मिथुन रास- २०२३ मध्ये या महत्त्वाच्या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच. जाणून घ्या नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्य, कुटुंब. माहिती. आणि उपाय.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

२०२३ हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी कसं जाणार आहे? जे अविवाहित आहेत त्यांची लग्न होतील का? जे बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळतील का? हे आणि बरच काही चला जाणून घेऊयात.

१) आर्थिक स्थिती- २०२३ नुसार या संपूर्ण वर्षात मिथुन राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली होण्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. त्याची सुरुवात थोडी आर्थिक दृष्ट्या बेताची होईल खरी, तुमच्या खर्चातही वाढ झालेली असेल. पण जानेवारी संपेपर्यंत परिस्थिती बदलू लागेल. त्यानंतर शुक्र महाराज गोचर करून राशी परिवर्तन करतील आणि एप्रिल मध्ये जेव्हा, गुरु महाराज अकराव्या भावात गोचर करतील

तेव्हा तुम्हाला आर्थिक दृष्ट्या चांगले परिणाम मिळू लागतील. तुम्हाला अशा काही संधी भेटतील की ज्या तुम्हाला आर्थिक बाबतीत सक्षम बनवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतील. त्याच्या मध्यात म्हणजेच एप्रिल ते ऑगस्ट तुम्हाला काही मोठे आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतात. म्हणजेच एकंदरीत आर्थिक दृष्ट्या तुमच्यासाठी हे वर्ष बरं असणार आहे.

२) नोकरी आणि व्यवसाय- यावर्षी मिथुन राशीच्या जातकांना त्यांच्या करिअरमध्ये जानेवारी पासूनच चांगले परिणाम पाहायला मिळतील. वर्षाच्या सुरुवातीला काही चढ-उतार होतील खरे, कारण करियर आणि नोकरीच्या बाबतीत तुम्ही गोंधळलेले असाल. पण बदलते ग्रहमान तुमची परिस्थिती सुद्धा बदलेल. तर तुम्ही खूप दिवसांपासून बदलीची वाट पाहत असाल तर या तुम्हाला हवी तिथे तुमची बदली होऊ शकते.

याव्यतिरिक्त जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्हाला शनि देवांची कृपा चांगलीच फळ देऊन जाईल.२२ एप्रिल पासून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले यश मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा दर्जा उंचावेल. यादरम्यान तुमचा पगारही वाढेल पदोन्नतीसाठी हा काळ चांगला राहील. आणि हो तुमच्या कामाचा ताणही वाढेल. अर्थात पगार वाढला की जबाबदारीही वाढतेच. आणि जबाबदारी वाढली की ताणही वाढतोच.

अशाप्रकारे वर्षाचे पहिले आणि शेवटचे महिने तुमच्यासाठी करिअरमध्ये चांगले यश देणारे सिद्ध होतील. मिथुन राशीच्या व्यापाऱ्यांसाठी हे वर्ष नक्कीच चांगले असेल. वर्षाची सुरुवात तणावपूर्ण होणार आहे खरी, ज्या व्यवसायाच्या भागीदारीच्या नात्यात चढउतार येऊ शकतात. आणि याचा तुमच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण जसं जसं वर्ष पुढे जाईल तशी तशी तुमच्या व्यवसायात प्रगती झालेली पाहायला मिळेल.

३) कौटुंबिक- कौटुंबिक दृष्ट्या विचार करता कुटुंबातील तणाव कमी होईल. एकमेकांबद्दल आपुलकीची भावना वाढेल. आणि कुटुंबात शुभकार्यांचे आयोजन ही केले जाईल. ऑगस्ट ते ऑक्टोंबर दरम्यान कौटुंबिक संबंधात तणाव येऊ शकतो. कौटुंबिक संपत्ती येऊ शकतो.

कौटुंबिक अशांतता भंग पावेल. परंतु हळूहळू परिस्थिती अनुकूल होईल. आणि ऑक्टोंबर महिन्यात बुध तुमच्या चौथ्या भावात प्रवेश करेल तेव्हा अनेक समस्या आपोआप कमी होतील. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात परत आनंदी व्हाल. मिथुन राशीच्या लोकांसाठी लग्नाचे योग २०२३ मध्ये आहेत बर का.

म्हणजेच मिथुन राशीचे जे अविवाहित तरुण तरुणी आहेत त्यांचे विवाह २०२३ मध्ये जमून येतील. कारण तसं ग्रहमान आहे त्यामुळे तुम्ही नवीन जोमाने स्थळ शोधू शकता. नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. त्याचबरोबर २०२३ मध्ये कार्यक्षेत्रात यशस्वी व्हायचा असेल तर तुम्ही काही ज्योतिषीय उपाय सुद्धा करू शकता. ते उपाय याप्रमाणे. रोज आपल्या अन्नातून पहिली पोळी गाई साठी काढा.

दर बुधवारी हिरव्या रंगाचा पालेभाज्या हिरव्या रंगाचा चारा किंवा अख्खा मूग गाईला खायला द्या. भगवान विष्णूंना समर्पित श्रीविष्णू सहस्त्रनाम स्त्रोताचे पठण करावे. बुधवारचा उपवास करण जर तुम्हाला शक्य झाल, तर अतिउत्तम. त्यामुळे तुमची व्यवसायिक प्रगती होऊ शकते. आणि तुम्ही निरोगी सुद्धा राहाल. तुम्हाला कोणतीही कठीण समस्या येत असेल, किंवा तुम्ही आजारी असाल तर गजेंद्र मोक्ष स्त्रोत्राचा पठण करावे. किंवा सरळ सोपी साधी आपली रामरक्षा म्हणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *