ही ४ कामे गुरुवारी नक्की करा…पहा घडेल चमत्कार.. पूजा पाठ न करता करा हा उपाय….

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो गुरुवार हा अत्यंत शुभ वार मानला जातो, यादिवशी गुरू दत्ताची, स्वामी समर्थांची मनोभावे पूजा केली जाते. हा दिवस अनेकांच्या जीवनात आनंद घेऊन येत असतो, यादिवशी कोणत्याही शुभ कार्याला सुरवात करणे चांगले असते.

आपल्या हिंदू धर्मात गुरुवार हा खूप महत्वाचा दिवस मानला जातो, हा गुरूंचा वार असून बृहस्पती देवांचा देखील वार आहे. गुरुवारी श्रीहरी विष्णूचे देखील मनोभावे पूजन केले जाते. गुरू बृहस्पती हे आपल्या जीवनात अनेक आनंद घेऊन येतात, जसे की धनसंपत्ती, संतान, पती, सुखी वैवाहिक जीवन या सर्वांची प्राप्ती करून देतात. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्या जवळ असणे शुभ असते.

यादिवशी आपली खूपशी कामे लक्षपूर्वक करणे आवश्यक असते, यातील काही कामे अशीही आहेत जी यादिवशी केल्याने गुरू ग्रह कमजोर होतो. गुरू हा सर्वात मोठा,व जड ग्रह आहे. तसेच त्याचा आपल्याही जीवनावर खूप जास्त प्रभाव पडतो.

जर गुरू ग्रह कमजोर स्थितीत असेल तर त्याचा आपल्या जीवनावर खूप नकारात्मक परिणाम होत असतो. अपल्याला आपल्या जीवनात खूपशा, दुःखांचा आणि अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे यादिवशी असे कोणतेही काम करू नये ज्यामुळे आपले शरीर व घर हलके होईल.

शास्त्र असे सांगते की गुरुवारी स्त्रियांनी आपले केस धुवु नये. कारण त्यांच्या कुंडलीत गुरू ग्रह हा त्यांचे पती व अपत्य यांचा कारक ग्रह असतो आणि जर गुरू ग्रह कमजोर असेल तर मुलांवर आणि पतीवर संकटे येऊ शकतात. जर गुरुवारी केस धुतले किंवा कापले तर गुरू कमजोर होऊ शकतो.

पुराणांमध्ये गुरूला जीवन म्हणले आहे याचाच अर्थ आयुष्य. म्हणून गुरुवारी केस, नखे कापने तसेच शेविंग करणे यामुळे आपले आयुष्य कमी होऊ शकते. तसेच ज्याप्रमाणे गुरूचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो त्याचप्रमाणे तो आपल्या घरावर देखील होत असतो. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचा ईशान्य कोपरा, इथे देवाचा वास असतो.

तसेच ईशान्य कोनाशी घरातील स्त्रियांचा संबंध असतो, पुत्रप्राप्तीचा संबंध देखील घरातील या ईशान्य कोनाशी असतो. या दिशेला शिक्षणाची दिशा देखील म्हणले आहे. म्हणून गुरुवारी कपडे धुवु नये, तसेच भंगार समान, अडगळ बाहेर काढू नये.

घर धुणे, जाळे काढणे, मोठं मोठे समान हलवणे,घरातील साफसफाई करणे यांसारख्या कामे यादिवशी अजिबात करू नये. रोजच्या वापरातील कपडे सोडून इतर जड कपडे, तिजोरी मधील कपडे धुवु नये. चादर, बेडशीट, टॉवेल असे कपडे यादिवशी धुवु नये. तसेच गुरुवारी तामसिक भोजन करू नये, मांसाहार करु नये.

आपल्या जीवनातील गुरू बळकट करण्यासाठी गुरुवारी पिवळी वस्त्रे धारण करावी, हे खूप शुभ मानले जाते.कारण हा पिवळा रंग गुरू ग्रहाचा आहे. जर यादिवशी तुम्हाला एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायची असेल तर ती तुम्ही खरेदी करू शकता. तसेच यादिवशी तुम्ही प्रॉपर्टी संबंधी कामे करू शकता.

यादिवशी मात्र अध्यात्माशी किंवा पूजनीय वस्तूंची खरेदी करू नये. डोळ्यासबंधी एखादी वस्तू, चालू, सुरी अशा धारदार वस्तूंची खरेदी देखील यादिवशी करू नये. भांड्यांची खरेदी देखील करू नये. मित्रहो आपण सर्वजण केशर जाणून आहोत, ते प्रत्येक प्रकारचे मनोविकार दूर करण्याचे काम करते, त्याशिवाय ते गुरुचे द्रव्य आहे.

म्हणून गुरुवारी स्नान झाल्यावर कपाळावर केशराचा टिळा लावावा, त्यामुळे आपले सर्व मनोविकार दूर होतात.मुलांच्या कपाळावर लावल्याने त्यांचे अभ्यासात मन लागते. तसेच यादिवशी पिवळ्या हरभऱ्याच्या डाळीची भाजी बनवून आपणही खावी व आपल्या जोडीदाराला सुद्धा खायला द्यावी.

त्यामुळे वैवाहिक जीवनात खूप प्रेम वाढते, हा पिवळा रंग गुरू ग्रहाचा कारक रंग आहे. या रंगाकडे पाहून आळस दूर होतो व आपली स्मरण शक्ती वाढते. तसेच गुरुवारी घराबाहेर पडताना राईचे दाणे खाऊन जाणे अत्यंत शुभ असते, गुरू ग्रहाचा प्रभाव धनावर असतो त्यामुळे यादिवशी पैशाची देवाण घेवाण शक्यतो टाळावी.

जर ही पैसे, घेतले किंवा दिले तर घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात. गुरूला प्रसन्न करण्यासाठी त्यादिवशी लवकर उठून स्नान करून देवघरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा. श्रीहरी विष्णू भगवंताचे पूजन करावे. विष्णू सहस्त्र नामाचे वाचन करावे. यादिवशी संध्याकाळी केळीच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावावा.

पिवळी मिठाई किंवा बेसनाचे लाडू नैवेद्य म्हणून ठेवावे. पूजन झाल्यावर केशराचा टिळा लावावा, जर केशर नसेल तर हळदीचा टिळा लावावा. त्यामुळे आपला गुरू ग्रह मजबूत होऊन आर्थिक स्थिती चांगली होते.

स्त्रियांच्या कुंडलीत गुरू ग्रह मजबूत नसेल तर विवाहात अडथळे येतात, किंवा विवाहित असेल तर वैवाहिक जीवन अडचणींचे होते म्हणून त्यांनी गुरू ग्रहाला मजबूत बनवण्यासाठी दररोज अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी.

मित्रहो गुरुवारी विष्णू सहस्त्र नामाचे पठण जवळपास ११ वेळा करावे त्यामुळे गुरू मजबूत होतो व आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो. आजचा हा लेख अतिशय महत्वाचा आहे, त्यामुळे नक्की वाचा, आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *