महाशिवरात्रि पूर्वी तुम्हाला स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर महादेव देतील शुभ फळ.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू धर्मात भगवान शिव हे सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ मानले गेले आहेत. म्हणून त्यांना महादेव देवांचे देव ही संज्ञा दिली जाते. भगवान शिव विश्वनाथ कालभैरव दिनानाथ आणि त्रिलोकी अशी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. भगवान शिवाचे वर्णन सर्व देवतांमध्ये सर्वात निष्पाप म्हणून केले गेले आहे. म्हणून त्यांना भोलेनाथ या नावाने देखील संबोधले जाते.

शास्त्राचे जाणकार सांगतात की ज्यांच्यावर महादेवाची कृपा आहे त्यांना जगातील मोठी शक्ती ही पराभूत करू शकत नाही. आणि त्यांच्यासमोर कोणताही अडथळा उभा राहू शकत नाही. महाशिवरात्रीच्या आधी तुम्हाला जर स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर तुम्हाला महादेवाचा विशेष आशीर्वाद मिळेल.

चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो यावर्षी 18 फेब्रुवारी 2023 रोजी देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान शिव आपल्या भक्तांवर विशेष आशीर्वाद देतात. जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या आधी असे काही संकेत मिळत असतील. तर समजून घ्या की भगवान शिवाची कृपा तुमच्यावर वर्षा होणार आहे.

भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. आणि तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदेल. याशिवाय कुटुंब यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करेल. जर तुमच्या स्वप्नात शिवलिंगावर दुधाचा अभिषेक दिसला तर समजून घ्या की भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न आहेत. आणि लवकरच करायचं तुम्हाला आशीर्वाद देणार‌ आहेत.

भगवान शिवाला बेलपत्र खूप आवडते जर तुम्हाला स्वप्नात बेलपत्र किंवा बेलाचे झाड दिसले तर समजून घ्या की भगवान शिव तुमच्यावर भरपूर आशीर्वाद देणार आहेत. शास्त्रात भगवान शिवाला रुद्राक्ष धारण केल्याचे वर्णन केले आहे. महाशिवरात्रीच्या आधी जर तुम्हाला स्वप्नात रुद्राक्षमणी दिसला तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात समृद्धी येणार आहे. आणि तुमचे सर्व संकटे दूर होणार आहेत.

स्वप्नात पांढरे शिवलिंग दिसल्यास ते स्वप्न शास्त्रात अतिशय शुभ मानले जाते. पांढऱ्या रंगाचे शिवलिंग दिसणे हे लक्षण असू शकते की येणाऱ्या काळात तुम्हाला काही गंभीर आजारापासून मुक्ती मिळू शकते. आयुष्यात काहीतरी चांगले घडू शकते.

स्वप्नात शिवलिंगाची पूजा करणे हे येत्या काळात तुमची इच्छा पूर्ण करू शकते. ही इच्छा पूर्ण होण्याचे लक्षणे देखील असू शकते. असे स्वप्न खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंगावर साथ दिसला तर हे स्वप्न देखील शुभ मानले जाते. कारण असेच स्वप्न घरात सुख शांती आणि समृद्धी व धना. आणणारे मानले जाते.

हे स्वप्न दर्शवते की तुमच्या आयुष्यात जो काही शत्रू आहे तो संपणार आहे. आणि तुम्ही शत्रूपासून मुक्त होणार आहेत. जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंग खरेदी करताना दिसले तर ते देखील शुभ स्वप्न मानले जाते. असे मानले जाते की तुम्ही भगवान बोलेनाथांची तुमची जी काही इच्छा दाखवली आहे ती सर्व पूर्ण होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *