१८ फेब्रुवारी महाशिवरात्र शिवलिंगावर अभिषेक केल्याने काय लाभ होतात? जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

१८ फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी अभिषेक केला जातो. पण नक्की कोणत्या गोष्टींनी अभिषेक केल्याने काय लाभ होतो. आपली वैयक्तिक समस्या दूर करण्यासाठी आपण महादेवाच्या पिंडीवर कोणत्या गोष्टींनी अभिषेक करायला हवा चला जाणून घेऊयात.

१) दुधाचा अभिषेक- हा अभिषेक सर्रास महादेवाच्या मंदिरामध्ये केला जातो. पण नक्की दुधाचा अभिषेक केल्याने लाभ काय होतो तर सगळ्यात महत्त्वाचं गाईच्या दुधाने अभिषेक केल्याने अत्यंत शुभ मानला जातो. अस केल्याने संतती प्राप्तीची इच्छा असेल तर ती पूर्ण होते. व्यक्ती रोगी असलेल्या आजारी असेल तर ती रोगमुक्त होते त्यांचा आजार बरा होतो.

२) उसाच्या रसाचा अभिषेक- उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक केला तर तुमच्या संपत्तीत वाढ होते. म्हणजे तुम्हाला आर्थिक लाभ होतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर भगवान शिव प्रसन्न होऊन सर्व मनोकामना ही पूर्ण करतात.

३) मोहरीच्या तेलाचा अभिषेक- जर तुम्हाला छुप्या शत्रूंचा त्रास असेल तर महाशिवरात्री राज शिवलिंगावर मोहरीच्या तेलाचा अभिषेक करा अस सांगितल जात. अस केल्याने तुम्हाला शत्रूंपासून मुक्ती मिळते. तुमच धैर्य वाढते. पण हे करण्यापूर्वी लक्षात घ्या की तुमची कुंडली ज्योतिषाला दाखवा आणि तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्या आणि मगच हे करा.

४) मधाचा अभिषेक- महाशिवरात्रीला शिवलिंगावर मधाने अभिषेक करण अत्यंत पुण्याचा समजले जातात. शिवलिंगावर मध अर्पण केल्याने एखाद्याचे मन अध्यात्माकडे वळू शकते. त्याच्या बोलण्यात गोडवा वाढतो.त्याचबरोबर त्यांच्या अंतकरणामध्ये हे परोपकारची भावना निर्माण होते. ती व्यक्ती दयाळू होती आणि समाजात कीर्ती आणि आदर त्या व्यक्तीला प्राप्त होतो.

५) दह्याचा अभिषेक- महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दह्याने आणि अभिषेक केल्यास आयुष्यात परिपक्वता येते, संयम येतो. तसंच भगवान शिव शंकरांचा आशीर्वाद मिळतो. शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्यास आयुष्यात येणारे अडथळे सुद्धा दूर होतात. सगळ्यात महत्त्वाच महादेवाच्या पिंडीवर दह्याने अभिषेक केल्याने आपल मन शुद्ध होत. मानसिक ताण तणाव दूर होतात.

६) गंगाजलाचा अभिषेक – महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व तीर्थातून आणलेल्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो. भगवान शिव तसंच माता पार्वती त्यांचे आशीर्वाद मिळतात. या पवित्र दिवशी गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्यास आयुष्यामध्ये आनंदाची प्राप्ती होते आणि मोक्षाची ही प्राप्ती होते. त्याचबरोबर जर संपत्तीची समस्या असेल तर ती हि दूर होते. मृत्यूचे भय राहत नाही.

७) पंचामृताचा अभिषेक- महाशिवरात्रीच्या दिवशी पंचामृताने अभिषेक केल्या तर इच्छित मनोकामना पूर्ण होते. आरोग्याची प्राप्ती होते.

८) तुपाचा अभिषेक- त्याचबरोबर शिवलिंगावर तुपाने सुद्धा केला जातो आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होतात अस म्हटल जात. आजारांपासून मुक्तता मिळते. पण लक्षात घ्या की हे करत असताना योग्य ती ट्रीटमेंट सुद्धा घ्यायची आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि औषध पाणी घ्यायच आहे.

मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की तुमची समस्या काय आहे त्याप्रमाणे पदार्थाची निवड तुम्ही करू शकता. येत्या महाशिवरात्रीला महादेवांना अभिषेक करू शकता. नक्कीच महादेवाची कृपा तुमच्यावर होईल. आणि तुमची समस्या लवकरच दूर होईल.बोला,” ओम नमः शिवाय “.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *