महाशिवरात्रीला ‘या’ दुर्मिळ आणि शुभ योगाची साथ पाहा कसा होईल लाभ..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी माघ महिन्यातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. माघ वैद्य चतुर्दशी प्रारंभ १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी होत आहे तर माघ चतुर्थीशी समाप्त १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजून १९ मिनिटांनी होत आहे. त्यामुळे यंदा महाशिवरात्री १८ फेब्रुवारीला आहे. त्या दिवशी भगवान शिवाची पूजा विधीनुसार केली जाते आणि उपवास सुद्धा केला जातो.

यंदाची महाशिवरात्र आणखी खास असेल. कारण यावेळी दुर्मिळ योग आणि शुभ योगाची साथ आहे. चला तर मग जाणून घेऊयात यंदा शनि प्रदोषासोबत कोणते शुभ योग तयार होत आहेत. मित्रांनो महाशिवरात्रीसह शनि प्रदोषाची उपस्थिती अत्यंत शुभ मानले जाते. पुत्र प्राप्तीच्या इच्छेने शनि प्रदोष व्रत पाळले जाते.१८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी शनि प्रदोषामुळे भगवान शिव तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण करतात असे सांगितले जाते. यासोबतच शनिदोष दूर करण्यासाठी हे व्रत खूप चांगले मानले जाते.

महाशिवरात्रीला पाण्यात काळे तीळ टाकून भगवान शिवाचा अभिषेक केल्याने शनिच्या महादशापासून आराम मिळेल. महाशिवरात्री संध्याकाळी ५ वाजुन ४२ मिनिटांनी ते १९ फेब्रुवारीच्या सूर्योदयापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग राहिल. सर्वार्थ सिद्धी योगामध्ये भगवान शंकराची आराधना करून वृत्त ठेवल्याने तुम्हाला परम यश मिळते. सर्वार्थ सिध्दी योग धनप्राप्तीसाठी आणि कार्यसिद्धीसाठी विशेष शुभ मानले जाते.

या शुभ योगात कोणतेही नवीन काम व्यवसाय सुरू केल्यास शुभ परिणाम मिळतात. यावेळी महाशिवरात्रीला शनी कुंभ राशीत राहील.आणि १३ फेब्रुवारीला सूर्य ही कुंभ राशी प्रवेश करणार आहे. अशा प्रकारे महाशिवरात्रीला पिता पुत्र सूर्य आणि शनी एकाच राशीत असतील. ज्योतिष शास्त्रात पित्त पुत्र सूर्य आणि शनी यांचे परस्पर विरोधी संबंध बांधले जाते. असे असूनही या राशी ती शुभ फलदायी असते.

यावेळी शनि प्रतिगामी अवस्थेत असेल त्यामुळे सूर्याचा प्रभाव जास्त राहील. ही स्थिती करिअर आणि आर्थिक बाबींच्या दृष्टीने चांगली मानली जाते. या शुभ योगात शिवाची उपासना आणि उपवासाची केल्याने शनि देवाचे सर्व दोष दूर होतात. महाशिवरात्रीला गुरु देखील आपल्या मीन राशीत असेल. गृहस्पती मीन राशि उच्च स्थानी आहे. आणि जेव्हा तो स्वतःच्या राशीत असेल तेव्हा तो हंसराज योग तयार करेल.

करिअरच्या दृष्टिकोनातून ही स्थिती अत्यंत शुभ मानली जाते. यावेळी तुम्ही तुमच्या करिअर बाबत जो काही निर्णय घ्याल त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही नवीन नोकरीसाठी जात असाल किंवा नोकरीच्या संबंधात मुलाखतीसाठी जात असेल तेव्हा तुम्हाला शिव तांडव स्तोत्राचा पाठ करून यश नक्कीच मिळेल. महाशिवरात्रीला गुरु सोबत शुक्र ही मीन राशीत असेल.

ज्योतिष शास्त्रात दोन्ही ग्रह विरोधी स्वभावाची मानले जातात पण चांगली गोष्ट म्हणजे शुक्र मीन राशीत उच्च स्थानी असेल. त्यामुळे मालव्य नावाचा शुभ राजयोग तयार होईल. या सर्व शुभ परिस्थितीत भगवान शिवाची उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आजवर ज्या कामांमध्ये तुम्हाला अडचणी येत होत्या ती सर्व कामे आता हळूहळू पूर्ण होऊ लागतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *