहारात असलच पाहिजे शिवाय धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला वाटीत मीठ घेऊन त्याची पूजा करावी. मीठ सागरातून मिळतो आणि लक्ष्मी ही सागर कन्या असल्यामुळे मिठाच्या पूजनाने ती देखील प्रसन्न होते अशी मान्यता आहे.

५) तुळशीची पूजा सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी महत्त्वाची ठरते. तुळशीच्या पूजेने आणि सेवेने आयुष्य तसेच आरोग्याचा लाभ होतो. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देवीकडे आरोग्य आणि वृत्तीचा दान मागाव. यासाठीच लक्ष्मी स्वरूपा असणाऱ्या तुळशीचे पूजन करावे आणि तिच्याकडे निरोगी आयुष्याची मनोकामना करावी.

मंडळी अक्षय तृतीया या तिथीचे वर्णन असा आढळतं की ज्याचा कधी क्षय होत नाही या दिवशी गोष्टी घेतल्याने वाढत नाहीत तर दिल्याने वाढतात. म्हणून आपल्या संस्कृतीने दानाला सुद्धा महत्त्व दिलय बर का. लोक आजच्या दिवशी सोनं खरेदीला महत्त्व देतात सोनं हे वैभवाचे प्रतीक आहेच.

६) मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आनंदाने समाधान मिळत आहे. म्हणूनच आनंदाने समाधान तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लाभाव यासाठी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी वस्त्रदान करू शकता. पण हे वस्त्रदान करताना लक्षात ठेवा जर तुम्ही दान म्हणून कपडे देणार असाल कोणाला आणि ते जुने जरी असले तरी ते धून स्वच्छ केलेले असावे त्याचबरोबर फाटलेल्या नसावे. फाटलेले कपडे शिवून मग तुम्ही ते दान करू शकत. कारण तुम्ही दान देतात दान हे चांगलं असाव. म्हणून या गोष्टींची काळजी घ्यावी.

नवे कोरे कपडे दान देणारा असाल तर ती कपड्यां व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता त्याच बरोबर उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही छत्री चपला अशा गोष्टी सुद्धा दान करू शकतात किंवा पाण्याने भरलेला माठ सुद्धा तुम्ही दान करू शकता. उन्हाळ्यामध्ये गरिबांची गरज भागेल अशा वस्तूंचे दान अक्षय तृतीयेला केला असता.

त्या पुण्याचा अक्षय साठा तुमच्या संचितात जमा होतो आणि या पुण्याईने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. तुमचा हे भलं होतं आणि ज्यांना तुम्ही दान देत आहात त्यांची सुद्धा गरज असते म्हणजेच एका साध्या दाण्याने दोन्हीकडच्यांचं कल्याण होत. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करा असं सांगितलं जात. ते तुम्हाला शक्य असेल जशी तुमची ऐपत असेल तशा प्रकारचा दानधर्म तुम्ही या दिवशी करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *