११ मार्च २०२३ संकष्टी चतुर्थी अशी करा गणेश उपासना सर्व प्रश्नांची मिळतील उत्तर..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

जीवनात समस्या नाही अशी एकही व्यक्ती नाही. पण त्या समस्यांवरती उपायही करायला हवा ना. संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही काही खास उपाय केले तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात. चला तर मग बघुयात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणत्या समस्येसाठी तुम्हाला काय उपाय करायचा आहे.

मित्रांनो गणपती बाप्पा समोर नतमस्तक झाल की आपली सर्व विघ्न दूर होतात. जीवनात येणाऱ्या सर्व समस्या गणपती बाप्पा दूर करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. असा अनेकांचा अनुभव आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे जर काही आपण खास उपाय केले तर त्याचा अनुभव सुद्धा आपल्याला येतो.

१) यश प्राप्तीसाठी- माणसाला वेगवेगळ्या पातळीवर रोज लढावे लागते‌. अनेक जबाबदाऱ्या माणूस दैनंदिन पातळीवर पार पाडत असतो. कौटुंबिक आणि कार्यालय जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेकदा नाकी नऊ येतात. या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना वारंवार अडचणी समस्या समोर येत राहतात. संपूर्ण प्रयत्न करूनही अपयश पदरात पडतो अस सुद्धा होत.

ज्योतिष शास्त्रानुसार अशावेळी गणपतीचे पूजन आराधना करणे उपयुक्त ठरते. संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणेशाला चार नारळ अर्पण करावेत. मनापासून गणेशाचा नामस्मरण कराव. गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करतो. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळायला सुरुवात होते.

२) स्पर्धेत विजयासाठी- आता जर तुम्ही कोणत्या स्पर्धेत उतरला असेल किंवा कुठल्या परदास परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला काय करायच आहे बघूया लहानपणापासूनच माणूस अनेक स्पर्धांमध्ये सहभागी असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देत असतो. काही परीक्षा या जीवनाला तर काही परीक्षा करिअरला कलाटणी देणाऱ्या असतात. अशा परीक्षेमध्ये अपयश आल तर विद्यार्थी खचून जातो.

मेहनत परिश्रम करूनही स्पर्धा किंवा परीक्षांमध्ये यश मिळत नसेल तर ज्योतिष शास्त्र प्रमाणे गणपती बाप्पा आपली मदत नक्कीच करतो. यासाठी करायचा आहे काय प्रामाणिकपणे गणपती बाप्पाचा नामस्मरण कराव. याशिवाय गणेश मंदिरात जाऊन सुती धाग्याला सात गाठी माराव्यात. आणि जय गणेश गणपती विघ्न दूर करा.

अशी प्रार्थना त्यांच्याजवळ करावी. तो धागा गणपती बाप्पा समोर ठेवावा त्यानंतर तो धागा आपल्याजवळ ठेवावा तर मग विघ्न दूर होतात यश प्राप्त होते. विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या प्रयत्नामध्ये यश आलेल्या दिसून येतात.

३) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी- आता बघूया स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करायच प्रत्येक माणसाची बुद्धी स्मरणशक्ती चांगली नसते. माणूस अनेकदा अनेक गोष्टी विसरत असतो. स्मरणशक्ती चांगली नसल्यामुळे एखादी गोष्ट आठवत नसते किंवा खूप काही लक्षात राहत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अशावेळी गणपती बाप्पाला चरण जा मनापासून गणपती बाप्पाची उपासना करा.

संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणपती बाप्पाच्या समोर बसून अथर्वशीर्षाचे पठण करावे. खर तर तुम्ही संकष्टी चतुर्थी पासून अथर्वशीर्षाचे पठण रोज सुरू करू शकता. रोज जरा सर्व शीर्ष म्हटल तर तुम्हाला तुमच्या स्मरणशक्ती मध्ये नक्कीच फरक जाणवेल. आता जर तुम्हाला अथर्वशीर्षक म्हणता येत नसेल तर त्यावरही उपाय आहे.

सगळ्यात आधी ऐकायला सुरुवात करा. मोबाईल वरती लावत जा. ते रोज ऐकल्यानंतर ऐकून ऐकून तुम्हाला म्हणता सुद्धा येईल आणि थोड्या दिवसात ते तुम्ही पाठ करून टाकाल. अथर्वशीर्षकामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

४) कौटुंबिक सुख शांतीसाठी- कौटुंबिक समस्या असतील तर काय करायच घर म्हटल की भांड्याला भांड लागतच मात्र कुटुंबात वारंवार समस्या येत असतील अनेक प्रयत्न करूनही सुख शांतता टिकत नसेल गणपती बाप्पा समोर नतमस्तक व्हायच आणि काय करायचं न चुकता आई-वडिलांना नमस्कार रोज करायचा.

पृथ्वी प्रदक्षिणेची पैज लागली होती तेव्हा गणपती बाप्पांनी सुद्धा माता पार्वती आणि भगवान महादेवांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला होता. आई-वडिलांचे महत्व अधोरेखित केल. गणपती बाप्पाला स्मरून असे केल्याने कुटुंबातील समस्या दूर होण्यास सुरुवात होते अशी मान्यता आहे. आई-वडील नसल्यास घरातील जेष्ठ मंडळी आहेत त्यांना न चुकता नमस्कार करावा. त्यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते.

५) रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी- आता काही लोकांच्या रागावर नियंत्रण राहत नाही काही जण एकदम शिग्रकोपी असतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून अनेकांना राग येतो. बऱ्याच लोकांना त्याचा नंतर पश्चाताप होतो.मात्र वेळ निघून गेलेली असते.

रागावर नियंत्रण मिळवता काही येत नाही. अशा वेळी काय करायच तर गणपतीपुळे लाल फुल अर्पण करा. गणपती बाप्पाचे नामस्मरण करा आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करा की ज्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *