या ४ ठिकाणी चुकूनही राहू नका होईल अनर्थ. तुम्ही तर करत नाही ना या चुका.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

४ ठिकाण अशी आहेत जिथे तुम्ही चुकूनही राहू नका. कारण अशा ठिकाणी तुम्ही राहिलात तुमच्या जीवनात अनर्थ होणार हे नक्की. पण कोणती आहे ती ठिकाण चला जाणून घेऊया. मंडळी आचार्य चाणक्यान बद्दल तुम्ही ऐकलंय का. त्यांचा चाणक्य नीति हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात.

त्या ग्रंथामध्येच त्यांनी असं सांगितलं की चार ठिकाणी तुम्ही चुकूनही राहू नका. या चार ठिकाणांमध्ये तुम्ही राहिलात तर तुमच्या जीवनात अनर्थ ओढावलाच म्हणून समजा. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाच ठिकाण म्हणजे जिथे तुमचा अपमान होत असेल असं ठिकाण.

जिथे तुमचा आदर केला जात नाही जिथे तुम्हाला सन्मान दिला जात नाही. बाकी सगळ सोडाच पण जिथे तुमचा अपमान होतोय अशा ठिकाणी राहणारा व्यक्ती मूर्खच म्हणायला हवा. आणि अशा मूर्खपणामध्ये आपण स्वतःचच नुकसान करून घेतो. आणि म्हणूनच जिथे तुम्हाला अपमानास्पद वागणूक मिळत असेल अशा ठिकाणाहून तुम्ही काढता पाय घेणे योग्य आहे.

कारण जिथे आपण राहतो आहोत तिथल्या लोकांना जा आपली किंमत नसेल. आपला पदोपदी अपमान केला जात असेल. तर अशा ठिकाणी राहून आपण आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेतो. म्हणून अशा ठिकाणी कधीही राहू नये जिथे आपला अपमान होतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जिथे रोजगाराचं काहीही साधन नाही.

बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की लोक आपलं राहतं ठिकाण सोडायला तयार नसतात. किंवा आपल्या राहतं गाव असेल शहर असेल जे काही असेल ते सोडायला तयार नसतात. कारण त्याबद्दल त्यांना अतिशय प्रेम असत. पण भलेही त्यांना तिथे रोजगाराचं काही साधन नसत. किंवा प्रयत्न करूनही काम मिळत नसतं पण तरीसुद्धा त्यांचा मोह गावाबद्दलच प्रेम शहराबद्दलचा प्रेम त्यांना ते ठिकाण सोडू देत नाही.

अशा ठिकाणी सुद्धा तुमच नुकसानच होणार आहे. प्रगती करायची असेल तर जिथे रोजगाराच साधन आहे तिथे तुम्ही गेला पाहिजे. रोजगार हा जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. आणि त्यामुळेच कुठल्याही मोहात न पडता आपल्या कुटुंबाचे उदरभरण चांगल्या प्रकारे होईल अशा ठिकाणी आपण जायला हव.

म्हणजेच काय तर जिथे रोजगाराचं काहीही साधन नाही नव्या संधी नाहीत ऑपॉर्च्युनिटीज नाहीत अशा ठिकाणी राहू नये. अशा ठिकाणी राहणं म्हणजे अनर्थच. त्यानंतर जिथे शिक्षणाचा अभाव आहे जिथे तुम्ही चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही. शिक्षणाला जिथे महत्त्व दिल जात नाही अशा ठिकाणी सुद्धा कधीही राहू नये असं आचार्य चाणक्य सांगतात.

शिक्षणाचा अभाव जीवनामध्ये रोजगाराची कमतरता निर्माण करतो. आणि त्यामुळे संपूर्ण जीवनच अडकल्यासारखं होऊन जात. म्हणून शिक्षण तर माणसाच्या जीवनात गरजेचं आहे. आणि त्यासाठीच जिथे आपण शिक्षण देऊ शकणार नाही किंवा जिथे आपल्याला शिक्षण मिळणार नाही अशा ठिकाणी कधीही राहू नये.

आणि चौथ आणि शेवटच कारण म्हणजे जिथे आपल्या कोणीही ओळखीचं नाही किंवा आपला एखादा नातेवाईकही नाही अशा ठिकाणी सुद्धा राहणं धोक्याच आहे. कारण की बऱ्याचदा अनोळखी लोकांमध्ये आपण राहतो आणि स्वतःच नुकसान करून घेतो. लोकांची पारख आपल्याला करता येत नाही.

म्हणूनच मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिथे आपल्या ओळखीचे ४ लोक आहेत किंवा जिथे आपली नातेवाईक आहेत किंवा मित्रमंडळी आहेत अशा ठिकाणीच आपण राहण्याचा ठिकाण निवडाव. अनोळखी ठिकाण हे आपल्याला घातक ठरू शकत. तर ही होती ती चार ठिकाणी जिथे आपण चुकूनही राहू नये अस आपल्याला आचार्य चाणक्य सांगतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *