बुधादित्य राजयोग : ४ राशींना शुभ-फलदायी. अचानक चमकून उठेल यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध वृषभ राशीत विराजमान आहे. अवघ्या काही दिवसांनीच म्हणजे चोवीस जून रोजी वृषभ राशीतून मिथुन राशि मध्ये तो प्रवेश करेल. सध्याच्या घडीला वृषभ राशीमध्ये सूर्य विराजमान आहे. त्यामुळे बुध आणि सूर्य यांचा शुभ योग बुधादित्य राजयोग जुळून येत आहे आणि या योगाचा फायदा काही राशींना होणार आहे. कोणत्याही त्या राशी आणि कोणत्या राशींनी काळजी घेण्याची गरज आहे. चला जाणून घेऊयात.

१) मेष रास- मेष राशींच्या व्यक्तींना बुधादित्य योग काही शासन मिश्र ठरेल. यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. कामावर लक्ष केंद्रित करताना तुम्हाला अडचणी जाणवतील. पण व्यापारी वर्गाला मात्र नफा होईल. खर्चात वाढ होईल हेही खर. अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बजेटही लक्षात ठेवून त्यानुसार खर्च करावा.

२) वृषभ रास- वृषभ राशीतच हा बुधदित्य राजयोग तयार होत आहे. या राशींच्या व्यक्तींसाठी हा योग लाभदायक ठरणार आहे. नोकरीत चांगल्या संधी मिळू शकतील . प्रदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना जास्त फायदा होईल. युक्ती आणि चतुर यांनी केलेल्या प्रत्येक काम यशस्वी होईल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुमचे पैसे कुठे अडकलेत का तेही या काळात मिळू शकतात. बचतीच्या योजना यशस्वी होऊ शकतात.

३) मिथुन रास- मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग काही शासन मिश्र म्हणावा लागेल. कामाच्या ठिकाणी का सर्व काही सामान्य असेल. व्यवसाय संबंधित कोणताही महत्त्वाचा आणि मोठा निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यावा लागेल. मोठी गुंतवणूक करण्यावर फेरविचार करावा. जोडीदाराशी काही मतभेद सुद्धा होऊ शकतात. आरोग्याची काळजी ही घ्यावी लागेल.

४) कर्क रास- कर्क राशींच्या व्यक्तींना बुधादित्य योग काहीसा संमिश्र असणार आहे. कारण करियर मध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वरिष्ठांची नाराजी ओढवू शकते. त्यामुळे चुका करणे टाळा. पण मेहनत केली तर यश मात्र नक्कीच मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी सुद्धा मिळू शकतील. व्यवसायकांना सुज्ञपणाने घेतलेला निर्णय याचा फायदा होईल. प्रेम जीवनामध्ये परस्पर समजेसपणा वाढेल. जोडीदाराच्या सोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल.

५) सिंह रास- सिंह राशींच्या व्यक्तींना बुधादित्य योग काहीसा संमिश्र असेल. कोणताही मोठा निर्णय घेण टाळाव. नोकरदारांना कष्ट करूनही अपेक्षित यश मिळेलच अस काही नाही. बजेटची काळजी घेणे आवश्यक आहे. पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही मोठी गुंतवणूक करताना सुद्धा फेर विचार करा. जोडीदारासोबत समंजसपणे वागा. यांचा सल्ला मात्र तुम्हाला उपयुक्त ठरेल.

६) कन्या रास- कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. करिअरच्या दृष्टीने या काळात उत्कृष्ट परिणाम मिळतील. नोकरीमध्ये सुद्धा चांगल्या संधी मिळतील ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता. व्यवसायाकडे फायदा होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. विरोधक सुद्धा पराभूत होतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतील. प्रेम प्रकरणात जोडीदारासोबत सुसंवाद राहू शकेल. सुट्टीचे नियोजन केले जाऊ शकते.

७) तुळ रास- तुळ राशींच्या लोकांना बुधादित्य योग संमिश्रच म्हणावा लागेल. कारण आर्थिक बाबतीत चढ-उतार पाहायला मिळतील. व्यवसाय करणे गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी विरोधकांची संख्या वाढेल. पैशांच्या व्यवहारातही सतर्क रहा. अपेक्षित उत्पन्न मिळू शकेल अस नाही.

८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी सुद्धा बुधादित्य योग सामान्यच म्हणावा लागेल. फार काही नवीन घेऊन येत नाही. उलट खर्च वाढतील. सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहू शकणार नाही. कष्ट करावे लागतील. आर्थिक बाबतीतही म्हणाव असा फायदा होणार नाही. जोडीदारासोबत सुद्धा मतभेद वाढू शकतात आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. थोडा धीर धरा हा काळ ही निघून जाईल.

९) धनु रास- धनु राशींच्या व्यक्तींना सुद्धा बुधादित्य योग संमिश्रच म्हणावा लागेल. कारण व्यापारांना काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकतात. कठीण स्पर्धा त्यांना समोर येईल. नफा कमी होऊ शकतो. पैशांची बचत करण आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळावेत.

१०) मकर रास- मकर राशींच्या व्यक्तींना मात्र बुधदित्य राजयोग शानदार म्हणावा लागेल. अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतील. धनलाभाचे योग जुळून येत आहेत. या प्रकारची नोकरी तुम्ही शोधत आहात ना ती मिळू शकते. रखडलेले पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा नफा मिळू शकेल. करिअरमधील प्रगतीमध्ये तुम्ही समाधानी असाल.

११) कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्तींना जमीन किंवा इतर कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करताना दोनदा विचार करावा लागेल. कुटुंबांच्या सदस्यांसोबत चांगला वेळ घालवा. कुंभ राशींच्या व्यक्तींना ऑफिसमध्ये कामाचा दबाव जाणवेल. व्यवसायातही चढ-उतार होऊ शकतात. आर्थिक बाबतीत नफा आणि खर्च या दोन्हींचा ताळमेळ ठेववा लागेल. करिअरमध्ये मात्र प्रगती आणि समाधान दोन्हीही मिळेल.

१२) मीन रास- मीन राशींच्या व्यक्तींना बुधादित्य राजयोग शुभ ठरू शकेल.करिअरमध्ये अपेक्षित संधी मिळू शकतील. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती दिसू शकेल. नोकरी बदलण्याचा विचार करताय का चांगल्या संधी सुद्धा मिळू शकतील. प्रयत्न करायला काही हरकत नाही. आर्थिक लाभांसोबत खर्च मात्र वाढू शकते त्यामुळे थोडी काळजी घ्या. जोडीदाराचे सोबतचे संबंध चांगले राहतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *