श्रावणी सोमवार शिवपूजनाचे महत्त्वाचे नियम, जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा केली जाते. आणि या महादेवांच्या पूजेमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींचा पालन होणे अत्यंत आवश्यक असते महादेवांच्या पूजेचे काही महत्त्वाचे नियम आहेत. ते माहीत करून घेऊनच त्याची पूजा करावी तुम्ही शिवामूठ वाहनाची पूजा करत असाल किंवा १६ सोमवारचे व्रत करत असाल महादेवांचे श्रावणातील कुठलेही व्रत किंवा पूजा तुम्ही करत असाल तर त्यासाठी हे सगळे नियम लागू होतात. कोणत्या आहेत ते नियम चला जाणून घेऊयात.

मित्रांनो महादेवांच्या पूजेतला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे शंकरांना तुळस कधीही वाहू नये फक्त शाळीग्रामावर वाहिलेली तुळस शिवाला चालते तसेच शिवतीर्थ पिऊ नये. मात्र स्वयंभू बान लिंगावरील तीर्थ पिण्यास काहीच हरकत नाही. म्हणजे महादेवांची जी पिंड स्वयंभू आहे बाणलिंग स्वरूपामध्ये आहे तिचं तीर्थ आपण पिऊ शकतो. शिव पूजा झाल्यानंतर निरंजन ओवाळून झाल्याच वेळ न दवडता शिवपूजेत केवड्याचा वापर चुकूनही करू नका.

तसेच शंका तील पाणी सुद्धा भगवान शिव शंकराला वाहू नये महादेवांचे जे पितृगन रुद्र गण जे इत्यादी असतात आपण शंकरांचा अभिषेक करून त्यांची पूजा करत असतो त्या त्यावेळी महादेवांच्या साळुंकेच्या टोकाशी तीर्थकरिता प्रसादाकरिता बसलेले असतात अशी मान्यता आहे. आपण महादेवांना नेहमीसारखी प्रदक्षिणा घातली तर त्या रुद्रगाणांना आणि पितृगनांना भीती होईल म्हणून शिवाला अर्धीच प्रदक्षिणा घालावी ही पद्धत आहे.

श्रावणामध्ये जी महादेवांची पूजा केली जाते त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या संकल्प करू शकता म्हणजे अविवाहित मुली त्यांचे लग्न ठरावे म्हणून पूजा करू शकता किंवा ज्यांचं लग्न झालेला आहे त्या शिवा मुठ वाहु शकतात. आणि शिवा शिवा महादेवा मला सासरच्या माणसांची लाडकी कर अशी प्रार्थना महादेवांकडे करू शकता.

त्याचबरोबर जर तुम्हाला खूप कर्ज झाला असेल तर तुम्ही महादेवाला दुग्ध अभिषेक करू शकता. त्यामुळे तुमचे कर्ज कमी होईल आर्थिक समस्या ही दूर होतील महादेवाची पूजा श्रावणामध्ये केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात.
त्यातही जर तुम्ही स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केली तर तुमची मनोहरत सिद्धी होते चांदीच्या शिवलिंगाची पूजा केली तर राज्यप्राप्ती आणि पितरांचा उद्धार होतो.

सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सत्य लोक प्राप्त होतो तसेच लक्ष्मी प्राप्ती होते तांब्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास दीर्घायुष्याची प्राप्ती होते आणि आरोग्याची प्राप्ती होते काशाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास कीर्ती प्राप्त होते. तसेच तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील, वैवाहिक जीवनात बेबनाव असेल.

तर तुम्ही श्रावणामध्ये शिवलीला अमृताचा पहिला अध्याय नक्की वाचा श्रावणी सोमवारी हा शिवलीला अमृताचा पहिला अध्याय वाचल्याने वैवाहिक बेबनाव दूर होतो. तेव्हा मंडळी भगवान शिव शंकराची पूजा करताना या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा म्हणजे भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *