श्रावण महिन्यामध्ये रोज या प्रकारे करावे महादेवाचे अभिषेक सर्व तुमच्या मनासारखे होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

काही दिवसातच श्रावण पवित्र महिन्याची सुरुवात होत आहे. श्रावण महिना म्हणजे महादेवाचा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात आपण खूप गोष्टींचे नियम पाळतो, उपास करतो उपाय करतो, तोडगे करतो, सेवा करतो, पारायण करतो मंत्रजप करतो. परंतु त्यासोबतच आपण या श्रावण महिन्यामध्ये महादेवाचा अभिषेक सुद्धा केला पाहिजे.

हा अभिषेक फक्त सोमवारी नाही तर श्रावण महिना चालू होण्या पासून ते संपल्या पर्यंत सर्व दिवस केला पाहिजे. आता अभिषेक करायचा आहे म्हणजे तुम्हाला महादेवाची मूर्ती तुमच्या घरामध्ये असायलाच हवी आणि सांगायला झाले तर तुमच्या घरामध्ये आपण महादेवाची मूर्ती किंवा पिंडच स्थापन करत नाही. फक्त आपण महादेवाचे शिवलिंग देवघरामध्ये स्थापन करतो.

म्हणून तुम्हालाही जर महादेवाचा अभिषेक करायचा असेल तर आपल्या देवघरामध्ये शिवलिंग पाहिजे. आणि जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर हा श्रावण महिना तुमच्यासाठी शिवलिंग घेण्यासाठी खूप पवित्र महिना आहे. तुम्ही तांब्याचे चांदीचे किंवा कोणतेही इतर धातूची शिवलिंग देवघरामध्ये आणू शकतात. फक्त शिवलिंग घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, शिवलिंग देतांना आपला अंगठा जेवढा आहे तेवढ्याच उंचीचे शिवलिंग घ्यायचे आहे.

त्यापेक्षा मोठे नाही आणि त्यापेक्षा छोटही नाही. तर शिवलिंग तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही विकत आणा आणि रोज श्रावण महिन्यामध्ये त्याचे अभिषेक करा शिवलींगाची अभिषेक करण्याची पद्धत खूप सोपी आहे. तर आधी तुम्हाला एक ताट घ्यायचे आहे त्या ताटामध्ये शिवलिंग ठेवायचे आहे आणि ११ वेळेस दुधाचे थेंब तुम्हाला त्या शिवलिंगावर टाकायचे आहे आणि ११ वेळेस ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे.

आता जेव्हा तुम्ही पहिला थेंब शिवलिंगावरती टाकाल तेव्हा तुम्हाला एक वेळा ओम नमः शिवाय म्हणायच आहे. त्यानंतर दुसरा टाकणार तेव्हा दुसऱ्या वेळा म्हणायच आहे. अस तुम्हाला ११ वेळेस करायच आहे आणि त्यानंतर शिवलिंग घ्या. त्याला व्यवस्थित पुसून घ्या आणि आपल्या देवघरामध्ये ते स्थापन करा. शिवलिंग देवघरामध्ये स्थापन झाल्यानंतर तुम्हाला ११ बेलपत्र घ्यायची आहे आणि ते ११ बेलपत्र शिवलिंगावर टाकायचे आहे.

बेलपत्र टाकताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण श्रावण महिना शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. असे केल्याने महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील व तुमच्यावर अति प्रसन्न होतील.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *