नमस्कार मित्रांनो.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या कडून या चुका झाल्या तर लक्ष्मी कधीच आपल्या घरात येत नाही. मग आपण लक्ष्मीपूजनाची पूजा केली तरी तिचा लाभ आपल्याला होत नाही. मग आपल्या घरात गरीबी, दरिद्री सतत चालूच असते.
कधीच त्यामध्ये कमी येणार नाही आणि आपण कधीच प्रगती करणार नाही. म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची असेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या ४ चुका तुम्ही अजिबात करू नका.
१) यातली पहिली चूक म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दिवाळीचे जे ४-५ दिवस असतात आणि खास करून लक्ष्मीपूजनाचा दिवस. या दिवशी तुम्ही घरात वाद-विवाद आणि कटकटी करू नका. ज्या घरात वादविवाद कटकटी असतात तिथे लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाहीत.
२) दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि दिवाळीमध्ये तुम्ही मांसाहार करू नका, नॉनव्हेज खाऊ नका. आता बरेच लोक बोलतात की, आम्ही घरी नॉनव्हेज करणार नाही. मांसाहार करणार नाही. आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाऊ.
नाही मित्रांनो तुम्हाला या दिवसांमध्ये खास करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाहेर सुद्धा खायच नाहीये. काही लोक बाहेरून खाऊन येतात, पण नाही हेसुद्धा चुकीचे आहे. तुम्हाला घरी काय तुम्हाला बाहेर सुद्धा मांसाहार करायचा नाहीये.
३) त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे व्यसन- व्यसनी माणस व्यसन कधीच सोडत नसतात आणि ही सगळ्यात मोठी चूक असते की, तुम्ही सणावाराच्या दिवशी खास करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा व्यसन करत असाल.
तर मग तुमच्या घरात लक्ष्मी कधीच येणार नाही. म्हणून व्यसन सुद्धा व्यसनी माणसाने करायचं नाही मग ते कोणतेही व्यसन असू द्या. तुम्ही ते अजिबात करू नका.
४) शेवटची गोष्ट म्हणजे- घरातील किंवा इतर कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका. मग तो अपमान पुरुष करत असेल किंवा स्त्रीच स्त्रीचा अपमान करत असेल ही सुद्धा सगळ्यात मोठी चूक असते. मग ती स्त्री घरातील असो किंवा बाहेरची असेल कोणत्याही स्त्रीचा अपमान या दिवशी करू नका.
कारण लक्ष्मी माता घरात येण्या आधी या सर्व गोष्टींकडे लक्ष देत असते आणि ज्या घरांमध्ये या चुका होत असतात तिथे लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद