रक्षाबंधन पौराणिक कथा. रक्षाबंधन का साजरा करतात?

Astrology

नमस्कार मित्रांनो.

भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेला सण म्हणजेच रक्षाबंधन हा सण या वर्षी २२ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या वर्षात या दिवशी श्रवण नक्षत्राचा ही योग बनत आहे. म्हणून यावेळी रक्षाबंधनाच्या या सणाला विशेष महत्व प्राप्त होत आहे. या दिवशी श्रावण नक्षत्राचा योग हा दिवसभर असणार आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावरती राखी बांधते आणि त्याला दिर्घ आयुष्य व सुख समृद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करते.

भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. तर मी आज तुम्हाला ही माहिती देणार आहे की, राखी बांधण्याचा मुहूर्त काय आहे आणि राहू-केतू बद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. राहु काळात चुकूनही राखी बांधू नये या वर्षी रक्षाबंधनाचा उत्सव २२ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पोर्णिमा तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्मात राखी पौर्णिमेचे खूप महत्त्व आहे. तसेच हिंदू धर्मामध्ये मुहूर्ताचे सुद्धा खूप महत्त्व असते. म्हणून रक्षाबंधन साजरा करताना योग्य मुहूर्त असावा.

रक्षाबंधन हा भाव बहिणीचा सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याचे औषण करते व भाऊ तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. राखी बांधण्यासाठी सर्वात आधी ताट तयार करावे. त्यात कुंकू,अक्षदा,एक तांब्या पाणी, राखी, एक नाणे किंवा सोन्याचा दागिना आणि कोणतीही मिठाई घ्यावी. व भावाला पाटावर बसवून त्याच्या डोक्यावर कुंकवाचा तीळा लावावा व त्याच्यावर अक्षदा लावून त्याच्या डोक्यावर सुद्धा थोड्याशा अक्षदा टाकाव्या.

त्यानंतर भावाच्या उजव्या हाताला राखी बांधून नाण्याने किंवा सोन्याच्या दागिन्यांची कपाळावर दृष्ट उतरवल्यासारखे फिरवावे. त्यानंतर औषण करावे म्हणजे दिव्याने ओवाळावे व त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घालावी. भावाने बहिणीला मिठाई खाऊ घालून तिचा आशीर्वाद घ्यावा. भावाने आपल्या इच्छेनुसार बहिणीला काहीतरी भेटवस्तू द्यावी.

जर भावाचे लग्न झालेले असेल तर काही ठिकाणी भाऊ आणि बहीण या दोघांना सुद्धा राखी बांधली जाते काही ठिकाणी बहीण आपल्या भावाच्या दिर्घ आयुष्यासाठी उपवास सुद्धा करते. आता रक्षाबंधनाची सुरूवात कधीपासून झाली ते आपण जाणून घेऊया ज्यापासून देव आणि दानवमध्ये युद्ध झाले.

त्या दिवशी देवराज इंद्र खूप घाबरले त्यांना वाटले की आता या दानवांचा विजय होईल व आपले सिंहासन जाणार. त्यामुळे ते घाबरून गुरुदेव ग्रहस्पती कडे गेले. तेथे त्यांनी सर्व हकीकत सांगीतली. भगवान इंद्र आणि ग्रहस्पती यांचे बोलणे ऐकून ग्रहस्पती यांची पत्नी खूप चिंतेत आली आणि त्यांनी ग्रहस्पती यांच्याकडे मदतीची याचना केली.

त्यावेळी ग्रहस्पतीनी तिला एक रक्षा सूत्र दिले व ते इंद्रदेवाच्या हातावर बांधायला सांगितले. त्यानंतर सचिनने ते रक्षासूत्र इंद्रदेवाच्या हातात मानले त्यामुळे त्यांचे युद्धामध्ये रक्षण झाले आणि त्यांचा विषय सुद्धा झाला. तेव्हापासून हा रक्षाबंधनाचा उत्सव साजरा होऊ लागला.

दुसरी कथा अशी सांगितली जाते की राजसुर्य यज्ञाच्या वेळी भगवान श्रीकृष्ण यांचा हाताला जखम झाली व ते धावत धावत सुभद्रेकडे गेले सुभद्रा इकडे तिकडे कपडा शोधू लागली. मग श्रीकृष्ण द्रौपति कडे गेले आणि द्रोपती ने लगेच आपल्या साडीचा पदर फाडून भगवंताच्या हातावरती पट्टी बांधली. तीच पहिली राखी होती. त्यानंतर श्रीकृष्णाने या थोड्याश्या राखीच्या बदल्यात कौरवांपासून द्रौपतिची लाज वाचवली व तिचे रक्षण केले. त्या दिवसापासून रक्षाबंधनाचा सण साजरा होऊ लागला.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *