पितृपक्षात कुत्र्याला नक्की खाऊ घाला ही वस्तू. पितृदोष मिटतील व संकट संपतील.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

पितृपक्ष चालू आहे. पितृपक्षात आपल्या आपल्या पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध,दर्पण व पिंडदान केले जाते. ज्यामुळे आपले पित्र आपल्यावर खुश होऊन आपल्याला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात. हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्व प्राप्त आहे. असे म्हणतात की ज्यांचे पूर्वज पितृपक्षात पिंडदान व श्राद्ध करत नाहीत त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही.

पितृपक्षात पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध प्रकारे त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून मनोभावे व प्रसन्नतेने आपल्या पितरांचे श्राद्ध करावे. म्हणजे आपले पित्र आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. ज्यांचे पित्र ज्यांच्यावर नाराज असतात त्यांना पितृ दोषचा सामना करावा लागतो.

विविध अडचणी व संकटांचा सामना त्यांना करावा लागतो घरात वादविवाद व भांडण-तंटे होत राहतात घरात शांतता राहत नाही प्रत्येक कार्यामध्ये काही ना काही अडथळे येत राहतात. नेहमी आर्थिक अडचणी जाणवतात संतान प्राप्ती मध्ये अडचणी जाणवतात घरामध्ये नेहमी भय भीतीचे वातावरण असते दुखाने जीवन भरून जाते.

तर मित्रांनो पितृपक्षात आपण घरीच काही उपाय करून पितृ दोषा पासून मुक्ती मिळवू शकतो. पितरांची नाराजीही आपण आपल्या आनंदात बदलू शकतो. पितृपक्ष हा पित्रांना समर्पित असतो. पितृपक्षात काही छोटे छोटे उपाय करून आपण पितरांचा आशीर्वाद मिळवू शकतो.

आज आपण एक छोटासा उपाय बघणार आहोत ज्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणू शकतो व कुंडलीतील पितृदोष यापासून मुक्तता मिळवु शकतो. या उपायांमुळे आपल्या सर्व शत्रूंचा नाश होईल व शत्रु दोषापासून ही मुक्तता होईल. त्याचबरोबर शनिदोष व कालसर्प दोषापासून ही मुक्ती मिळेल.

तर मित्रांनो चला बघूया ते उपाय हे उपाय आपण कोणत्याही दिवशी करू शकतो पण शुक्रवार,शनिवार व अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्याने त्याचे अधिक परिणाम बघायला मिळतील. या उपयासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करावी त्यानंतर आपल्या किचन ची सफाई करावी व कणिक मळावी पिठामध्ये मीठ टाकू नये.

त्यानंतर त्या पिठाच्या पोळ्या बनवाव्या त्यातील पहिली पोळी गाईसाठी काढून ठेवावी. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांसाठी पोळ्या बनवाव्या. शेवटची पोळी करताना थोडा मोठा गोळा घ्यावा व त्यात एक चमचा साखर टाकून त्याची जाडसर पोळी बनवावी. त्या पोळीला गाईचे शुद्ध तूप लावावे.

त्यानंतर ती पोळी एक ताटात ठेवून देवघरासोर उभे राहून गणपती बाप्पा, श्रीहरीविष्णू, लक्ष्मीमाता व शनिदेव यांना नमस्कार करावा. शनिदेवकडे पार्थना करून सर्व दोष दूर होण्यासाठी पार्थना करावी. पितृदेवाला नमस्कार करावा व कळत नकळत झालेल्या अपराधांची क्षमा मागावी. पितृदोष दूर होण्यासाठी पार्थना करावी त्यानंतर यमदेवाला नमस्कार करून झाल्यावर ती पोळी एखाद्या काळ्या रंगाचा कुत्र्याला खाऊ घालावी.

जर काळा कुत्रा नसेल तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला ही पोळी आपण खाऊ घालू शकतात. शास्त्रात असे लिहिले आहे की पितृपक्षात आपले पित्र कोणत्याही पशुप्राण्यांच्या रुपात आपल्याकडे अन्न खाण्यासाठी येतात. असे म्हणतात की पित्रांना भोजन देण्यासाठी गाय, कावळा,कुत्रा,व मुंग्या यांना भोजन दिले जाते. असे म्हणतात की हे सर्व पंचतत्वांपैकी एक आहेत.

कुत्र्याला जळतत्वचे, कावळ्याला वायूत्त्वाचे, मुंग्यांना अग्नित्त्वाचे व गाईला पृथ्वीतत्वाचे व देवी देवतांना आकाश तत्वाचे प्रतीक मानले जाते. पित्रांना भोजन देऊन या पाच तत्वांना भोजन देऊन आपल्या पितरांचे आभार मानले जातात. या पंचबळी चा एक भाग कुत्र्याला दिला जातो.

कुत्र्याला यमाचे प्रतीक मानले जाते. म्हणून पितृपक्षात कुत्रांना भोजन देऊन यमाला प्रसन्न केले होते. पुराणानुसार कुत्रांना भोजन देताना असे म्हणावे की यमाचे जे कुत्रे आहे श्याम व स्वबल यांच्यासाठी मी हा घास देत आहे. त्यांनी हा घास ग्रहण करावा. याला कूपर बळी सुद्धा म्हटले जाते म्हणून कुत्रांना भोजन देताना हे वाक्य जरूर म्हणावे.

त्यानंतर कुत्र्याला व भैरवनाथला नमस्कार करावा. कुत्र्याला पोळी खायला दिल्याने भैरवनाथ आपल्यावर खुश होतात व आपली सर्व संकटे व त्रासापासून मुक्तता करतात. कुत्र्यांना पोळी खायला दिल्यात शनि देवाची कृपा आपल्यावर होते व शनि दोषापासून मुक्तता होते.

शास्त्रामध्ये असे लिहिलेले आहे की पितृपक्षामध्ये इतरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व पितृदोष यापासून मुक्त होण्यासाठी कुत्र्यांना गोड पोळी जरूर खायला द्यावी यामुळे आपले पित्र आपल्यावर खूश होतात व त्यांच्या आशीर्वादामुळे आपली पितृदोष यापासून मुक्तता होते.

पितृपक्षात कुत्र्याना अशाप्रकारे गोड पोळी खायला दिल्यास आपल्यावर पितरांची कृपा बरसते. शक्य असल्यास हा उपाय पितृपक्षात रोज तुम्ही करू शकता. कुत्र्यांचे शास्त्रामध्ये खूप महत्त्व सांगितलेले आहे असे म्हणतात की कुत्रा व्यक्तीला श्रीमंताचा गरीब व गरीबाचा राजा सुद्धा बनवू शकतो.

कुत्र्यांना पोळी खायला दिल्यात आपले शत्रू सुद्धा नष्ट होतात हा उपाय शक्यतो दुपारी १२ ते १ या दरम्यान करावा. कारण ही वेळ आपले पित्र येण्याची वेळ असते आणि या वेळामध्ये आपण जर कुत्र्यांना पोळी खायला दिली तर ही पोळी डायरेक आपल्या पित्रांपर्यंत पोहचते.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *