जन्म महिन्यानुसार व्यक्तीचा स्वभाव व गुण जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो. मात्र व्यक्तीचा जन्म महिना किंवा जन्मवार हा स्वभावासाठी शिवाय त्याच्या व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात आणि रविवार आणि शनिवार सर्व वाराच जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यावरून आणि जन्म वाऱ्यावरून कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेता येतात.

चला तर मग सुरुवात करूया की जन्म महिन्यानुसार आणि जन्मवारानुसार व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते त्या व्यक्तीमध्ये कोणते गुण असतात शिवाय तुम्ही सुद्धा तसे आहात का?

१) जानेवारी महिना- जानेवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती अत्यंत महत्त्वकांक्षी आणि गंभीर असतात. त्यांना शिकायला आणि शिकवायला आवडत ते इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात. शिवाय जानेवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील सुद्धा असतात. इतरांना खुश कस करता येईल किंवा त्यांना खुश कस ठेवायच हे त्यांना चांगलच माहिती असत आणि त्यासाठी ते आवर्जून कष्टही घेत असतात.

२) फेब्रुवारी महिना – फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना वास्तव्यात जगायला आवडत. त्या व्यक्ती फार बुद्धिमान आणि अति चतुर असतात. आपल ध्येय गाठण्यासाठी त्या खूप मेहनत करत असतात. त्यांचा व्यक्तिमत्व मात्र बदलत राहतात. फेब्रुवारी महिन्याच्या मुलीला व्यक्ती नाती अगदी प्रामाणिकपणे निभावताना दिसतात. त्यांचा परिवार कुटुंब मित्रपरिवार फार मोठा असतो. त्यांना मित्रमंडळींबरोबर फिरायला खूप आवडत. मात्र लहान गोष्टीवरून त्यांना लवकरात रागही येतो.

३) मार्च महिना- मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या असतात. त्यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही. शिवाय त्या व्यक्ती अतिशय शांत प्रिय असतात. मार्च मध्ये जन्मलेल्या व्यक्ती संवेदनशील आणि सेवाभावी सुद्धा असतात. त्याच्यातील विश्वासू उन्हामुळे त्यांना मित्र जास्त असतात. व्यक्तींना घराची सजावट करण्याची देखील आवड असते.

४) एप्रिल महिना – एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणाऱ्या असतात. त्यांचा व्यक्तिमत्व आकर्षक असत. या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर राहतात. त्यांना धाडसी काम करायला आवडत त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. कधी कधी गडबडीत ते निर्णय घेतात मात्र त्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ मात्र त्यांच्यावर येते. परंतु या व्यक्ती मनानं खूप खंबीर असतात.

५) मे महिना – मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती थोड्या जिद्दी स्वभावाचे असतात. त्यांचे विचार स्थिर असतात आणि या व्यक्ती इतरांना प्रभावी करण्यासाठी खूप मेहनत घेतात. शिवाय मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती फार कष्टाळूही असतात. प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करण्यास त्यांना आवडत. मात्र त्यांना रागही लवकर येतो.

६) जून महिना- यांच्या व्यक्तीचे लग्न आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते. जून महिन्याचे जन्मलेल्या व्यक्ती विनम्र स्वभावाचे असतात. शिवाय या व्यक्ती उत्तम वक्ता असतात. जून मध्ये जन्मलेल्या व्यक्तींच्या डोक्यात सतत नवीन नवीन गोष्टी सुरू असतात. कामासंबंधी त्या जास्त विचार करत असतात. जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती अतिशय संवेदनशील असून सतत बोलत राहणाऱ्या असतात. शिवाय ही माणसं इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात. आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर त्यांची चिडचिड होते आणि त्यांना रागही भरपूर येतो.

७) जुलै महिना – जुलै महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींना समजून घेणे अवघड असत. या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाचे असतात. परंतु ताणतणावत असतात. उत्तेजित होणाऱ्या सुद्धा असतात. या व्यक्ती खूप प्रामाणिक आणि भावुक असतात. इतरांची चिंता करतात आणि लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात. जुलैमध्ये जन्मलेल्या व्यक्ती सहजपणे कोणालाही माफ करत नाही. हा त्यांचा विशेष गुण आहे.

८) ऑगस्ट महिना – ऑगस्ट महिन्यात जन्मलेले व्यक्ती गमतीशीर आणि हसमुख स्वभावाचे असतात. त्यांचा स्वभाव समजून घेणारा असतो. या व्यक्ती सर्वांची काळजी करतात प्रत्येकाला मदत करणं हा त्यांचा स्वभाव असतो.शिवाय ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना धाडसी काम करायला आवडत. त्याचबरोबर या व्यक्ती उत्तम नेतृत्व करणाऱ्या असतात. तर कधी कधी फार अहंकारी सुद्धा बनतात.

९) सप्टेंबर महिना- सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती परिस्थितीप्रमाणे वागणाऱ्या असतात. सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती इतरांच्या चुका काढण्यात माहीर असतात. याचबरोबर सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींची स्मरणशक्ती ही चांगली असते. ह्या व्यक्ती फार बुद्धिमानी असतात आणि विश्वास प्रामाणिकही असतात.

१०) ऑक्टोंबर महिना – ऑक्टोंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडतात. त्यांना नवीन मित्र करायला सुद्धा आवडतात. ऑक्टोंबर मध्ये जन्मलेल्या व्यक्तींना नवीन ठिकाणी प्रवासाला जाण फार आवडत. या व्यक्तींना कला आणि साहित्याची खूप आवड असते. या व्यक्ती सर्वांशी प्रेमाने वागतात. स्वप्नांच्या दुनियेत रमायला ही ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना खूप आवडत.

११) नोव्हेंबर महिना – नोव्हेंबर महिन्यात जन्मलेले व्यक्ती वेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या असतात. त्यांची बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते. त्यांचा व्यक्तिमत्व आकर्षक असत. या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुक असते. त्याचबरोबर नोव्हेंबर मध्ये जन्मलेल्या व्यक्ती कधीही हार मानत नाहीत. मात्र त्या मनमिळाऊ असतात.

१२) डिसेंबर महिना- डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असतात. त्यांना खेळायला आणि गप्पा मारायला खूप आवडत. नवीन नवीन ठिकाणी एन्जॉय करायला सुद्धा त्यांना फार आवडत. त्याचबरोबर डिसेंबर मध्ये जन्मलेल्या व्यक्ती फार महत्त्वाकांक्षी असतात.

शिवाय ज्या वारावर आपला जन्म होतो त्यानुसार आपला स्वभाव देखील ठरवता येतो. मग आठवड्याचे पूर्ण दिवस म्हणजेच रविवार पासून तर शनिवार पर्यंत या दिवसांमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो हेही बघूया.

१) रविवार – रविवारी जन्मणाऱ्या व्यक्तींवर सूर्याचा प्रभाव दिसून येतो. अशा व्यक्ती स्वभावाने निर्भीर परंतु उदार असतात. ती गोरे आणि गव्हाळी रंगाचे असतात. रवीच्या प्रभावाखाली असणाऱ्या व्यक्ती धाडसी पराक्रमी महत्त्वकांक्षी बलशाली आणि निर्भीड नेतृत्व गुण असणारे असतात.

२) सोमवार- सोमवारी जन्मलेल्या व्यक्ती चंद्राच्या प्रभावाखाली येतात. ज्या व्यक्तींचा स्वभाव शांत प्रेमळ चंचल आणि भावनाप्रधान दिसून येतो. या व्यक्ती आध्यात्मिक विचाराच्या असतात. यांची वाणी फार मधुर असते. शिवाय या व्यक्ती भावुक असतात.

३) मंगळवार – मंगळवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती मंगळाच्या अमलाखाली दिसून येतात. या व्यक्ती धाडसी पराक्रमी आणि महत्त्वाकांक्षी शिवाय रागीट तामसी प्रवृत्ती सुद्धा असतात. या व्यक्ती अतिशय सिद्धी स्वभावाचे असतात. निर्भीड निडर न्यायप्रिय असतात. मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा नेहमी बुद्धीने काम करताना दिसतो.

४) बुधवार- बुधवार या वारी जन्मणाऱ्या व्यक्तीस बुद्धाच्या प्रभावाखाली असतात. या व्यक्ती कलाक्षेत्रात आणि व्यापार क्षेत्रात निपुण असतात. त्यांचे वाणी अतिशय मधुर असते आणि चेहरा आकर्षक असतो. मात्र बुधवारी जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत बुध बिघडला असेल तर अशा व्यक्ती दिवसात स्वप्न पाहणाऱ्या सुद्धा असतात. त्यांची बुद्धी नेहमी द्विधा मनस्थिती सापडलेली असते आणि संशय घेणाऱ्या त्यांचा स्वभाव असतो.

५) गुरुवार – गुरुवारी जन्मलेल्या व्यक्ती गुरु ग्रहाच्या अंमलाखाली असतात. अशा व्यक्ती गंभीरपणे चिंतन करणाऱ्या आणि धार्मिक स्वभावाचे असतात. प्रकल्प बुद्धिमत्ता या लोकांमध्ये दिसून येते आणि त्याचे जन्मपत्रिकेत जर गुरु ग्रह बिघडला असेल तर त्या व्यक्ती ढोंगी बनतात. इतरांसमोर आपल ज्ञान पाजवून धर्म निर्माण करताना सुद्धा दिसतात.

६) शुक्रवार- शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती शुक्राच्या अमलाखाली असतात. या व्यक्ती कला प्रिय बुद्धिमनी असतात. आधुनिक विचारसरणीना ते महत्त्व देतात. त्यांचा स्वभाव विनम्र असतो. मात्र शुक्रवारी जन्मलेल्या काही व्यक्ती आळशी स्वभावाच्या असतात. मात्र अशा व्यक्तींच्या जन्म पत्रिकेमध्ये शुक्र ग्रह बिघडलेला असावा अस ज्योतिषी सांगतात.

७) शनिवार- शनिवारी जन्मणाऱ्या व्यक्ती शनीच्या अमलाखाली असतात. जन्मपत्रिकेमध्ये शुभ स्थितीत असणाऱ्या क्षणी व्यक्तीला न्यायप्रिय कला प्रिय निष्ठावान बनवतात. या व्यक्ती स्पष्टवादी सिद्धांत प्रिय स्वभावाच्या असतात. तर अशाप्रकारे जन्म महिना आणि वार यानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि गुण हे ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घेता येत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *