अक्षय तृतीया कुलदेवीसाठी या ३ गोष्टी कराच आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी कुलदेवी चे नित्य उपासना केल्यास आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचे संकट येत नाही कारण कुलदेवता आपल्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करते म्हणूनच कुलदेवी तिच्या सेवेमध्ये अनेक गोष्टी येतात पण काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना सुद्धा तुम्ही कुलदेवी तिला काही विशिष्ट गोष्टी केल्या तर त्याने लाभ होतो आता अक्षय तृतीया येत आहे.

या अक्षय तृतीयेला कुलदेवतेसाठी तुम्ही तीन गोष्टी करू शकता तीनही गोष्टी नाही जमल्या तर एखादी गोष्ट जरी तुम्हाला जमली तरी सुद्धा त्याचा लाभ तुम्हाला नक्की मिळतो कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी कधी करायचा कसा करायचा चला जाणून घेऊयात.

वैशाख शुद्ध तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा ही १० मे रोजी आलेली आहे चैत्रगौरीच्या हळदी कुंकू च्या समारंभाच्या सांगता सुद्धा याच दिवशी याच दिवशी केली जाते म्हणजे ज्यांच्याकडे चैत्र गौर असते त्या चैत्रगौरीला सुद्धा याच दिवशी निरोप दिला जातो आणि सुवासिनींना हळदीकुंकवाला बोलवून सहभाग्यवान ही लुटले जाते आता अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे अक्षय म्हणजे कधीही क्षय न या दिवशी तुम्ही जप करा दान करा ल त्याचे पुण्य अक्षय होते.

म्हणजेच ते कधीही संपत नाही या तिथीला परशुराम किती असेही म्हणतात. या दिवशी अन्नपूर्णा जयंती नर नारायण जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती हय्यग्रीव जयंती सुद्धा असते आणि याच दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात की या तिथीला करण्यात आलेले दान हवन केलेले दान कधीही क्षयपावत नाही आयुर्वेदात औषधी वनस्पतींची लागवड याच दिवशी केली जाते कारण त्यामुळे त्याची वृद्धी होते असे मानले जाते

या तिथीचे महत्त्व तुमच्या लक्षात आलेच असेल आणि म्हणूनच या तिथीला तुम्हाला तुमच्या कुलदेवतेसाठी या ३ गोष्टी करायच्या आहेत. तिन्ही पैकी कोणतीही एक गोष्ट करायला जमली तरीही काही हरकत नाही काय करायच आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीला कुंकुमार्चन करू शकतात आई अंबिकेच्या उपासनेमध्ये कुंकुमार्चन करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते घरात. सकारात्मकता येते त्याचबरोबर घरामध्ये प्रसन्नता पसरते.

घरातल्या व्यक्तींच्या मनामधली नकारात्मकता निघून जाते हे कुंकुमार्चन जर कसे करावे हे जर तुम्हाला माहीत नसेल तुम्ही तुमच्याकडे कुलदेवतेचे टाक असतील किंवा कुलदेवतेचा फोटो असेल तर त्या फोटोवर सुद्धा तुम्ही कुंकू माचर्न ल करू शकता आणि जर तुमच्याकडे कुलदेवतेचे टाकही नाहीत आणि फोटोही नाही तर तुमच्या घरातल्या छोट्या अन्नपूर्णे वरती तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकतात अक्षय तृतीय दिवशी केलेले कुमकुम अर्चन तुम्हाला अक्षय होऊन देतो .

काही विशेष प्रसंगी कुलदेवतेची ओटी भरायला सांगितली आणि जर अक्षय तृतीयेसारखा शुभ मुहूर्त असेल तर या दिवशी आपल्या घरामध्येच तुम्ही आपल्या कुलदेवतेची ओटी भरू शकता. ओटीचे सामान नतर तुम्ही एखाद्या सवाष्णीला हळदीकुंकू लावून ते देऊ शकतात. ओटीच्या निमित्ताने कुलदेवी तेची उपासना घडते आणि त्याचबरोबर कुलदेवतेचे स्मरण देखील केले जाते.

आता जर या दोन्ही गोष्टी तुम्हाला जमणार नसतील तर तुम्ही तिसरा हा साधा सरळ सोपा उपाय करू शकतात तो म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कुलदेवतेच्या मंत्राचा जप करणे कुलदेवतेच्या मंत्राचा जप करायचा म्हणजे नक्की काय करायचे तुमची कुठलीही एक कुलदेवता आहे तिचा एक मंत्र आहे आता कुलदेवता मंत्र कसा तयार होतो त्याबद्दलचा एक व्हिडिओ आहे त्याचीही लिंक मी देत आहे कुलदेवी त्याच्या मंत्राचा जप १०८ वेळा अक्षय तृतीयेच्या दिवशी आवश्यक करावा.

त्यामुळे कुल देवतेची साधना होते उपासना होते त्याचबरोबर अक्षय पुण्याची प्राप्ती होते तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहतो तेव्हा मंडळी या तीनही गोष्टींपैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही अवश्य करा अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेता युगाची सुरुवात झाली होती असे मानले जाते आणि याच दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही कामाची फळ अक्षय म्हणजेच कधी न संपणारे असते

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी या नवीन घरात प्रवेश तुम्ही करू शकतात नवीन वास्तु घेणे मोठे आर्थिक व्यवहार करणे अशा प्रकारचे कोणतेही शुभ कार्य तुम्ही या दिवशी करू शकतात या दिवशी महर्षी वेदव्यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली होती अशी आख्यायिका प्रचलित आहे.

मग मंडळी अक्षय तृतीयेला तुमच्या गावात कोणत्या नवीन प्रथा रुढी किंवा पूजा केल्या जातात त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा म्हणजेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्रथा परंपरा या सगळ्या ंपर्यंत पोहोचतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *