रंगपंचमीला निवडा राशीनुसार रंग, जीवनात येईल आनंदाची बहार.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी जर तुम्ही तुमच्या राशीनुसार रंगपंचमीचे रंग निवडले तर तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीला स्वतःचा भाग्यशाली रंग असतोच. त्याच रंगाने धुलवड खेळल्यास सुख समृद्धी आनंद लाभेल आणि तुमच्या कुंडलीतील शुभ ग्रहांची स्थिती सुद्धा सुधारेल. मेष ते मीन राशीन पर्यंतच्या सर्व बारा राशींसाठी भाग्यशाली रंग कोणता आहे ते जाणून घेऊयात.

१) मेष रास आणि वृश्चिक रास- ज्योतिष शास्त्रानुसार मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ मानला जातो आणि मंगळाचे प्रतीक लाल आहे. म्हणूनच या दोन राशींसाठी शुभ रंग लाल आहे. धुलवडीच्या दिवशी या दोन्ही राशींच्या लोकांनी लाल,केसरी, गुलाबी रंगांनी रंगपंचमी साजरी करावी. मेष आणि वृश्चिक राशींच्या लोकांनी होळीच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर किंवा चित्रावर लाल रंगाचा गुलाल लावावा.

२) वृषभ आणि तुळ रास- शुक्र हा ज्योतिषशास्त्रा वृषभ आणि तूळ राशींचा स्वामी आहे आणि तो एक शुभ आणि शांत ग्रह मानला जातो. या राशीचे लोक विलासी जीवन जगणारी मानले जातात. या दोन्ही राशींचे भाग्यशाली रंग पांढरे आणि गुलाबी आहेत. होळीला पांढऱ्या रंगाचा गुलाल नसला तरी चंदेरी आणि गुलाबी रंगाने होळी खेळता येते. या लोकांनी गरजू लोकांना करंजी खाऊ घालावे आणि होलिका दहनानंतर तांदूळ दान करावे.

३) मिथुन आणि कन्या रास- मिथुन आणि कन्या राशीचा शुभ रंग हा हिरवा आहे. या दोन्ही राशींचा स्वामी बुध मानला जातो. या ग्रहांचा राजकुमार बुधाचा रंग हिरवा असतो. या रंगाने होळी खेळल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल. मला हव्या असल्यास हिरव्या रंगाबरोबरच पिवळ्या आणि केशरी रंगाने हि धुलवड साजरी करता येईल. मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांनी होलिका दहनानंतर गाईला हिरवा चारा खाऊ घालावा आणि घरी आलेल्या पाहुण्यांना हिरवा गुलाल लावावा.

४) मकर आणि कुंभ रास- मकर आणि कुंभ राशीवर शनीचे स्वामित्व आहे आणि शनीचा आवडता रंग काळा आणि निळा आहे. या रंगाने होळी खेळल्यास शुभ ठरेल. होळीला काळा रंग मिळत नसेल निळ्या किंवा जांभळ्या रंगाने धुलवड साजरी करावी. हे शुभ ठरेल. या रंगाने रंगपंचमी खेळल्यास शनीच्या अशुभ स्थितीत लाभ होतो. मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी होलिका दहनानंतर मोहरीचे तेल दान करा आणि गरजू लोकांना अन्न खायला घालावे.

५) धनु आणि मीन रास- धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे देवगुरू गृहस्पती मानला जातो. या राशी भगवान विष्णूशी संबंधित आहे. या दोन्ही राशींसाठी होळीचा रंग पिवळा आणि भगवा आहे. या रंगाने धुलवड खेळावी. यावर उपाय भगवान विष्णूंना केशर थंडाई अर्पण करावी आणि देवाला झेंडूच्या फुलांनी सजवावे.

६) कर्क रास- कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि या राशींचा शुभ रंग पांढरा, चंदेरी, गुलाबी आहे. धुलीवंदनीच्या निमित्ताने जर तुम्ही या रंगाने धुलवड खेळणी आणि या रंगाचे कपडे परिधान केल्यास हे तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरेल. कर्क राशींच्या लोकांनी होळीच्या दिवशी माता लक्ष्मी थंडाई अर्पण करा आणि गरजू लोकांना प्रसादाच्या रूपात थंडाई अर्पण करा.

७) सिंह रास- सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि या राशीचे लोक स्वभावाने थोडे रागीट मानले जातात. या लोकांच्या साठी लाल, केशरी आणि पिवळा हा रंग शुभ मानला जातो. या रंगाने होळी खेळल्याने आरोग्य सुधारते. तुमचे तुमच्या वडिलांसोबतचे नाते सुधारते आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. सिंह राशींच्या लोकांनी होळीच्या दिवशी प्रभू रामाला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करा आणि घरी आलेल्या पाहुण्यांना प्रसाद म्हणून द्यावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *